News

Centers

ऑर्डर डे वरुड -मोर्शी

08-02-2026

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

त्रिरत्न बौद्ध महासंघ वरुड -मोर्शी
दिनांक 8 फेब्रुवारी रोज रविवारला ऑर्डर डे घेण्यात आला.
ऑर्डर डे ची सुरुवात त्रिशरण दस शील घेऊन करण्यात आली  पूजेचे नेतृत्व धम्मचारिणी मैत्रीतारा यांनी केले. जस्ट सीटिंग धम्मचारी कुशलबोधी यांनी घेतले .
धम्मचारी कुशलबोधी यांनी परिचय दिला.
त्यानंतर धम्मचारी अक्षोभ्यमती यांनी सुंदर असे अभ्यासपूर्ण कर्म आणि पुनर्भव या विषयावर सखोल असे प्रवचन दिले.
भोजनानंतर सर्वांनी ग्रुप चर्चा केली. त्यानंतर प्रश्न उत्तरे घेण्यात आले. आभार प्रदर्शन धम्मचारिणी श्रद्धाश्री यांनी केले.
शेवटी सप्तांग पूजेच्या सातव्या  अंगाने ऑर्डर डे ची सांगता करण्यात आली . सर्वांनी मैत्रीपूर्ण निरोप घेतला.

सद्धम्म प्रदीप शिबिर केंद्र के लिए दान अपील

30-01-2026

By SPRC Center - Retreat Center Bhaje

धम्म के प्रकाश को फैलाएं: सद्धम्म प्रदीप शिबिर केंद्र के साथ रिश्ता जोडीये

परम पूज्य डॉ. बाबासाहेब अंबेडकर के इसी महान दृष्ट्री को साकार करने के लिए, त्रिरत्न बौद्ध महासंघ नए समाज का निर्माण कर रहा है जहाँ करुणा, प्रज्ञा और समानता का वास हो। सद्धम्म प्रदीप शिबिर केंद्र (SPRC), भाजा की ऐतिहासिक गुफाओं की सानिध्य  में, पिछले ४० वर्षों से धम्म की उस अखंड ज्योति को जलाए हुए है जो जीवन को भीतर से बदलने की शक्ति रखती है।

आपके सहयोग की आवश्यकता क्यों है ?

हमारा लक्ष्य है कि आर्थिक तंगी कभी भी किसी के आध्यात्मिक मार्ग की बाधा न बने। SPRC में हम उन जिज्ञासुओं का भी स्वागत करते हैं जो शिबर का खर्च वहन नहीं कर सकते। केंद्र के पास कोई सरकारी सहायता या स्थायी निधि नहीं है; हमारी शक्ति केवल आप जैसे 'धम्म मित्रों' की दानशीलता और उदारता है।

आपका एक छोटा सा योगदान किसी के जीवन में शांति और नई दिशा का सूत्रपात कर सकता है। यह दान नहीं, बल्कि एक नए, प्रबुद्ध भारत के निर्माण में आपकी सहभागिता है।

सेवा और दान की राह

आप अपनी श्रद्धा और सामर्थ्य के अनुसार निम्नलिखित तरीकों से इस 'धम्म सेवा' का हिस्सा बन सकते हैं:

  • मासिक सहयोग Click here: हर महीने एक छोटी राशि दान कर हमारे दैनिक संचालन और रखरखाव को निरंतरता प्रदान करें।
  • वार्षिक सदस्यता Click here: एक वार्षिक संकल्प लेकर केंद्र के भविष्य को सुरक्षित और सुदृढ़ बनाने में मदद करें।

"दान देने से धन घटता नहीं, बल्कि पुण्य और संतोष की वृद्धि होती है।"

आइए, मैत्री और करुणा के इस अभियान को रुकने न दें।

मैत्रीपूर्ण अभिवादन,

धम्मचारी  रत्नसंभव

संपर्क: 9420881780

सतिपठ्ठान सूत्त

18-01-2026

By 10/02/2026 Center - Retreat Center Bordharan

सतिपठ्ठान सूत्त यह भगवान बुद्ध की महत्वपूर्ण शिक्षाओं में से एक है। इस शिक्षा के मुख्य तत्वों का स्पष्टीकरण तथा प्रत्यक्ष ध्यान साधना में उसका उपयोग इस शिविर में सिखाया जाता है।


इस शिविर में शामिल होने के लिए किसी पूर्व अनुभव की आवश्यकता नहीं है। अपने जीवन को बेहतर और अर्थ पूर्ण करने के लिए जो बौद्ध शिक्षा को अपनाना चाहते हैं, उसके अनुसार जीना चाहते हैं, वह सभी इस शिविर में शामिल हो सकते हैं।


DONATION APPEAL SPRC BHAJE

15-01-2026

By Ratnasambhava Center - Retreat Center Bhaje

The Triratna Buddhist Community, founded by Urgyen Sangharakshita, stands as a unique, non-sectarian movement that draws teaching from all major Buddhist traditions. Deeply inspired by Dr. Babasaheb Ambedkar, it embodies his profound vision of a Buddha dedicated to social service and the true reformation of the human mind.

This vision comes alive at the Saddhamma Pradeep Retreat Centre (SPRC). Established in 1983, located at the edge of the forest near the historic Bhaja Caves, SPRC serves as one of the first Triratna retreat center in India. It creates the ideal conditions for anyone to learn and deepen their practice of Buddhism and meditation, offering a vital conditions, where individuals can express themselves freely and access the inner resources necessary to truly transform their lives.

Help Us Keep the Light Burning

We urgently request your support to sustain this beacon of hope. Because SPRC has no permanent source of income, we face a significant financial challenge; retreat fees cover only a fraction of our running costs, as we are committed to supporting many retreatants who are unable to pay. Consequently, we rely entirely on the generosity of friends and well-wishers like you to bridge this gap. Your contribution is not just a donation—it is a contribution in a community that empowers individuals to change their narratives. We invite you to give freely for this noble cause.

Ways to Give

Our new payment gateway makes supporting us easier than ever:

Monthly Donation: Donations are automatically deducted from your account each month. Please click here to support us.

Yearly Subscription: Become a pillar of our future- a Yearly gift provides the steady foundation. Please click here to support us.

With Metta 

Ratnasambhava (Mob: 9420881780)

बुद्धयान त्रैमासिक

05-01-2026

By Vijitadhamma Center-Triratna

प्रिय बंधू आणि भगिनीनो

नमो बुद्धाय जयभीम

बुद्धयान त्रैमासिक  वर्ष 46 अंक 4 ,2025 चा अंक नुकताच हाती पडला. त्याचे शिर्षक  "मैत्रीभावना : चित्ताची शुद्धता"  असे आहे. मुखपृष्ठ  अतिशय सुंदर आहे. पाहताच क्षणी बुध्दाची  निळ्या रंगाची प्रतिमा , डाव्या हातात भिक्षा पात्र आणि उजव्या फुलाची डहाळी, मन तथागत  भगवान बुद्ध याच्या सुंदर रुपावर आकर्षित  झाल्या शिवाय रहात नाही. माझेही तसेच झाले. काही वेळ मी पहात राहीलो.

त्यात  एकुण पाच लेख आणि संपादकीय  असे मीळुन सहा लेख आहेत.

संपादकीय सदरात 'रथ मागे कि पुढे' या विषयावर सुंदर  विचार करायला भाग पाडणारे  संपादकीय  विचार मांडलेत.

पहीला लेख:-  मैत्रीभावना चित्त्ताची शुद्धताहा धम्मचारी सुचिरत्न यानी लिहीला आहे, मैत्री भावनेची सविस्तर  माहीती आपणास  या लेखातुन मिळेल.

दुसरा लेख:- ,अबिदिना डिनोच्या चित्रातील बुद्धाचे अंतरंग, हा लेख धम्मचारी आर्यछंद यानी लिहीला आहे. हा लेख मला दोन वेळावाचावा लागला. हा चित्रकार तुर्की आहे त्याला एका कवीने happyness विषयाला धरुन चित्र काढावे अशी विनंती कली आणी त्या चित्रात बुद्धाचे अंतरंग चित्रीत केले.तो चित्र कसे काढतो.त्या चित्रामागे कोणत्या भावना असतात. याची माहीती आपणास या लेखातुन मिळेल. तसेच तथागत भगवान बुद्धाचे अंतरंग दाखवणारे प्रत्यक्ष चित्रही या अंकात आपणास  पहायला मिळेल.

तिसरा लेख: ईच्छाशक्ती परिवर्तनाचा कर्म या विषयी धम्मचारी यशोसागर यांचा लेख आहे. या लेखातही लेखकाने ईच्छाशक्तीचे महत्व प्रतिपादन केले आहे. स्वतःमद्येबदल घडवुन आणायचा असेल तर ईच्छाशक्ती महत्वाचे आहे. असे नमुद केले आहे.

 चौथा लेख:- व्यक्तीविकास आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, हा लेख धम्मचारी प्रबोधरत्न यानी लिहीला आहे. यात लेखकाने व्यक्तींचा विकास हा व्यक्तीपुरता मर्यादित नाही. तर समाज विकासाशी संबधित आहे. तसेच व्यक्तिगत  विकास म्हणजे, मैत्री, करुणेचा विकास, समता स्वातंत्र्याचा विकास,   न्यायाचा विकास यावर अवलंबन आहे.

पाचवा लेख:- धर्मातंराचा मुख्य उद्देश्य-मनाचा सर्वोच्च  विकास, हा लेख धम्मचारी कर्मवज्र यानी लिहीला आहे. या लेखात लेखकाने केवळ सांस्कृतिक  पातळीवरील बदल महत्वाचे नसुन मनाचा उच्चतम  विकास अर्थात लोकोत्तर अवस्था प्राप्त करावा लागेल  तरच आपण बौद्ध  आणि बौद्धेतरात बदल घडवुन आणु शकतो. असे नमुद केले आहे.

हा सुंदर आणी सप्तरंगी अंक दिसायला जसा आकर्षक, सुंदर  आहे. तसाच वाचनीय  व संग्रही ठेवावा तसेच मित्राना व नातेवाईकाना भेट देण्यासही  उपयोगी आहे.

हा अंक प्रकाशित  करण्यासाठी आपले योगदान  देणारे संपादकीय  मंडल, तसेच या अंकात लेख लिहुन धम्मजागृतीस हातभार लावणारे लेखक याना धन्यवाद आणि नव वर्षाच्या शुभेच्छा.

धम्मचारी विजीत्तधम्म

दि. 02.01.2025

 हा अंक आपणास जवळच्या  त्रिरत्न बौध्द महासंघ केंद्रात  मिळु शकेल. किवा आपण धम्मचारी अमृतकुमार : 883 045 3882 यांच्याशी संपर्क साधू शकता.

DONATION APPEAL BHOPAL

04-01-2026

By Kumarvajra Center - Bhopal

नमो बुद्धाय, जय भीम!

प्रिय धम्म बंधुओं और बहनों,

त्रिरत्न बौद्ध संस्थान धम्म के प्रचार-प्रसार, शिक्षा और समाज सेवा के कार्यों में निरंतर समर्पित है। केंद्र की गतिविधियों को सुचारू रूप से चलाने और भविष्य की योजनाओं को साकार करने के लिए हमें आपके नियमित सहयोग की आवश्यकता है।

धम्म दान केवल आर्थिक सहायता नहीं है, बल्कि यह समाज के प्रति हमारी जिम्मेदारी और धम्म के प्रति हमारी श्रद्धा का प्रतीक है। हम आप सभी से विनम्र निवेदन करते हैं कि संस्थान की मजबूती के लिए अपना मासिक योगदान सुनिश्चित करें।

आप अपनी इच्छा और सामर्थ्य के अनुसार नीचे दिए गए तीन विकल्पों में से किसी एक को चुन सकते हैं:  ₹ १४९ प्रतिमाह, १९९ प्रतिमाह, २९९ प्रतिमाह 

मै योगदान देना चाहता हूँ (योगदान देने के लिए क्लिक करे) DONATE 

१.        "जैसे जल की एक-एक बूंद से घड़ा भर जाता है, वैसे ही आपका छोटा सा मासिक दान धम्म कार्य में एक बड़ी क्रांति ला सकता है।"

आपका सहयोग, हमारी शक्ति!

भवदीय,

धम्मचारी कुमारवज्र 

 

नवनिर्वाचित विश्वस्त कार्यकारिणी

02-01-2026

By Dh. Punyghosha Center - Thane

त्रिरत्न बौध्द महासंघ ठाणे केंद्राचे नवनियुक्त अध्यक्ष ( Chairman) धम्मचारी अक्षयगुण, उपाध्यक्ष (Deputy) धम्मचारीणी उत्पला, चिटणीस ( सेक्रेटरी-Secratary ) धम्मचारी धम्मकीरण व खजिनदार ( Treasure) धम्मचारीणी जयाप्रिया, तसेच विश्वस्त सदस्य धम्मचारी अचलदीप, धम्मचारीणी संघह्दया व क्षांतीश्री* यांचा  आज दिनांक ०१ जानेवारी २०२६ रोजी सिध्दार्थ बुध्द विहार, बबनराव शिंदे सभागृह, सिध्दार्थ नगर कोपरी कालीनी ठाणे (पुर्व ) ठाणे येथील साप्ताहिक वर्गात सत्कार व स्वागत समारंभ संपन्न झाला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन धम्मचारी शिलसंभव यांनी केले व साप्ताहिक वर्गाचं नेतृत्व धम्मचारी वसितकुमार यांनी केले

या कार्यक्रमास मोठ्या संख्येने धम्मचारी, धम्ममित्र, सहायक व संघ हितचिंतक उपस्थित होते

सर्व नवनिर्वाचित विश्वस्त कार्यकारिणी यांचे हार्दिक अभिनंदन. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा....

मैत्रीसह त्रिरत्न बौद्ध महासंघ, ठाणे

धर्मांतराचा खरा अर्थ: सांस्कृतिक ओळखेपलीकडील बौद्ध धम्म

31-12-2025

By Karmavajra Center-Triratna

धर्मांतराचा खरा अर्थ: सांस्कृतिक ओळखेपलीकडील बौद्ध धम्म

हा लेख मी बाबासाहेबांच्या बौद्ध अनुयायांना लक्षात ठेऊन लिहित आहे. १४ ऑक्टोबर १९५६ ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले धर्मांतर हा एक ऐतिहासिक निर्णय होता. 'मी हिंदू म्हणून जन्मलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही' या त्यांच्या घोषणेतून जी मुक्तीची भूमिका रेखाटली गेली, ती आजही प्रासंगिक आहे. पण आज, जेव्हा आपण धर्मांतराच्या ७० वर्षांनंतरच्या परिस्थितीकडे पाहतो, तेव्हा एक मूलभूत प्रश्न उभा राहतो: बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचा खरा उद्देश काय होता? केवळ सामाजिक-आर्थिक उन्नती, राजकीय सक्षमीकरण आणि सांस्कृतिक पुनरुत्थान? की त्याहीपेक्षा काही अधिक गहन - मनाची मुक्ती आणि बौद्ध धर्मातील 'बुद्धत्व' प्राप्तीचा मार्ग?

आपणास माहित आहे बाबासाहेबांच्या धर्मांतराला बहुविध आयाम आहेत, यामुळे आर्थिक,सामाजिक, राजकीय, संस्कृतीक स्तरावर समाजाचा सर्वांगीण विकास झाला आहे,याचे गमक विचारसारणीत झालेला बदल आहे.बौद्ध धर्मामुळे आपल्या संपूर्ण विचारसरणीत बदल झालेला आहे. आपन हे जाणू शकतो की आंबेडकरी अनुयायाचा विकास केवळ आरक्षणामुळे झाला नसून त्याचे गमक धर्मान्तरामध्ये आहे. आंबेडकरी बौद्ध अनुयायी आणि इतर अनुसूचित जातीतील  समाजाशी तुलना केल्यास हा फरक आपणास लक्षात येईल. अजूनही बऱ्याच भारतीय अभ्यासकांना याचे महत्व लक्षात येत नाही, काही लोकांना अजूनही वाटते कि हा बाबासाहेबांचा राजकीय किंवा सामाजिक डाव होता.

आपण सर्व बौद्ध धर्माचे उपासक आहोत, आता महाराष्ट्रात किंबहुना भारतात बोद्ध धर्माला मानणारा समाज आहे आणि दिवसेंदिवस याची संख्या वाढत आहे. आता साधारणः धर्मांतरानंतर ची  तिसरी पिढी आहे जी बोद्ध धर्माला आपला धर्म म्हणून स्वीकारत आहे, हि अशी पिढी आहे ज्याचे वडील सुद्धा १९५६ च्या धर्मांतर सोहळ्यात नव्हते. विशेषतः अशी तरुण पिढी आहे बौद्ध कुटुंबात जन्म झाला असल्यामुळे बौद्ध आहे  किंवा जे बाबासाहेब आंबेडकरांना मानतात आणि त्यामुळे ते बौद्ध आहेत. सांस्कृतिक स्तरावर बौद्ध होने हे वाईट नाही, परंतु माझे असे मत आहे हे पुरेसे नाही, बौद्ध धर्माचा उद्देश केवळ लग्नविधी करणे, जन्म मृत्यू वेळी पूजापाठ करणे एवढ्यापुरता मर्यादित नाही,

बौद्ध समाजाचे निरीक्षण केले असता आपणास हे लक्षात येईल, काही बौद्ध कुटुंबातील तरुण तरुणी मध्ये  अजूनसुद्धा बौद्ध धर्मामध्ये रुची निर्माण झालेली नाही, बौद्ध धर्माविषयी त्यांना प्राथमिक माहितीचा सुद्धा अभाव आहे, किंबहुना हिंदू धर्मातील चालीरितीचे पालन करण्यास त्यांना काही वाईट वाटत नाही. दुसऱ्या स्तरात आपणास समाजात एक असा वर्ग पहावयास मिळतो जो १४ एप्रिल, बुद्ध जयंती व सगळे धार्मिक सन साजरे करतो, त्यांच्या कुटुंबांमध्ये नामकरण, विवाह प्रसंगी वंदना पूजा करतात परंतु मासाहार करणे, प्रसंगी मद्यपान करणे यासारख्या बौद्ध धर्माशी विसंगत असणाऱ्या गोष्टी करण्यात त्यांना काही वाईट वाटत नाही. नैतिक आचरण करण्याकडे अजून त्यांची रुची निर्माण झाली नाही. एक प्रकारे सांस्कृतिक स्तरावर ते बौद्ध आहेत

माझ्या मते बाबासाहेबांसाठी बौद्ध धर्माचा अर्थ वेगळा होता, बाबासाहेब बौद्ध धर्माकडे मनाच्या विकासाचा मार्ग म्हणून पाहत होते. बाबासाहेब म्हणतात “तुमच्यासाठी हे धर्मांतर सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे, परंतु माझ्यासाठी मात्र हा अध्यात्मिक विकासाचा मार्ग आहे.  त्यांचा विश्वास होता मनुष्य म्हणून मनाचा सर्वोच्च विकास करणे हे द्येय्य असावयास पाहिजे “ Cultivation of mind should be the ultimate aim of human existence.” आणि  त्यांचा हा विश्वास होता कि, मनाचा विकास केवळ बौद्ध धर्माने होऊ शकतो कारण बौद्ध धम्माच्या केंद्रस्थानी मन आहे किंवा आपणास असे म्हणू शकतो, सर्व बौद्ध परंपरा किंवा  ग्रंथ संपदा मनाचा अभ्यास करण्यासाठी, मनाला प्रशिक्षण देण्यासाठी  निर्माण केलेली आहे. मग तुम्ही धम्मपदातील पहिली गाथा घ्या “मनो पुब्बङ्गमा धम्मा, मनोसेट्ठा मनोमया।” किवा महायानातील शून्यता संकल्पना घ्या किंवा झेन परंपरा चा अभ्यास करा.

बौद्ध धर्म मानतो की बुद्धत्व ही मनाची सर्वोच्च अवस्था आहे आणि  मनाचा अभ्यास करून ती अवस्था प्राप्त करणे हा बौद्ध धर्माचा मुख्य उद्देश आहे. या अर्थाने कधीकधी आपण सुद्धा स्वतःला प्रश्न विचारण्यास हरकत नाही कि, मनाचा सर्वोत्तम विकास म्हणजे काय ? बुद्धाचा नेमका शोध काय आहे? त्यांना बुद्धत्वप्राप्ती झाली म्हणजे नेमके  काय झाले  ?

माझे असे मत आहे कि बौद्ध धर्माची वाटचाल हि एक शोध (quest) आहे, एक प्रवास आहे जो सांस्कृतिक स्तरापासून सुरु होतो आणि बुद्धत्वप्राप्ती (संपूर्ण दु;ख मुक्ती) पर्यंत जातो. आणि या प्रवासात आपणास अभ्यास, चिंतन (ध्यान, समाधी) आणि अनुभवी सहकाऱ्याची (विद्याचरण व्यक्ती) गरज असते. जसे मी लेखात व्यक्त केले बौद्ध धर्माचा उद्देश केवळ चांगली संस्कृती निर्माण करणे, किंवा केवळ कथित नीतिमान समाज (आदर्शवत कल्पना जसे कि वर्ल्ड पीस) हा नसून जीवमात्राला सर्व संस्कारित क्लेशापासून मुक्त करणे हा आहे. सर्व सांसारिक चिंता,अस्वस्थता, भीती यापासून मुक्त करणे हा आहे, मग ती मृत्यूची भीती असो, नोकरी जाण्याची किंवा आपल्या मुलामुलीच्या भविष्याची. भगवान बुद्धांचा हेतू हा सर्व जीवमात्राला दु:खातून मुक्त करणे हा आहे.

  ‘दु:ख’ या शब्दाची व्याक्या शब्दशास्त्रात या प्रकारे केली जाते ‘दु’ म्हणजे वाईट या अर्थाने (दुर्गुण इ.) ‘ख’ आकाश किंवा खोदने  या अर्थाने निर्माण झाला आहे. (आकाश हा शब्द रिक्तता या अर्थाने, किंवा सुखासाठी खोदत राहणे, शोध घेत रहाणे आहे) याचा अर्थ रिक्तता किंवा असमाधानामुळे येणारी वाईट मनोवस्था. आपण जीवनाचे थोडे निरीक्षण केले असता आपणास लक्षात येईल, कितीही चांगली परिस्थिती प्राप्त झाली असो आपले मन असमाधानी असते,आपल्याकडे आहे त्यापेक्षा काहीतरी वेगळे शोधत असते, नेहमी ती रिक्तता जाणवत राहते. मग ती रिक्तता काही लोक नशेचा वापर करून ,आपण टी.व्ही.मोबाईल मध्ये रममाण होऊन, चांगले जेवण, शक्य असल्यास पर्यटन करून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे जीवन जगत असतांना, कौटोंबिक समस्या, त्याच प्रकारे विपरीत सामाजिक व्यवस्था, अस्थिर राजकिय परिस्थिती, आर्थिक असमानता अश्या कितीतरी समस्या आपणा समोर उभ्या ठाकलेल्या आहेत ज्याचे उत्तर शोधणे आपल्या समोरील मोठे आव्हान आहे . बुद्धांचा हा शोध होता कि या सर्व समस्याचे मूळ मनात आहे आणि मनाचा अभ्यास करून या समस्येवर मात करता येते, आपल्या मनाला प्रशिक्षित करून यातून मुक्त होता येते.

या अर्थाने बौद्ध धर्माकडे पाहण्याची सुरुवात केल्यास आपण बौद्ध धर्माकडे पूर्ण अर्थाने पाहू शकतो. केवळ बौद्धीक स्तरावर का होईना आपण बुद्धत्वप्राप्ती ही संकल्पना समजण्याच्या जवळ जाऊ शकतो, बुद्धांना बुद्धत्वप्राप्ती झाली म्हणजे नेमके काय झाली याची अंशमात्र का होईना थोडी कल्पना येऊ शकते.

आता बौद्ध धर्माचा अभ्यास करतांना बऱ्याच संभ्रमाचा आपणास सामना करावा लगतो. आपणास माहित आहे कि धर्मांतराच्या ६ आठवड्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचे परीनिर्वाण झाले त्यामुळे बौद्ध धर्माचे प्रशिक्षण देण्याकरिता त्यांना पुरेसा वेळ मिळाला नाही. ग्रंथ आणि बौद्ध साहित्य इतके विशाल आहे कि त्या संपूर्ण साहित्याचा अभ्यास करणे एक जीवनकाळात अशक्यप्राय अशी गोष्ट वाटते. केवळ पाली साहित्याचा विचार केला तरी त्रीपिठ्क आणि त्यावरील अठ्ठकथा आणि  टीका (commentary) चा मोठा ग्रंथ समुदाय आहे, संस्कृत आणि महायानी साहित्य तर यापेक्षा मोठे आहे. २५०० वर्षात भगवान बुद्धानंतर कितीतरी बौद्ध धर्माचे आचार्यांनी यात महत्वपूर्ण भर टाकली आहे.

कधी कधी असा कल पहावयास मिळतो कि केवळ त्रिपिठ्क किवा पाली भाषेत लिहिलेले साहित्याच हेच प्रामाणिक, खरे  (Authentic)आहे. कुणासाठी बाबासाहेबांनी लिहिलेला “बुद्ध आणि त्याचा धर्म” ही ग्रंथ धम्म आचरण करण्यास पुरेसा असू शकतो. परंतु समाजात बरेच उपासक (अभ्यासक) असे असू शकतात त्यांना बौद्ध धर्मातील इतर संदर्भ हवे असतात. आपणास  वैचारिक विस्ताराची संधी आहे, बौद्ध धर्माच्या अभ्यासाच्या बाबतीत आपण स्वतःस संकुचित करू नये आणि मला वाटते बौद्ध अभ्यासाला संपूर्णता देण्यासाठी विविध परंपरांकडे पाहणे उपयुक्त ठरू शकते. आता भारतात सुद्धा आपणास बौद्ध साहित्याचा अभ्यास करण्यासाठी बऱ्याच संधी उपलब्ध होत आहे, पुणे मुंबई सह बऱ्याच विद्यापीठमध्ये बौद्ध धर्म अध्ययन विभाग निर्माण झाला आहे, ज्यात आपण पाली आणि संस्कृत बौद्ध साहित्याचा अभ्यास केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे आपणास तिबेटन भाषेतून जर बौद्ध साहित्याचा अभ्यास करण्याची इच्छा असेल तर हिमाचल प्रदेश तथा कर्नाटक मध्ये मोठमोठ्या तिबेटन शाळा (युनिव्हर्सिटी) आहेत तेथे १५ ते २० वर्षापर्यंत बौद्ध धर्माच्या मुलभूत शिकवणी पासून तर बौद्ध प्रमाणशास्त्र (Buddhist logic) चा अभ्यास केल्या जातो. त्याचप्रमाणे त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये सुद्धा बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी चांगली सोय उपलब्ध आहे, नागलोक नागपूर येथे जवळपास १६ एकर परिसरात बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी मोठा कॅम्पस निर्माण केला आहे. याहीपेक्षा अनेक संस्था आहेत जे बौद्ध साहित्याचा अभ्यास करण्यासाठी कटिबद्ध आहेत ज्याचा लाभ घेऊन आपण आपली बौद्ध धर्माबाबत समज सखोल करू शकतो.  एकदा मी हिमाचल प्रदेश मध्ये असतांना एका तरुण जोडप्याची भेट झाली ते आफ्रिका खंडातील एका छोट्याश्या देशातून आला होता, केवळ तिबेटन भाषा शिकण्यासाठी ते पुढील दोन वर्ष भारतात राहणार होते. त्यांना माहिती दिली के त्यांच्या पूर्ण देशात मिळून बौद्धाची संख्या ५० ज्या जवळपास असेल. हिमाचल प्रदेश मध्ये भ्रमंती करीत असतांना असे अनेक प्रेरणादायी बौद्ध व्यक्तीशी आपली भेट होऊ शकते.

बौद्ध धर्माची मोठी संस्कृती आहे २५०० वर्षात बोद्ध धम्माच्या अनेक शाखा (Schools) निर्माण झाल्या, आपणास कदाचित हीनयानम महायान व वज्रयान माहित असेल परंतु योगाचारा, माध्यामिका, झेन इ. पूर्ण जगातील विचार करता हजारो शाखा (Schools) आपणास पहावयास मिळतात. बौद्धगया, सारनाथ येधे गेल्यास प्रत्येक देशाचे, प्रत्येक परंपरेचे विहार आपणास दिसते. वर्तमान काळात आधुनिक रुपात भारतीय बौद्ध महासभा, विप्पसना, त्रिरत्न बौद्ध महासंघ, भिक्षु संघ, तिबेटन संघ इ. भारतात सुद्धा पहावयास मिळते आणि आपणास संभ्रम निर्माण होऊ शकतो कि यापैकी कुठली परंपरा आपणासाठी योग्य आहे.

आता काही बौद्ध अनुयायांचा कल या संपूर्ण परंपरेला नाकारण्याचा असतो, त्यांचा असा विश्वास असतो कि बाबासाहेब यांनी आपणास बुद्धयान दिले आहे आपण फक्त त्याचेच अनुकरण केले पाहिजे. कधीकधी आपणास ज्या परंपरेत (school) आपण आहोत तीच परंपरा किती बरोबर आहे व सगळ्यांनी त्याच परंपरेत येऊन अभ्यास केला पाहिजे हा दुराग्रह पहावयास मिळतो . कोणी भारतीय बौद्ध महासभेविषयी बोलत असतो, तर कुणी विप्पसना किती बरेबर आहे, किंवा टी.बी.एम.एस.जी मध्येच कसा आध्यात्मिक विकास होतो या विषयी आग्रही असतात . मला वाटते याही बाबतीत आपण संकुचित होता कामा नये, आपण बौद्ध धर्म शिकण्यासाठी खुले असावे . आपण ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन चालूया  की २५०० वर्षापासून चालत आलेल्या बौद्ध परंपरेतील आपली स्थिती नवागताची आहे आणि आपणास मदतीची गरज आहे. यापैकी काही परंपरा चांगल्या असू शकतात ज्या आपल्याला धम्म समजून घेण्यास मदत करू शकतात.

१४ आक्टोबर १९५६ ला जेव्हा धर्मांतराच्या वेळेस बाबासाहेब आंबेडकरा समोर मोठे आव्हान होते कि त्यांना समाजास हिंदू धर्मातील अंधश्रद्धेतून बाहेर काढावयाचे होते त्याचसोबत मानवी मुक्तीचा मार्गही दाखवायचा होता. (२२ प्रतिज्ञाचा अभ्यास केल्यास आपणास हे दिसून येईल). पाली साहित्याचा अभ्यास केल्यास आपणास लक्षात येईल कि बौद्ध धर्म सांगताना पहिला टप्पा लोकांना चुकीच्या सामाजिक रीतिरिवाजातून बाहेर काढून तर्कशुद्ध विचार करणे शिकविणे हा आहे परंतु बौद्ध धर्म इथपर्यंतच मर्यादीत नाही, तर दुसऱ्या स्तरात सामान्य तर्काच्या पलीकडे जाऊन संपूर्ण सत्य जाणण्यासाठी मदत करतो.

माझे असे मत आहे कि आपण केवळ  वैज्ञानिक तर्काच्या आधारावर संपूर्ण बौद्ध धर्म समजून घेऊ शकत नाही. मी लहान असतांना जातक कथा वाचतांना सगळे  बोधिसत्व वाराणसीलाच का जन्म घेतात, जातक कथेमधील हरीण किंवा ससा कसा बोलू शकतो, किंवा बोधीसत्वाचा पुनर्जन्म कसा झाला असे प्रश्न असायचे. किवा जेव्हा बौद्ध धर्माच्या पहिल्या प्रशिक्षण शिबिरात गेलो असतांना (बुद्ध आणि त्यांचा धम्म यात उल्लेख आलेले) “ते पात्र प्रवाहाच्या उलटे कसे गेले” याप्रकारचे माझे प्रश्न असायचे. बहुदा आपला धार्मिक प्रवास याच प्रकारे सुरु होतो सर्वप्रथम आपण प्रत्येक गोष्ट आपली बुद्धिमत्ता वापरून तर्क लावून तपासून बघत असतो.

बौद्ध धर्माचा अभ्यास करतांना प्रकर्षाने एक तत्व पाळावे लागते  प्रत्येक शिकवणीचा अभ्यास करतांना त्याचा संदर्भ लक्षात घ्यावा लागतो. ती शिकवण कुणास दिली आहे, आणि त्या कथेमागील उद्देश काय आहे हे लक्षात घ्यावे लागते. भगवान बुद्धांनी त्यांच्या जीवनकाळात बऱ्याच शिकवणी दिल्या आहेत, सारीपुत्र यांना त्यांनी तत्वज्ञानाच्या रुपात धर्म सांगितला आहे तर किसा गौतमी ला प्रासंगिकपणे धर्म सांगितला आहे. पाली साहित्य आणि महायानसूत्राचा अभ्यास करतांना अश्या बऱ्याच गोष्टी आपल्या निदर्शनात येईल ज्या आपल्या आकलना बाहेरच्या आहेत, सामान्य प्रमाण (logic) वापरून याला समझने कठीण आहे. कदाचित जातक कथेत आलेला ससा किवा हरीण बोललाच कसा याचे उत्तर आपणास मिळणार नाही परंतु त्यातून होणारा नैतिक बोध मात्र आपल्याला मिळू शकते. याच प्रकारे थेरवादी (हीनयान) आणि महायान सुत्रात सुद्धा आपणास विरोधाभास पहावयास मिळतो. प्रत्येक वेळी अभ्यास करतांना आपणास हे तत्व पाळावे लागते कि ती शिकवण कुणास दिली व त्याद्वारे कुठले धम्मतत्व भगवान बुद्धांना सांगावयाचे आहे. अन्यथा बौद्ध साहित्यात हरवून जाऊन मुलभूत शिकवणी पासून आपण दूर जाऊ शकतो.

बुद्धं शरणं गच्छामि,  धम्मं शरणं गच्छामि , संघं शरणं गच्छामि या गाथेतील गच्छामि या शब्दाचा अर्थ मी जातो असा आहे. जसे मी आधी म्हटले हा एक हा एक शोध आहे हा एक मनाला जाणण्या साठीचा प्रवास आहे. आणि या प्रवासात अनेक टप्पे आहेत. थेरवादी (श्रावकयान) परंपरे नुसार पाली साहित्यात श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अर्हंत असे टप्पे सांगितले जातात. हे स्तर कदाचित आपल्या आवाक्याबाहेरचे वाटू शकतात परंतु किमान हा प्रश्न आपण स्वतःस विचारू शकतो कि या बौद्ध धर्माच्या प्रवासात मी कुठे आहे ! काय माझा प्रवास परिणामकारक चालला आहे ? काय सांस्कृतिक पातळी पेक्षा मी दोन पावले पुढे टाकले आहे ? काय खरोखरच दु;खातून मुक्त होण्यासाठी माझे प्रयत्न चालले आहे ?

 समाजात अनेक स्तरावरचे बौद्ध आपणास दिसून येतात, उदाहरणा दाखल एक प्रसंग सांगू इच्छितो, मी एकदा २० मार्चला महाडला गेलो होतो, मानवंदना देण्यासाठी बरेच उपासक तिथेआले होते, तिथे एक गृहस्थ जोरजोरात जयभीमचा नारा देत जात होते, परंतु त्यांना व्यवस्थित चालता पण येत नव्हते, बहुदा त्यांनी दारू घेतलो होती, व दारूच्या नशेतच ते जयभीम चा नारा देत जात होते(मला त्यांना दोष द्यायचा नाही). आपण सुद्धा असे बरेच उदाहरण देऊ शकाल अश्या प्रकारचे वेगवेगळ्या स्थरातील बौद्ध व्यक्ती आपल्या समाजात बघावयास मिळतात आपण कुणास तू बौद्ध नाही असे म्हणू शकत नाही.

कधीकधी मला वाटते कि हा सगळा अभ्यास, आचरणाचा भाग आपण भिक्षु, भिक्षुणी वर टाकून आपण साधे उपासक रहाण्यावर समाधानी राहू इच्छितो, धर्म अभ्यास आणि आचरण अधिक सखोल करण्यासाठी कुणी भिक्षु किंवा भिक्षुणी होत असेल तर त्यांचा आदरच  केला पाहिजे, किंबहुना आपण त्यांना यथाशक्ती मदत केली पाहिजे परंतु आपण केवळ उपासक राहण्यावर समाधानी राहता कामा नये. बाबासाहेबांचा विश्वास होता कि उपासक सुद्धा बौद्ध धर्माचे परिणामकारक आचरण करू शकतात.

आंबेडकरी बौद्ध अनुयायत एक गोष्ट मात्र प्रकर्षाने दिसून येते कि ते बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी हिरहिरीने भाग घेतात. बऱ्याच बौद्ध अनुयांची इच्छा असते की बौद्ध धर्मास त्याचे पुनर्वैभव प्राप्त व्हावे, पूर्ण भारत बौद्धमय व्हावा . मला वाटते हा अतिशय सकारात्मक दृष्टीकोन आहे. इतर राज्यात भ्रमंती करत असतांना माझा असा अनुभव आहे कि जिथेकुठे आंबेडकरी अनुयायी जातात तिथे पुढाकार घेऊन एकत्र येतात आणि कार्य सुरु करतात, कमीत कमी पूजा, वंदना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती अश्या प्रकारचे उत्सव साजरे करायला सुरवात करतात.

जेव्हा आपण बौद्ध धर्माच्या प्रचाराचा विचार करतो तेव्हा एक प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. ‘इतर धर्माच्या लोकांनी बौद्ध का व्हावे ?’ का म्हणून त्यांनी त्यांचा धर्म सोडवा ? माझा असा विश्वास आहे कि केवळ सामाजिक सुधारणेसाठी कुणी आपला धर्म सोडणार नाही. सांस्कृतिक रित्या बघितले तर ते त्यांच्या धर्मात आनंदी आहेत उलटपक्षी  हिंदू धर्मात जास्त सन आणि उत्सव आहेत, आणि मला वाटते केवळ सांस्कृतिक स्तरावर जर बौद्ध धर्माचा विचार केला तर याचे सकारात्मक उत्तर आपणास मिळू शकत नाही. आपण जर केवळ सांस्कृतिक स्तरावरच जर बौद्ध धर्माचा विचार करत असू तर आजच्या तरुण पिढीला सुद्धा आपण उत्तर देऊ शकणार नाही, आपल्या परिवारातील तरुण सदस्यांना सुद्धा बौद्ध धर्माकडे आकर्षित करू शकणार नाही.

भारतात बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ ला केलेल्या धर्मांतरानंतर (ज्याला आपण धम्मचक्र प्रवर्तन म्हणतो) भारतात धम्मचक्र गतिमान झाले. भूतकाळात वैभवशाली अस्तित्व असलेल्या धर्माला बाबासाहेब आंबेडकर यांनी पुनर्जीवित केले, त्याला जिवंतरूप दिले. परंतु बौद्ध धर्म तेव्हाच जिवंत होऊ शकतो जेव्हा तो आपल्या आचरणात असेल, संपूर्ण विमुक्ती च्या अर्थाने तो आपल्या जीवनात असेल, आपला प्रत्यक्ष अनुभव असेल. धम्म हा केवळ तत्वज्ञान नसून तो भगवान बुद्धांचा अनुभव आहे ज्याने २५०० वर्षात  केवळ भारतातील नव्हे तर जगातील करोडो लोकांच्या जीवनात प्रकाश आणला आहे. आता जेव्हा आपण धर्मांतराच्या सुवर्णमहोत्सवाच्या (७५ वर्षा) उंबरठ्यावर उभे आहोत, तेव्हा हा प्रश्न स्वतःला विचारणे गरजेचे आहे: आपण बौद्ध धर्माला केवळ सांस्कृतिक ओळख म्हणून स्वीकारलं की त्या पलीकडे जाऊन 'बुद्धं शरणं गच्छामि' या शब्दांना खरा अर्थ दिला? बाबासाहेबांच्या शब्दांत - 'धर्मांतर हा तुमच्यासाठी सामाजिक विकासाचा मार्ग असेल, पण माझ्यासाठी तो मनाच्या परिपक्वतेचा प्रवास आहे' . हा प्रवास आपण किती अंतर पार केलाय, याचा आत्मपरीक्षण करण्याची ही योग्य वेळ आहे.


कर्मवज्र

२१ जुलै २०२५

बुद्धत्व मानवाचा आदर्श शिवीर भाजे

21-12-2025

By Bhaje Team Center - Retreat Center Bhaje

सद्धम प्रदीप शिवीर केंद्र भाजे

बुद्धत्व मानवाचा आदर्श’ या प्रमुख विषयावर आधारित सहा दिवसीय धम्मशिबिराचे आयोजन १२ ते १७ डिसेंबर २०२५ दरम्यान भाजे शिवीर केंद्र येथे करण्यात आले. या शिबिराचे मार्गदर्शन धम्मचारी प्रज्ञादित्य यांनी करत सहभागींचे मन:संस्कार घडवले.

बुद्धत्व मानवाचा आदर्श’ हा शिबिराचा मुख्य आशय ठेवून विविध प्रवचन सत्रे, संवाद, ध्यान व चिंतनाच्या माध्यमातून बुद्धत्व कसे सर्व मनुष्यमात्रा साठी कसा आदर्श आहे यावर सखोल विचारमंथन करण्यात आले.

एकूण २० धम्ममित्र व धम्मचारिणींनी या शिबिरात सहभागी होऊन धम्मविषयक चिंतनाचा लाभ घेतला. सहभागींच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे शिबिराचे वातावरण प्रसन्न, आत्मीय व अभ्यासपूर्ण राहिले.

शिबिराच्या समारोप सत्रात सहभागी धम्ममित्रांनी आपल्या अनुभवांचे शेअरिंग करून, दैनंदिन जीवनात बुद्दत्त्व आपल्या जीवनात आणण्यासाठी आणि मैत्रीभावाचा अवलंब करण्याचा संकल्प व्यक्त केला. संपूर्ण शिबिरात अतिशय सुंदर, आशयघन व जीवनोन्मुख मार्गदर्शनामुळे सर्वांनी अंतर्मुख होऊन धम्माचा नव्याने विचार करण्याचा लाभ घेतल्याची भावना व्यक्त केली.​​

 

मित्र दीक्षा उल्हासनगर केंद्र

30-11-2025

By Dh Mitra Deepak Center - Ulhasnagar

त्रिरत्न बौद्ध महासंघ, उल्हासनगर येथे दिनांक  ३० नोव्हेंबर २०२५ रोजी मित्र दीक्षा समारंभ अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. या समारंभात मोठ्या संख्येने धम्ममित्र, धम्मचारी आणि स्थानिक बौद्ध बांधव उपस्थित होते.

समारंभाची मुख्य रूपरेषा

  • त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या उल्हासनगर केंद्रात आयोजित या मित्र दीक्षा समारंभात धम्ममार्ग स्वीकारण्याची तीव्र आकांक्षा असलेल्या साधकांनी सहभाग नोंदविला.

  • समारंभाचे वातावरण ध्यान, त्रिशरण–पंचशील उच्चार आणि शुभ मंगलाचारांनी भरून गेले होते.

मित्र दीक्षा ग्रहण करणारे साधक

  • एकूण १६ सहायकांनी औपचारिकरित्या मित्र दीक्षा स्वीकृत करून त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या आध्यात्मिक परिवारात प्रवेश केला.​  दीक्षा घेऊन त्रिशरण व पंचशीलांच्या पालनाची दृढ प्रतिज्ञा सार्वजनिकरित्या व्यक्त केली.

  • प्रमुख मार्गदर्शक व मान्यवरांची उपस्थिती

  • या विशेष प्रसंगी पुणे येथून धम्मचारी आदित्य बोधि यांनी उपस्थित राहून मित्र दीक्षेचे मार्गदर्शन, प्रेरणादायी धम्मदेशना आणि प्रतिज्ञा विधीचे संचालन केले.

  • त्रिरत्न बौद्ध महासंघ, उल्हासनगर मित्र दीक्षा केंद्राचे चेअरमन धम्मचारिनी तारान्विता  यांच्या हस्ते सर्व नवीन मित्रांना दीक्षा प्रदान करण्यात आली व प्रतीकात्मक रूपाने त्रिरत्नांशी नाते दृढ करण्यात आले.

केंद्रातील धम्मकार्याची झलक

  • उल्हासनगर केंद्रातील सर्व धम्मचारी आणि धम्मचारिणी समारंभभर उपस्थित राहून, आयोजन, प्रत्यक्ष दीक्षा विधी आणि साधकांच्या मार्गदर्शनात सक्रिय राहिले.

  • त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या धम्मप्रसार, लिंगसमता आणि सामाजिक परिवर्तनाच्या ध्येयधोरणांच्या पार्श्वभूमीवर हा मित्र दीक्षा समारंभ स्थानिक स्तरावर महत्त्वाचा टप्पा ठरला.

प्रेरणा आणि पुढील वाटचाल

  • नवीन मित्रांनी बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांमध्ये शरण जाऊन स्वतःच्या जीवनात करुणा, प्रज्ञा आणि मैत्री जोपासण्याची प्रतिज्ञा केली.

  • उल्हासनगर केंद्रामार्फत या नवीन मित्रांसाठी नियमित ध्यान वर्ग, धम्मअभ्यास गट आणि प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्याची रूपरेषा जाहीर करण्यात आली, जेणेकरून त्यांची आध्यात्मिक प्रगती सातत्याने घडत राहील.

क्या ईश्वर का अस्तित्व है?' - लल्लनटॉप की बहस और बौद्ध विचार

25-12-2025

By ???????? Center-Triratna

प्रिय भाई और बहनों ,

जयभीम, नमो बुद्धाय 

हाल ही में मैंने 'दी लल्लनटॉप' (The Lallantop) पर ईश्वर के अस्तित्व को लेकर हुई बहस (डिबेट) देखी। इसने मेरे मन में कई विचार जगाए, और मैं इस सनातन प्रश्न पर बौद्ध धर्म का नज़रिया साझा करना चाहता हूँ।

बौद्ध दर्शन एक अनोखा "मध्यम मार्ग" (Middle Way) प्रस्तुत करता है, जो दो अतिवादी विचारों (extremes) से बिल्कुल अलग है:

  1. उच्छेदवाद (Nihilism): यह मानना कि कुछ भी मायने नहीं रखता या किसी चीज़ का अस्तित्व नहीं है

  2. शाश्वतवाद (Eternalism): एक स्थाई आत्मा या रचयिता (ईश्वर) में विश्वास करना।

हम वास्तविकता (Reality) को इस प्रकार देखते हैं:

  • अनात्म (Anatma/Non-Self): हम किसी स्थाई, कभी न बदलने वाली आत्मा या 'स्व' (Self) में विश्वास नहीं करते।

  • दो सत्य (The Two Truths): वास्तविकता को समझने के लिए हमें दो स्तरों में अंतर करना होगा:

    1. व्यावहारिक सत्य (Conventional Truth): हमारे दैनिक जीवन में, आप, मैं, यह ब्रह्मांड और ईश्वर की अवधारणाएं मौजूद हैं और कार्य करती हैं।

    2. परमार्थ सत्य (Ultimate Truth): जब हम चीजों के "असली स्वभाव" (True Nature) को गहराई से खोजते हैं, तो हमें शून्यता (emptiness) मिलती है। कुछ भी अपने दम पर स्वतंत्र या स्थाई रूप से मौजूद नहीं है।

निष्कर्ष: "चित्तमात्र" (Mind-Only) के दृष्टिकोण से, हम जो कुछ भी अनुभव करते हैं वह हमारे मन का ही प्रक्षेपण (projection) है। इसलिए, न तो यह ब्रह्मांड और न ही कोई रचयिता ईश्वर 'परम' (ultimate) रूप में, ठोस या स्वतंत्र रूप से मौजूद है। हमारी धारणा (perception) के बाहर उनका कोई "सच्चा स्वभाव" नहीं है। वे केवल हमारे मन के भीतर अनुभवों के रूप में विद्यमान हैं।

आप इस नजरिए के बारे में क्या सोचते हैं? अपने विचार कमेंट्स में साझा करें।

DONATION APPEAL

21-12-2025

By Karmavajra Center-Triratna

Support Our Mission for Meditation and Moral Living

Triratna Bauddha Sansthan Bhopal dedicates itself to teaching meditation practices and principles of ethical, moral living inspired by Buddhist traditions, reaching youth from Ambedkarite backgrounds across India

Secure Donation Details

Please contribute via bank transfer to:
Account Name: Triratna Bauddha Sansthan Bhopal
Account Number: 38858541589
Account Type: Current A/c
Bank: State Bank of India (SBI)
Branch: Mandankini Bhopal (MP)
IFSC Code: SBIN0016842
MICR Code: 462002029

मित्रदिन, वरुड

15-12-2025

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

मित्रदिन वरुड.दिनांक १४डिसेंबरला मित्र दिनाचे आयोजन करण्यात आले होते.मित्रदिनाचे नेतृत्व धम्मचारिणी श्रद्धाश्री यांनी केले. मित्रांच्या विकासासाठी आवश्यक अश्या बाबी व मित्र समारंभाच्या वेळी घेतलेल्या तीन घोषणा यांचे स्मरण त्यांनी करून दिले. दुपारच्या सत्रात माझ्या शरणगमनावर मित्रांचे मनोगत घेण्यात आले. मोकळ्या मनाने मित्रांनी आपले मनोगत व्यक्त केले. मित्रदिनाची सुरुवातआदर्शाची पूजा व त्रिसरण,त्रिरत्न वंदनेनी करण्यात आली. पुजेचे नेतृत्व धम्ममित्र शोभा धुताले, कल्पना गाडगे,प्रतिभा लांजेवार यांनी केले. मैत्रीभावना या ध्यानाचा सराव निर्मला लांडगे,परिचय कल्पना गाडगे,सकाळचे सूत्रसंचालन पदमा अधव दुपारचे वैशाली अधव यांनी केले.मारोतराव धुताले यांनी गीत सादर केले.१८महिला व ६पुरुष धम्मचारिणी अचलसीरी, मैत्रीतारा, धम्मचारी कुशलसत्व, बोधिनंदन, श्रद्धादित्य उपस्थित होते. मित्रदिन आनंदात पार पडला.

वरुड, संघदिन

10-12-2025

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

7 डिसेंबरला संपन्न झालेल्या संघ दिवसानिमित्य संघ बंधू भगिनी एकत्र येऊन पहिल्या सत्रात प्रत्येकाने आपआपल्या अर्पण वस्तू आणून अर्पण केल्या.नंतर सूत्रसंचालन कुशलबोधी यांनी केले.त्याचबरोबर कुशलसत्वा यांनी त्रिरत्न वंदना घेऊन सुरवात केली .आणि सामुहिकरीत्या,धम्मचारी दीक्षा स्वीकृती चार गाथा घेतल्या.त्यानंतर श्रद्धाश्री यांनी शाक्यमुनी साधना घेतली.त्यानंतर मैत्रीतारानी आध्यात्मिक जीवनात रंगाचे प्रतिकाचे महत्त्व या विषयावर प्रवचन दिले.व सोबतच सर्वांनी भोजन घेतले.त्यानंतर दुसऱ्या सत्रात सुवर्ण भासोत्तम पूजा मैत्रीतारानी घेतली, शाक्यमुनी चामंत्र कुशलबोधीनी.घेतला वज्रसत्वचा मंत्र श्रद्धाश्रीनी घेतला, तसेच प्रज्ञापारमितासूत्र,क्षितीगर्भ मंत्र,तेजोमुनी यांनी घेतला.निश्चितच प्रामाणिकता,सखोल विधायकता,संघ चैतन्य निर्माण होण्यास प्रेरणा मिळाली .

बाबासाहेब स्मृतिदिन, वरुड.

07-12-2025

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

दिनांक ६डिसेंबर ला करुणा बुद्ध विहार, वरुडयेथे सकाळी८.३०मी.आयुष्यमान रोषण हरले यांच्या हस्ते धम्मध्वजारोहन करण्यात आले व बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. धम्मचारिणी श्रद्धाश्री यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंदोलनात स्त्रियांचे योगदान या विषयावर प्रवचन दिले.रमाईनी बाबासाहेबांच्या राजकीय आणि सामाजिक चळवळीत भरीव योगदान दिले. चवदार तळ्याचा सत्याग्रह, नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह, अमरावतीच्या अंबादेवीचा सत्याग्रह, मुंबईच्या दामोदर हॉलमध्ये झालेली परिषद, १९४२ नागपूर येथे झालेली महिलांची परिषद १४ऑक्टोबर १९५६ नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा, बाबासाहेब परिनिर्वाणानंतर व आतापर्यंत चालत आलेल्या चळवळीत महिलांनी घेतलेल्या सक्रीय सहभागावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मचारी कुशलसत्व, पालिपूजा धम्मचारी तेजोदीप्त, तेजोमुनी श्रद्धाश्रीचा परिचय धम्मचारिणी मैत्रीतारा, केवळ शांत बसणे ध्यान साधनेचा सराव व आभार धम्मचारिणी अचलसीरी, बाबासाहेबांवर स्मृती दिवसाला अनुसरून धम्म मित्र नरेंद्र रामटेके यांनी गीत सादर केले.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले.

हिवाळी निवासी शिबीर, मोर्शी

31-10-2025

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

सालबर्डी येथे हिवाळी धम्म शिबीर संपन्न

संघरक्षितांचा स्मृतिदिन, वरुड

31-10-2025

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

वरुड- मोर्शी केंद्रात उर्गेन संघरक्षित यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त एक दिवशिय कार्यशाळेचे नियोजन.(मित्र दिवस). आज दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोज गुरुवारला करुणा बुद्ध विहार, वरुड. येथे त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक उर्गेन संघरक्षित यांच्या सातव्या स्मृतिदिना निमित्त कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाला नागपूर येथील धम्मचारी सूवीर्य हे प्रवचनकार म्हणून लाभले.सर्वप्रथम आदर्शाची पूजा धम्मचारी सूवीर्य यांच्या हस्ते करण्यात आली. मोर्शी येथील धम्ममित्र पौर्णिमा तागडे, शारदा साबळे,सविता मनोहरे यांनी सुंदर अशा पाली पूजेचे नेतृत्व केले. मैत्री भावना ध्यान साधनेचे नेतृत्व धम्मचारिणी श्रद्धाश्री यांनी केले असून धम्मचारी सूवीर्य यांचा परिचय धम्मचारिणी मैत्रीतारा यांनी करून दिला.आजच्या दिनाचे महत्त्व पटवून सांगताना धम्मचारी सुवीर्य यांनी शरण गमन,कल्याण मित्रता,संपर्क,ध्यान, सांस्कृतिक वसा, संघ स्थापना अशा अनेक बाबीवर त्यांनी आपले मत व्यक्त केले. काही धम्ममित्र पुरुष महिलांचे मनोगत घेण्यात आले मनोगत घेतल्यानंतर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन धम्ममित्र प्रमोद खडसे यांनी केले असून या कार्यक्रमाचे संचालन धम्ममित्र तागडे यांनी केले,धम्ममित्र प्रमोद खडसे व विनोद बागडे यांनी गीत सादर केले, आणि शेवटी धम्मचारी तेजोमुनी आणि धम्मचारिणी श्रद्धाश्री यांनी सप्तांग पूजा घेऊन धम्मपालन गाथेने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या कार्यक्रमाला धम्मचारी अलोककीर्ती व धम्ममित्र बनसोड नागपूर तसेच वरुड- मोर्शी येथील धम्म मित्र उपस्थित होते.जय भीम नमो बुद्धाय

हिवाळी शिबीर, वरुड.

26-10-2025

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

सुखो बुद्धानं उपपादो सुखा सधम्मदेसना l

सुखा संघस्ससामग्गी समग्गानं तपो सुखो ll

अर्थात:- बुद्धाचे उत्पन्न होणे सुखकारक आहे.बुद्धाची धम्मदेसना करणे सुखकारक आहे.कुशल विचारांच्या लोकांनी एकत्र येणे सुखकारक आहे.एकत्र येऊन तप(ध्यान )करणे सुखकारक आहे.धम्म पदातील बुद्धवग्गो यातील वरील गाथा प्रमाणे त्रिरत्न बौद्ध महासंघ,वरुड दरवर्षी दिवाळीच्या सुट्ट्यात पाच दिवशीय निवासी हिवाळी धम्म शिबिराचे आयोजन करीत असतो. यावर्षी सुद्धा त्रिरत्न बौद्ध महासंघांचे संस्थापक पुज्य.उर्गेन संघरक्षितांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त  दिनांक १८ते २३ ऑक्टोबर २०२५या कालावधीत निवासी शिबिराचे आयोजन बिरसा मुंडा आदिवासी आश्रम शाळा येथे करण्यात आले होते

.शिबिराचा विषय होता चार संग्रह वस्तू समाज एकत्रीकरणाची साधने.शिबिराची सुरुवात आदर्शाच्या पूजेने त्रिसरण पंचशील आणि बुद्ध पूजा व समर्पण विधी घेऊन करण्यात आली. धम्मचारी मैत्रेयसागर,नागपूर यांनी शिबिराचे प्रास्ताविक केले. प्रवचनाच्या पहिल्या दिवशी धम्मचारी मैत्रेयसागर यांनी दानाबाबत विस्तृत माहिती दिली.यात- दान का दयावे, कुणाला दयावे, कसे दयावे आणि काय दयावे.तसेच दुसऱ्या दिवशी प्रियवादिता यात वाचाही एकमेकांना जोडण्याचे काम करते तेव्हा आपली वाणी असत्य, कठोर, व्यर्थ बडबड व निंदाजनक न राहता ती नेहमी सत्य, प्रिय मधुर, उपयुक्त आणि सामंजस्य पूर्णअसावी. तिसऱ्या दिवशी अर्थचर्या यात आपली कृतीआचरण लाभदायक असावे. यात त्यांनी चार प्रकारचे लोक सांगितले. १) जो स्वतःच्या किंवा इतरांच्या कामात येत नाही.२) स्वतःचे हीत सोडून दुसऱ्यांच्या हितासाठी झटतो.३) जो स्वतःचे हित करतो पण इतरांच्या हितासाठी काहीच करत नाही.४) जो स्वतःच्या हितासाठी आणि इतरांच्या हितासाठी जगतो. चौथ्या प्रकारातील मनुष्य हा सर्वोत्तम मनुष्य आहे, असे भगवान बुद्ध म्हणतात.चौथ्या दिवशीच्या प्रवचनात समानअर्थता,यात तुकाराम महाराजांच्या अभंगा प्रमाणे "बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले" याप्रमाणेआपण आपल्या आचरणातून उदाहरण घालून दिले पाहिजे. अनेक उदाहरण देऊन आपल्या सुमधुर आणि शांत वाणीने प्रवचन देण्यात आले.या शिबिरामध्ये रोज सकाळला ध्यान साधना घेण्यात येत होती. सकाळच्या सत्राची सुरुवात त्रिरत्न वंदनेने धम्मचारी श्रद्धादित्य, ध्यानाचे नेतृत्व व माहिती धम्मचारी तेजोमुनी, संचालनधम्मचारी तेजोदीप्त,गटचर्चाचे नेतृत्व सर्व धम्मचारी,धम्मचारिणीनी संपर्क सराव धम्मचारिणी मैत्रीतारा, अचलसीरी, व श्रद्धाश्री, मैत्रीभावना ध्यानसाधना माहिती व नेतृत्व धम्मचारिणी श्रद्धाश्री.रोज रात्रीला उर्गेन संघरक्षित यांच्या चार भेटवस्तु यावर प्रवचन धम्मचारिणी अचलसीरी यांनी कमळपुष्प, सुवर्ण जाळ धम्मचारिणी श्रद्धाश्री, मेंढपाळाचे गोल नृत्य (रिंगन नृत्य).धम्मचारी कुशलबोधी आणि वाळवंटातील नंदनवन धम्मचारिणी मैत्रीतारा यांनी दिलीत.रोज रात्री पाली पूजा यात त्रिसरण,पंचशील विधायक शील, महामंगल सूत्त, करणीयमेत्तसूत्त, जयमंगल अठ्ठगाथा तसेच सब्बे सत्ता सुखी होंतू या मंत्राचे पठण करून अर्पणविधी घेण्यात येत होता.शेवटच्या दिवशी धम्मचारी मैत्रेयसागर यांनी अतिशय मार्मिक असे समारोपीय प्रवचन दिले. शिबिराच्या यशस्वीते करता ज्या ज्या दान दात्यानी भोजन दान, नाष्टा, आरोचे पिण्याचे पाणी,अनेक प्रकारे मदत केली, दोन अडीच महिन्यापासून गावोगावी जाऊन पत्रक,दान व शिबिरार्थीना प्रेरित केले त्यासर्व धम्मचारी, धम्मचारिणी,धम्ममित्र महिला पुरुष सर्वांचे स्वागत करण्यात आले.  १५०ते १६० शिबिरार्थीनी शिबिराचा लाभ घेतला. धम्ममित्र संजय चक्रपाणी यांनी सुंदर पुजास्थान करून शिबिराची शोभा वाढविली.मैत्रीगीतानी शिबिराची सांगता करण्यात आली

जन्मशताब्दी महोत्सव, वरुड

11-09-2025

By Dh. Sraddhasree Warud Center - Warud

 उर्गेन संघरक्षित जन्मशताब्दी  महोत्सव करुणा बुद्ध विहार वरुड येथे  साजरा करण्यात आला. याप्रसंगी धम्मचारी ज्ञानरत्न अमरावती हे उपस्थित होते. ४ते ६ उर्गन संघरक्षित यांच्याबद्दल कृतज्ञता धम्म मित्र महिला पुरुषाने व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रंगारी सर यांनी भूषविले होते. सायंकाळी सहा ते आठ धम्मचारी ज्ञानरत्न यांनी पूज्य उर्गन संघरक्षित यांचा जीवन प्रवासावर प्रकाश टाकला. विहार फुग्यांनी सजवण्यात आले होते. सर्व धम्मचारींनी धम्ममित्र धम्मचारी कार्यक्रमाच्या यशस्वीते करता परिश्रम घेतले.

स्वातंत्र्य दिवस, वरुड

18-08-2025

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

दिनांक १५ऑगस्ट ला प्रज्ञा सार्वजनिक वाचनालय, अंतर्गत करुणा बुद्ध विहार, वरुड येथे स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला.सेवानिवृत्त भाऊराव हरले यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. याप्रसंगी  हरले सरांनी मार्गदर्शन केले, सूत्रसंचालन व परिचय धम्ममित्र चंद्रशेखर अढाऊ,आणि कुशलसत्व यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 

नागकेतु यांची सेंटरला भेट

08-08-2025

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

त्रिरत्न बौद्ध महासंघ मोर्शी-वरुड सेंटरला धम्मचारी नागकेतू यांनी सेंटरचे अध्यक्ष म्हणून मोर्शी व  वरुडला सदिच्छा भेट दिली .. याप्रसंगी त्यांनी मोर्शी आणि  वरुडच्या धम्मचारी धम्मचारिणी तसेच मित्रांना सुद्धा भेटी दिल्या त्यांच्याशी हितगुज साधले. काही चाप्टर ला सुद्धा त्यांनी भेटी दिल्या.च्याप्टरला सुद्धा त्यांनी भेटी दिल्या. हे वर्ष पूज्य उर्गेन संघरक्षित  यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्यांनी  त्रीरत्न बौद्ध महासंघ स्थापन करून आपणाला कसे लाभार्थ केले त्यावर चिंतन करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

धम्मचक्क प्रवर्तन दिन, वरुड

15-07-2025

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

*आषाढी पौर्णिमा निमित्त आठवडी धम्मवर्ग त्रिरत्न बौद्ध महासंघ वरुड द्वारे करुणा बुद्ध विहार येथे संपन्न झाला* त्यातील प्रमुख *प्रवचनकार धम्मचारिणी अचलसिरी* यांनी आषाढी पौर्णिमेचे महत्त्व विशद केले 1) महामाया यांना पडलेले स्वप्न.
२)सिद्धार्थ गौतमाचा गृहत्याग 
३)सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले त्यानंतर पाच परिव्रजकांना धम्मदेशना 4)वर्षवासाला प्रारंभ सरते शेवटी  भगवान बुद्ध महपरिनिब्बान 5)महाकाश्यपची पहिली संगती या सर्व गोष्टींचा विषयात  धम्मचारी अचलसिरी यांनी चांगल्या पद्धतीने समजून सांगितले. धम्ममित्र लक्ष्मीबाई मेश्राम अचलसिरी त्यांचा सुंदर परिचय करून दिला.पूजा धम्ममित्र खणखणे ताई आणि धम्मामित्र ज्योतीताई गाडगे त्यांनी घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मचारी कुशलसत्व यांनी केले.गीत धम्ममित्र ज्योतीताई गाडगे यांनी म्हटले पूजा स्थानाची सजावट धम्ममित्र चक्रपाणी यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन धम्मचारी श्रद्धादित्य यांनी केले.धम्मपालन गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

वरुड येथे मित्रडे

14-07-2025

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

दिनांक १३जुलै २०२५ रोज रविवारला त्रिरत्न बौद्ध महासंघ,सेंटर वरुड -मोर्शी च्या वतीने करुणा बुद्ध विहार वरुड येथे  मित्र डे घेण्यात आला त्या मित्र डे चे नेतृत्व धम्मचारी प्रसन्नदर्शी मोर्शी आणि धम्मचारी तेजोमुनी  वरुड यांनी केले. या मित्र डे मध्ये आठ मार्गदर्शक तत्त्व या विषयावर सकाळ आणि दुपारच्या सत्रामध्ये आदरणीय धम्मचारी प्रसन्नदर्शी यांचे व्याख्यान झाले. सुरुवातीला सर्वप्रथम आदर्शाची पूजा करण्यात आली.निर्मलाताई लांडगे आणि बागडे ताई व पद्मताई यांनी पाली पूजेचे नेतृत्व केले.धम्ममित्र खनखने ताई यांनी

धम्मवर्ग, वरुड

23-06-2025

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

त्रिरत्न बौद्ध महासंघ वरुड अंतर्गत करुणा बुद्ध विहार  येथे दिनांक २२जुनपासासून साप्ताहिक धम्म वर्ग सुरू करण्यात आलेला आहे. भगवान  बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील द्वितीय खंड भाग पहिला भगवान बुद्ध आणि त्यांचा विषादयोग  यात धर्मोपदेश  करावा की करू नये? ब्रह्म सहपति सुवार्ता जाहीर करतो. या भागाचे पठण व त्यावर प्रवचन  धम्मचारिणी श्रद्धाश्री यांनी दिले.धम्म वर्गाची सुरुवात आदर्शाच्या पूजेने करण्यात आली. पूजेचे नेतृत्व धम्ममित्र संजय चक्रपाणी बाबुराव डबराशे,आनापानसती या ध्यानाचे नेतृत्व धम्मचारिणी अचलसिरी,गीत शोभाताई खनखने, सूत्रसंचालन धम्मचारी कुशलसत्व, प्रवचन धम्मचारिणी श्रद्धाश्री, आभार व धम्मपालन गाथा धम्ममित्र संजय चक्रपाणी यांनी केले.धम्मचारी श्रद्धादित्य, बोधिनंदन, तेजोदीप्त व परिसरातील धम्मसहायक तसेच छोटे मुलं वर्गाला उपस्थित होते.

धम्मशिबीर, वरुड

16-06-2025

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

दिनांक१५जून ला त्रिरत्न बौद्ध महासंघ वरुड च्या वतीने करुणा बुद्ध विहार, वरुड येथे एक दिवशीय धम्मशिबीर व  नव्याने साप्ताहिक धम्म वर्ग व बालसंस्कार वर्गाचे उदघाटन करण्यात आले.हे वर्ग दर रविवारी सकाळी ८:००ते १०:००या दरम्यान घेण्यात येणार आहे. शिबीराचे नेतृत्व तसेच उदघाटन धम्मचारी तेजोमुनी यांनी केले. नवसमाजाचा पाया शील याबद्दल बोलताना. बाबासाहेबानी किंवा छोटया भिवाला कोणते कोणते चटके सहण करावे लागले त्यात शाळेतील, गाडी तील प्रसंग, समता, स्वातंत्र्य, बंधुता यावर आधारित धम्म व देवाचे स्थान नीतिम्मततेला कसे दिले अश्या अनेक प्रसंगावर प्रकाश टाकला.सूत्रसंचालन धम्मचारी श्रद्धाश्री, त्रिसरण, पंचशील बुद्ध पुजेचे नेतृत्व धम्ममित्र शारदा पाटील, कौशल्या अधव, अंतकला बनसोड, त्रिरत्न वंदना, महामंगल सुत्त अर्पण विधी व धम्मपालन गाथा निर्मला लांडगे, वैशाली अधव, धम्मचारिणी अचलसीरी यांनी आनापानसती, मैत्रीभावना ध्यानाचा सराव करून घेतला,धम्मचारी तेजोदीप्त यांनी तेजोमुनीचा परिचय, धम्ममित्र दर्शना बागडे यांनी आभार केले.तीस महिला व १२पुरुष तसेच छोटे मंडळी या शिबिराचा लाभ घेतला. सर्व धम्मचारी धम्ममित्रांनी शिबिरासाठी परिश्रम घेतले.

ऑर्डर डे, वरुड

01-06-2025

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

करुणा बुद्ध विहार,वरुड सेंटरला ऑर्डर डे पार पडला.ऑर्डर डे ची सुरुवात त्रिसरण दसशीलानी झाली. त्रिसरण दसशील धम्मचारी कुशलबोधी यांनी घेतले.धमचारी तेजोमुनी यांनी संघमेत्ता घेतली.त्यानंतर धम्मचारी सुपदम यांनी व्यक्तिगत अनुभवातून धम्मदेशना केली. संघाच्या भरभराटीसाठी आणि संघ चिरकाळ टिकून राहण्यासाठी आपली जबाबदारी काय? यावर मार्गदर्शन केले.आभार प्रदर्शन धम्मचारिणी मैत्रीतारा यांनी केले. शेवटी सप्तांग पूजा घेऊन आजच्या ऑर्डर डे  ची सांगता झाली..

महिला मित्रडे, वरुड

01-06-2025

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

करुणा बुद्ध विहार,वरुड येथे शनिवार ३१ मे २०२५ ला महिला मित्रडे संपन्न झाला. मित्रडे चा विषय बुद्ध जयंती होता. मित्रडेचे नेतृत्व धम्मचारिणी श्रद्धाश्री यांनी केले.मित्रडे मध्ये धम्ममित्र शोभा धुताले,शारदा पाटील,कौसल्या अधव यांनी पूजा व मैत्रीभावना ध्यानाचे नेतृत्व धम्मचारिणी अचलसिरी यांनी केले. निर्मलाताई लांडगे यांनी सूत्रसंचालन केले. वैशालीताई अधव यांनी धम्मचारिणी श्रद्धाश्री यांचा परिचय करून दिला. आभार प्रदर्शन धम्ममित्र पदमाताई अधव यांनी केले. बुद्ध जयंती साजरी करणे म्हणजे बुध्दाच्या जयाचा समारंभ होय. बुध्दाने मारावर विजय मिळवून ज्ञानप्राप्ती केली. मार विजय याविषयीधम्मचारिणी श्रद्धाश्री यांनी खूप सुंदर मार्गदर्शन केले. सप्तांग पूजा घेऊन मित्रडेची सांगता झाली. यावेळी धम्मचारिणी अचलसिरी उपस्थित होत्या. सर्वांनी सामूहिक भोजन घेतले अशा रीतीने मित्र डे उत्साहात पार पडला.

बुद्ध महोत्सव, वरुड

22-05-2025

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

**करुणा बुद्ध विहार वरुड येथे बुद्धमहोत्सव* *

त्रिरत्न बौद्ध महासंघ वरुड यांच्या तर्फे करुणा बुद्ध विहार येथे दिनांक ७मे ते १२मे पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दिनांक ७मे ते १२मे ५ते १५वर्षे मुलांसाठी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात रोज पूजा, ध्यान व मुलांना धम्माबद्दल, योग्य संस्काराबद्दल धम्मचारी बोधिनंदन, तेजोमुनी, कुशलबोधी, कुशलस्तव, श्रद्धादित्य, तेजोदीप्त, धम्मचारिणी अचलसीरी, मैत्रीतारा,श्रद्धाश्री,यांनी मार्गदर्शन केले.कराटे,योगा,रंगभरण, संगीत,क्राफ्ट,डान्स असे विविध उपक्रम या दरम्यान राबविण्यातआले ४०च्या जवळपास मुलांनी यात सहभाग घेतला. मुलांना रोज नास्ता आईस्क्रीम देण्यात येत होत. शिबिराच्या दरम्यान मृण्मयी संजय चक्रपाणी व सर्वेश संजय नागले यांचा जन्मदिवस शुभेच्छा गाथा, केक तसेच नास्ता देऊन साजरा करण्यात आला.दिनांक १०लासायंकाळी मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम किसागौतमी तसेच मोबाईलचे दुष्परिणाम, चवदार तळ्याचा सत्याग्रह या नाटिका तसेच अनेक भीम बुद्ध गीतावर सुंदर नृत्य सादर करण्यात आले. ११ला रमाई एकपात्री नाटिका कु. प्रेरणा सुनील वानखडे अधिक्षक तांत्रिक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय,नागपूर यांनी सादर केले.रमाई व बाबा साहेबांच्या जीवनातील अनेक प्रसंग यातसादर करण्यात आले,प्रेक्षक जणूकाही त्यात समरस होऊन भावुक झाले होते.नाटिकेनंतर आश्वघोष टिम च्या वतीने गीत गायनाचा कार्यक्रम झाला.दिनांक १२ला सकाळी ८:३०वाजता धम्ममित्र बाबुराव डबरासे व संपतराव लांडगे यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले लगेच धम्मचारिणी अचलसीरी व श्रद्धाश्री यांनी संपूर्ण पूजेचे नेतृत्व केले. मैत्रीतारा यांनी मैत्रीभावना ध्यान साधनेची माहिती व सराव करून घेतला.धम्मचारीअनोममित्र वर्धा यांनी बुद्धपौर्णिमेनिमित्त स्वातंत्र्य, समता बंधुत्व यावर बुद्ध,बाबासाहेबानी कसे कार्य केले हे अनेक उदाहरण देऊन सांगितले. कुशलस्तव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, परिचय कुशलबोधी ,आभार श्रद्धादित्य यांनी केले.सायंकाळी आंबेडकर चौक ते करुणा बुद्ध विहार पर्यंत बुद्धरूपाची शांतता रॅली काढण्यात आली. बाबासाहेब, ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हारार्पण करण्यात आले शेवटी आभार धम्मपालन गाथा आणि मैत्रीगीताने रॅलीची सांगता करण्यात आली.संपूर्ण बुद्ध महोत्सव वाला सर्व धम्मचारी धम्ममित्र यांनी परिश्रम घेतले. सकाळी बालसंस्कार शिबीर करिता धम्ममित्र सुरेंद्र सोनुले, मारोतराव दुताले,उत्तमराव लांडगे संजय चक्रपाणी, विनोद बागडे ,पांडे सर, संजय नागले,इत्यादी मित्रांनी सहकार्य केले.

निवासी शिबीर, वरुड

22-04-2025

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

करूणा बुद्ध विहार वरुड येथे दि.१७ते २२एप्रिल या दरम्यान निवासी अरियपरियेसन सुत्त या विषयावर धम्म शिबीर आयोजित करण्यात आले.धम्मचारी श्रद्धाप्रिय याचें नेतृत्वाखाली आणि धम्मचारी तेजोमुनी यांचे सहनेतृत्वखाली पार पडले. शिबीरात अमरावती  आणि वरुड येथील ऐकूण ११धम्ममित्र यांनी सहभाग घेतला.शिबीरात आर्य परियेसन आणि अनार्य परियेसन शोध याबाबत सविस्तर प्रवचन दिले. पंच धर्मेंद्रिय, पंच बल, ६प्रकारचे अभिज्ञान, चार रुप ध्यान, चार अरुप ध्यान या बाबतीत देशना दिली, शिबीरात ध्यान, चक्रमण केवळ शांत बसने आणि ग्रुपचर्चा याचा समावेश होता, शिबीर एकदम आनंदात पार पडले या शिबीरात धम्म चारी श्रद्धादित्य आणि कुशल सत्त्व, बोधिनंदन तसेच धम्म मित्र सोनुले यांनी अथक परिश्रम घेतले

ज्योतिबा फुले व बाबासाहेब जयंती

22-04-2025

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

१२एप्रिल ला वरुड पासून १२किलोमीटर असलेल्या गावी रात्री ७:००वाजता ज्योतिबा फुले, बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त भीमज्योती विहार पुसला येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब यांच्यातील असलेले गुरु शिष्य नाते व आपल्यासाठी केलेल्या कार्याची माहिती त्यांना समजेल अश्या सोप्या भाषेत सांगण्यात आली.या कार्यक्रमाला छोटे,तरुण, शालेय विदयार्थी,तसेच वयस्क असे ७०च्या जवळपास लोक उपस्थित होते.

आदर्शाची पूजा तसेच त्रिसरण,पंचशील, विधायक शील व बुद्ध पूजा घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.ग्रामपंचायत सदस्य रीटाताई डोंगरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल देऊन धम्मचारिणी श्रद्धाश्री यांचा सत्कार करण्यात आला.आभार प्रदर्शन एका ताईंनी केले.पुसला गावी प्रथमच मी कार्यक्रमला गेले सर्व गावकरी आनंदी होते मलाही अतिशय आनंद झाला. विशेष म्हणजे एकदिवशी शिबीर घेण्याचे ठरवण्यात आले.शेवटी उपस्थित महिलांनी काही प्रश्न विचारलीत योग्य उत्तर देऊन त्यांचे समाधान करण्यात आले.शेवटी धम्मपालन गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.फोटो काढायला कोणी समोर येत नव्हते. काही आजी व महिलांनी प्रतिसाद दिला

बोधिसत्व जयंती, वरुड

16-04-2025

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

दिनांक १३ते १४एप्रिल ला या दरम्यान बाबासाहेब जयंती साजरी करण्यात आली. १३ता धम्मचारी धर्म दर्शी व धम्ममित्र बाबुराव डबरासे काकाजी यांच्या हस्ते बुद्धरूपाचे अनावरण करण्यात आले. या प्रसगी बुद्ध प्रतिमा, मुद्रा तसेच बुद्ध जगात कसे श्रेष्ठ व आपण  बुध्दाची का पूजा करतो यावर प्रवचन देण्यात आले.
१४एप्रिलला १३४वी बोधिसत्व बाबासाहेब यांच्या जयंती निम्मित ८:३०ला धम्मध्वजा रोहण धम्मचारी धर्मदर्शी यांच्या हस्ते करण्यात आले.बाबासाहेब यांचा जीवन,संघर्ष,त्यांचे शिक्षण जीवनात आलेले खडतर प्रसंग  बालपणी शाळा, पाणी केसकर्तन, बैल गाडीचा बालपणीचा प्रसंग,चवदार तळे, काळाराम मंदिर सत्याग्रह, संविधान निर्मिती, हिंदू कोड बिल व शेवटी बुद्ध धम्म दिला अश्या  .
याप्रसंगी संपूर्ण पाली पूजा अर्पण विधी घेण्यात आली.

संघ दिवस, वरुड

09-04-2025

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

करुणा बुद्ध विहार, वरुड येथे संघ दिवसाचे नियोजन करण्यात आले होते. धम्मचारी तेजोमुनी यांनी उर्गेन संघरक्षित यांच्या संघ स्थापनेचा उद्देश व आज पर्यंत चा प्रवास यावर प्रवचन दिले.धम्मचारी कुशलस्तव यांनी संचालन, पूजा निर्मला लांडगे, पदमा अधव, मैत्रीभावना ध्यानाचा सराव तेजोदीप्त, गीत मारोतराव धुताले, आभार पुण्यानुमोदन धम्मचारिणी श्रद्धाश्री यांनी केले. मित्र व सहायक या कार्यक्रमला उपस्थित होते.

सेंटरला भेट,वरुड

03-04-2025

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

दिनांक२/४/२०२५धम्मचारी विवेकरत्न यांची वरुड सेंटरला सदिच्छा भेट.सेंटरचे ट्रस्टी म्हणून त्यांनी सर्व धम्मचारी,धम्मचारिणी यांना सेंटरच्या भरभराटीसाठी व विकासासाठी मार्गदर्शन केले तसेच येथील कार्याबद्दल प्रशंसा केली व प्रोत्साहन दिले.याप्रसंगी सर्व धम्मचारी धम्मचारिणी उपस्थितीत होते.

सदिच्छा भेट, वरुड

03-04-2025

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

दिनांक२/४/२०२५धम्मचारी विवेकरत्न यांची वरुड सेंटरला सदिच्छा भेट.सेंटरचे ट्रस्टी म्हणून त्यांनी सर्व धम्मचारी,धम्मचारिणी यांना सेंटरच्या भरभराटीसाठी व विकासासाठी मार्गदर्शन केले तसेच येथील कार्याबद्दल प्रशंसा केली व प्रोत्साहन दिले.याप्रसंगी सर्व धम्मचारी धम्मचारिणी उपस्थितीत होते.

मित्रमहिला निवासी शिबीर, वरुड.

27-03-2025

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

त्रिरत्न बोद्ध महासंघ,वरूड-मोर्शी व्दारा आयोजित मित्र महिला करिता निवासी शिबीराचे आयोजन दि. 22 मार्च 2025 च्या सायंकाळी ते 26 मार्च 2025 च्या दुपारपर्यंत करण्यात आले होते.श्रमणफल सूत्त हा या शिबिराचा विषय असून शिबीराच्या नेतृत्वकार धम्मचारिणी दीपवती वर्धा या होत्या. श्रमणफलचा अर्थ,राजा बिंबिसार व अजातशत्रू यांची गोष्ट सांगून पहिले पुष्प गुंम्पल्या गेले.दुसऱ्या दिवशी शील तिसऱ्या दिवशी समाधी आणि चौथ्या दिवशी प्रज्ञा अशी त्रिविध शिकवण शिकवली. धम्मपदातील गाथा घेऊन सुरुवात केली तर कधी मंत्रचॅटींग घेऊन वातावरण प्रफुल्लीत केले. गटचर्चेत सहभाग पण घेतला. पुलगाव वरून आलेल्या धम्मचारिणी अमृतवज्री यांनी ध्यान, परिचय,बुद्धानुस्मृती, त्रिरत्नपूजा,बुध्दानु स्मृती,गटचर्चा यामधे उत्कृष्ठ सहभाग घेतला . धम्मचारिणी श्रद्धाश्री यांनी रोज सकाळी व्यायाम, ध्यान, रात्री सप्तांग पूजा, मंत्र चॅटींग,बुध्दानुस्मृती, गटचर्चेत सहभाग अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. धम्मचारिणी मैत्रीतारा यांनी पूजा,दुपारचं ध्यान,गटचर्चा अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या. या शिबीराला वर्धा,वरुड,काटोल सोनगाव चांदुरबाजार अश्या विविध भागातील ३३ मित्र महिला उपस्थित होत्या.

उन्हाळी शिबीर, वरुड

18-03-2025

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

त्रिरत्न बौद्ध महासंघ केंद्र वरुड द्वारा उर्गेन संघरक्षित यांच्या जन्मशताब्दी निमित्त, फाल्गुन पौर्णिमा,१४ते १६मार्च २०२५या कालावधीत अनिवासी ध्यान साधना व धम्मपरिचय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे नेतृत्व धम्मचारी तेजोमुनी यांनी केले. शिबिराचा विषय त्रिरत्न ( बुद्ध धम्म संघ )अभ्यास व चिंतन पूर्ण तीन प्रवचन दिले. दोन दिवस संचालनाची जबाबदारी   धम्मचारी तेजोदीप्त यांनी सांभाळली. आनापान सती व मैत्रीभावना ध्यान व पूजा एक दिवस संचालनाची जबाबदारी धम्मचारीणी श्रद्धाश्री यांनी तर पूजेमध्ये धम्मचारी श्रद्धादित्य व कुशलबोधी, बोधिनंदन, कुशलसत्व. पूजेमध्ये आहे सकाळी त्रिरत्नवंदना,दुपारच्या सत्रात त्रिसरण पंचशील, करणीयमेत्तसुत्त, महामंगलसुत्त,शेवटच्या दिवशी त्रीअंगी पूजा घेण्यात आली. तसेच धम्ममित्र मारोतराव धुताले, धम्म मित्र दर्शनाताई बागडे,  मांडवधरे काकू यांनी बुद्धभीम गीते सादर केले, समारोपीय कार्यक्रमांमध्ये शिबिरार्थ्यांचे मनोगत घेण्यात आले आयुष्यमान सुरेश दादा खंडारे.नागपूर, व संगीताताई वाईकर दिल्ली, यांनी केंद्राला प्रत्येकी 5000₹मदत केली. दानदात्यांच पुण्यानुमोदन  स्वागत करण्यात आले शिबिरामध्ये परिसरातील ५५ते ६०लोकांनी भाग घेऊन धम्म जीवनाचा आनंद घेतला.मैत्री गीताने शिबिराची सांगता झाली.

उन्हाळी शिबीर मोर्शी

18-03-2025

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

त्रिरत्न बौद्ध महासंघ मोर्शीच्या वतीने दिनांक 14 मार्च 2025 ते 16 मार्च 2025 या कालावधीमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे नेतृत्व आदरणीय धम्मचारीनी जयमणी यांनी केले तर या शिबिराचे सूत्रसंचालन ध्यान सराव संपर्क सराव आदरणीय धम्मचारी श्रद्धा प्रिय यांनी करून घेतला त्याचबरोबर दररोज पूजेचे नेतृत्व धम्मचारी अंशुल वज्र धम्मचारी प्रसन्नदर्शी यांनी केले या शिबिरामध्ये आनापान सती मैत्री भावना जस्ट सेटिंग व संपर्क सराव करून घेतला असून या शिबिरामध्ये शील समाधी प्रज्ञा या विषयावर प्रवचन देण्यात आले. १)नित्य सवयीचं कुशल आचरण म्हणजे शील २)कुशल भावनेचा अखंड प्रवाह म्हणजे समाधी ३)अस्तित्वाचे खरे दर्शन म्हणजे प्रज्ञा या तीनही दिवशी आदरणीय धम्मचरणी जयमनी यांनी प्रवचन दिले या शिबिरामध्ये एकूण 65 शिबिरार्थींनी या शिबिराचा लाभ घेतला. चिंचोली गवळी खानापूर कोळविर मोर्शी जरूर येतील या शिबिरासाठी शिबिरार्थी आले होते. या शिबिरासाठी प्रामुख्याने धम्ममित्र गाडगे धम्ममित्र तागडे धम्ममित्र ढोके धम्ममित्र रामटेके धम्ममित्र धवणे धम्ममित्र राऊत धम्ममित्र प्रेमिलाताई फुले धम्ममित्र पौर्णिमाताई तागडे धम्ममित्र शारदाताई साबळे धम्ममित्र सविताताई मनोहरे यांनी खूप परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे धम्ममित्र गाडगे ताई यांनी आभार प्रदर्शन केले असून या शिबिराची सांगता धम्ममित्र प्रमोद खडसे व सामुहिक सर्व शिबिरार्थ्यांनी मैत्री गीताने केली जय भीम नमो बुद्धाय

मित्रदिन,वरुड -मोर्शी

03-03-2025

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

त्रिरत्न बौद्ध महासंघ वरुड, मोर्शी च्या वतीने दिनांक १मार्चला मित्र डे चे आयोजन करूणा बुद्ध विहार वरुड येथे करण्यात आले होते.या मित्र डे चे नेतृत्व धम्मचारी मनायु अमरावती यांनी केले.भवचक्रातील बारा निदान त्यातील अविद्या आणि संस्कार हे भूतकाळातील कारणे,विज्ञान,नामरूप, षडायतन, स्पर्श,वेदना हे वर्तमानकाळातील परिणाम,तृष्णा, उपादान , भव ही वर्तमान काळातील कारणे,जातीजन्म जरामरण ही भविष्य काळातील परिणाम आहे . मृत्यूच्या वेळेस जागृत असलो तर परत जन्म घेणार नाही.दुपारच्या सत्रात विज्ञान कस कार्य करते , तसेच दुःख,अनित्य,अनात्म यावर मार्गदर्शन केले. तसेच मित्रांच्या प्रश्नाला उत्तरे देऊन त्यांच्या शंकेचे निरासन करण्यात आले.यावेळी धम्मचारिणी श्रद्धाश्री,मैत्रीतारा,धम्मचारी बोधिनंदन, कुशलस्तव, श्रद्धादित्य तसेच २४महिला व १३बंधु या मित्र दिवसाला उपस्थित होते.सर्वांनी मित्र डे चा आनंद घेतला

सद्धम्म प्रदीप शिविर केंद्र में आपके सहयोग के लिए निवेदन

27-02-2025

By Ratnasambhava Center - Retreat Center Bhaje

प्रिय धम्म भाई और बहनों

नमो बुद्धाय जय भीम,

हम सद्धम्म प्रदीप शिविर केंद्र  में आपके सहयोग के लिए निवेदन कर रहे हैं l

सद्धम्म प्रदीप शिविर केंद्र भाजे में हम निवास व्यवस्था को अधिक सुचारू रूप से करने के लिए तारा ब्लॉक नवीनीकरन का काम शुरू कर रहे हैं l यह पुराना मकान हमने ख़रीदा था, जिसे हम २००५ से इस्तमाल कर रहे है, और अभी इसे अच्छा करने की जरूरत है |

यहांपर २५ लोगों के रहने की व्यवस्था के साथ लेक्चर हाँल बनाने की योजना है  l हमारे पास जो थोड़ी मूलभूत राशि है इसका उपयोग कर हम यह काम शुरू कर रहे हैं लेकिन इसे पूरा करने के लिए आपके सहयोग की जरूरत है, इसमें लगभग १६ लाख खर्चा अनुमानित है l आपके सहयोग से ही यह काम पूरा हो सकता है l

इसके साथ साथ एकांतवास कुटी का नुतनीकरन का काम शुरू कर रहे हे, शिविर केंद्र के दोनों एकांतवास कुटी का नुतनीकरन करने की जरुरत है, जिससे संघ सदस्य को गहराई से धम्म अभ्यास तथा ध्यान करने के लिए सुविधा उपलब्ध हो सके | इसका अनुमानित खर्च रु. ८,५०००० (रु. आठ लाख पचास हजार है |

आप सभी से निवेदन है कि आप इस कार्य में सहभागी हो शिविर केंद्र को विकसित करने के लिए अपना योगदान दे l

A/c Name : TBMSG Pune  Saddhamma Pradeep IC,

A/c No. : 60383165061

Bank of Maharashtra,Karla Branch

IFSC code : MAHB0001110

 

अधिक जानकारी के लिए आप धम्मचारी रत्नसभव (09420881780)से संपर्क कर सकते है |

 

मैत्री से

धम्मचारी रत्नसंभव

जन्मशताब्धी वर्ष, वरुड

14-01-2025

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

त्रीरत्न बौद्ध महासंघ वरुड- मोर्शीद्वारा,

पुज्य उर्गेन संघरक्षित यांचे जन्मशताब्दी वर्ष मोठया उत्साहात साजरे करण्यात येत आहे. याची सुरुवात २६ ऑगस्ट पासून सुरू झाली असून दिनांक ३०ऑक्टोबर ते ४नोव्हेंबर यादरम्यान  हिवाळी शिबिर घेण्यात आले. दिनांक १२जानेवारी ला धम्मचारी, धम्मचारिणी व सर्व धममित्राकरीता सकाळच्या सत्रात कार्यशाळा व दुपारला ३:३०वाजता जाहीर धम्मप्रवचन च्या आयोजन करण्यात आले होते.यात प्रशिक्षणाच्या पाच पद्धती या विषयावर सुंदर असे मार्गदर्शन करण्यात आले. मित्रांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक अशी उत्तर देण्यात आली. कार्यक्रमाला धम्मचारी श्रद्धाराजा ( इंग्लंड)

दित्यबोधी(पुणे),नागमित्र(नागपूर)उपस्थित होते.

दुपारच्या सत्रात जाहीर प्रवचनात धम्मचारी श्रद्धाराजा यांनी बोधिसत्व प.पूज्य डॉ.बाबासाहेबांचे पाच गुण वैशिष्ट्ये शांतीचे पारितोषिक,बाबासाहेबांच्या जीवनातील तीन महत्त्वाचे गुरु, बाबासाहेबांवर भगवान बुद्धांचा असलेला प्रभाव त्यात स्वातंत्र्य,समता,बंधुत्व या समाजाच्या प्रत्येक घटकासाठी एवढेच नव्हे तर सर्व प्राणीमात्रांविषयी सदा सर्वदा असलेला सकारात्मक भाव इतर बौद्ध जगताशी असलेल नात व बाबासाहेबांनी दिलेला धम्म, कृतज्ञता बौद्ध समाजाचा पाया आहे यावर जाहीर प्रवचन दिले. कार्यक्रमाला वरुड तसेच आजूबाजूच्या गावातील महिला, पुरुष उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात आदर्शाच्या पूजेने पुष्प, मेणबत्ती, अगरबत्ती अर्पण करून करण्यात आली. सर्व पाहुण्यांचे स्वागत शाल व पुष्पमाला देऊन करण्यात आले.पूजा धम्मचारी तेजोमुनी व कुशलबोधी,गीत धम्ममित्र अर्चना अधव, नरेश रामटेके,प्रास्तविक धम्मचारी तेजोदीप्त, सूत्रसंचालन धम्मचारिणी श्रद्धाश्री तर आभार धम्मचारी कुशलसत्व यांनी केले.धम्मचारी प्रसन्नदर्शीधम्मचारिणी अचलसिरी व मैत्रीतारा उपस्थिती होते. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता सर्व धम्मचारी धम्मचारिणी व मित्रांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल सर्वांचे पुण्यानुमोदन.

एक दिवशीय धम्मशिबीर

09-12-2024

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिवार्ण दिवसा निमित्त एक दिवशीय धम्म  शिबिर वरुड मोर्शी केंद्रातर्फे स्थानिक करुणा बुद्ध विहार येथे घेण्यात आले. शिबिराचे नेतृत्व धम्मचारी श्रद्धाप्रिय अमरावती यांनी केले. यावेळी त्यांनी बाबासाहेबांच्या अनेक सदगुणावर प्रकाश टाकला.सूत्र संचालन दर्शना बागडे,पूजा निर्मला आणि शारदा.ध्यान कुशलसत्त्व.परिचय श्रध्दादीत्य,आभार रविना,गीत रामटेके साहेब,आणि धूताले साहेब.अनेकांनी प्रत्यक्ष हजर राहून शिबिरात सहभागी झाले त्यामुळे शिबिर यशस्वी झाले.मनापासून धन्यवाद सर्वांचे

हिवाळी शिबीर वरुड -मोर्शी

05-11-2024

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

त्रिरत्न बौद्ध महासंघ वरुड  मोर्शी द्वारा आयोजित सहा दिवसीय निवासी धम्म शिबिराचे आयोजन स्थानिक चौधरी मंगल कार्यालय वरूड येथे धम्माचा केंद्रबिंदू मैत्री या विषयावर करण्यात आले होते.धम्म शिबिराचे नेतृत्व धम्मचारी लोकनाथ, वर्धा यांनी केले.धम्म म्हणजे निती आणि निती म्हणजे मैत्री याची अधिक सखोल चर्चा या शिबिरात झाली. खरा मित्र कसा ओळखावा तसेच चांगल्या मित्राची दहा कर्तव्य, धाम्मिक जीवन जगताना आपल्या पेक्षा धाम्मिक जीवनात पुढे असलेल्या मित्राची गरज असते खूप सुंदर सुंदर गोष्टी सांगून विषयाला सोपे करून सांगितले. अनेक बंधू भगिनींनी आपल्या मनोगतात धम्मचारी लोकनाथ यांनी सांगितलेली मैत्री आम्ही प्रथमच ऐकली असे विचार व्यक्त केले. सकाळी योगासने,ध्यान,प्रवचन ..गटचर्चा संपर्क सराव,पूजा,इत्यादि दैनंदिन उपक्रम राबविले गेले.शिबिरात आनापान- सती,मैत्रीभावना,केवळ बसने तसेच चलीत ध्यानाचा सराव धम्मचारी अमेयज्ञान यांनी घेतला. तसेच आपल्या सुमधुर वाणीने मंत्र पठण सुद्धा घेत होते.पहिल्या दिवशी समर्पण विधी,पाली पूजेने शिबिराची सुरुवात करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सायंकाळी प्रवचन धम्मचारीणी श्रद्धाश्री यांनी श्रद्धा या विषयावर दिले. धम्मचारी तेजोमूनी यांनी सकाळी त्रिरत्न वंदना व सायंकाळी नवसमजाचा पाया शील या विषयावर प्रवचन दिले. तिसरे प्रवचन धम्मचारीणी अचलसिरी यांनी धम्मक्रांती या विषयावर दिले . शेवटचे चौथे प्रवचन डॉ.बाबासाहेब आंबेडकर व धम्माचे औषध  हे धम्मचारी कुशलबोधी यांनी दिले.प्रश्न उत्तरे व मनोगत सुद्धा घेण्यात आले.अनेक बंधु भगिनींना संपर्क देऊन त्यांचे सुख, दुःख जाणून व ऐकून घेण्यात आले.धम्मचारी बोधिनंदन, धम्मचारीणी मैत्रितारा, धम्मचारी  प्रसन्नदर्शी, धम्मचारी तेजोदीप्त, धम्मचारी श्रद्धादित्य आदींनी शिबिरातील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्या.सम्पूर्ण शिबिराचे सूत्रसंचालन धम्मचारिणी श्रध्दाश्री यांनी केले. धम्मपद गाऊन त्या सुरुवात करीत होत्या.समारोपीय कार्यक्रमाचे स्वागत व आभार धम्मचारी,कुशलसत्व यांनी  केले.पुजास्थान सजावट धम्मचारी श्रमणमित्र ,संजय चक्रपाणी, गीत विनोद बागडे, पखालेताई,सुमित तागडे यांनी गायले.या शिबीरात १३० धम्मबंधू, भगिनी वरूड मोर्शी, तिवसा,धामणगाव तालुक्यातून सहभागी झाले होते.सर्व धम्मचारी,धम्मचारिणी, धम्ममित्र, धम्ममित्र सुरेंद्र सोनुले, प्रवीण लांडगे,तसेच अनेकांच्या मदतीतून हे शिबिर यशस्वी झाले.दान दात्यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. योगासने दिक्षा खातारकर तसेच ध्यानाचा सराव सुरु असताना धम्ममित्र सुशांत सोनुले व टीम ने लहान मुलांना वेगवेगळ्या गोष्टी सांगून व खेळ शिकवून त्यांना गुंतवून ठेवले. सर्वांचे खूप खूप पुण्यानुमोदन

मित्र दिवस, वरुड मोर्शी

30-09-2024

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

सुखवग्ग (गाथा न.२०४) यावर मीत्रदिवस वरुड येथे.

सूत्रसंचालन धम्ममित्र अर्चना गजभिये आभार कल्पना गाडगे  परिचय धम्मचारी बोधिनंदन यांनी केला.आदर्शाची पूजा व त्रिसरण पंचशील विधायक शील यांनी मित्र दिवसाची सुरुवात करण्यात आली. आरोग्य संतुष्टी आणि निर्वाण यात परमसुख आहे. आपण आपल्यातील दानभावना वाढविली पाहिजे. ध्यानात सखोल जाऊन चिंतन सुद्धा केले पाहिजे. प्रसन्नजित राजाची आणि किसा गौतमीची गोष्ट सांगून विषयाला अधिक सोपे करून सांगण्यात आले.त्रिरत्न वंदना व धम्मपालन गाथेनी मित्र दिवसाची सांगता करण्यात आली.

धर्मपाल जयंती, मोर्शी

19-09-2024

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

आज दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोज मंगळवार ला ठीक सहा वाजता धम्मचारींनी मैत्रीतारा यांचे त्रिरत्न बौद्ध महासंघ मोर्शी सेंटर वर प्रवचन झाले सर्वप्रथम धम्मचारींनी मैत्री तारा यांच्या हस्ते आदर्शाची पूजा करण्यात आली धम्ममित्र पोर्णीमाताई तागडे व पखाले ताई यांनी पूजेचे नेतृत्व केले. मैत्रीतारा अर्चनाताई आणि पद्माताई यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर  मैत्रीतारा यांचा परिचय धम्ममित्र सविताताई मनोहरे यांनी करून दिला. मैत्रीतारा यांनी अनागरिक धर्मपाल यांच्या 160 व्या जयंतीनिमित्त सुंदर असे प्रवचन दिले आणि महत्त्वाचा एक संदेश देऊन गेल्या की आपण जर संघटित असलो तर आपण कोणतेही काम व्यवस्थित रित्या पार पाडू शकतो त्यानंतर धम्ममित्र ढोके  यांनी आभार प्रदर्शन केले तर कार्येक्रमाचे संचालन प्रमोदभाऊ खडसे यांनी केले शेवटी धम्मपालन गाथा घेऊन आजच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

अनागारिक धर्मपाल जयंती, वरुड

19-09-2024

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

अनागरिक धर्मपाल यांची जयंती.

करुणा बुद्ध विहार वरूड येथे त्रिरत्न बौध्द महासंघ वरूड यांचे अंतर्गत अनागारिक धर्मपाल यांची जयंती साजरी करण्यात आली. धम्मचारी तेजोमुनी यांच्या प्रमुख उपस्थितीत ह्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य प्रवचनकार धम्मचारी कुशलबोधी हे होते. बुध्दगया  येथील महाबोधी विहाराच्या मुक्ती आंदोलन त्यांनी कशाप्रकारे सुरू केले ..बुद्ध धम्माच्या भवितव्यासाठी केलेले कष्ट .महाबोधी सोसायटीत केलेले कार्य विषद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्ममित्र राहुल बागडे पूजेचे नेतृत्व धम्ममित्र निर्मलाताई लांडगे परिसरातील बहुसंख्य लोकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला .कार्यक्रमाच्या यशस्वतेसाठी धम्मचारी बोधिनंदन, धम्ममित्र गजभिये ब्राम्हणे सर, उद्योजक यावलकर काकाजी..विनोद बागडे इंजी डबरासे काकाजी..बांबोडे जी मारोतराव धुत्ताले दुपारे मॅडम कल्पणाताई गाडगे इ प्रयत्न केले  .. नी आभार प्रदर्शन व धम्मपालन गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली.

भन्ते जयंती, वरुड

27-08-2024

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

त्रिरत्न बौद्ध महासंघ वरुड केंद्र द्वारा पूज्य.उ.संघरक्षित यांची 99वी जयंती संपन्न झाली.धम्मचारिणी मैत्रीतरा यांनी उ. संघरक्षित जी यांच्या जीवनावरव मूलभूत शिकवणीवर सुंदर चिंतनत्मक प्रवचन दिले. परिचय धम्ममित्र निर्मलाताई लांडगे ध्यान धम्मचारीणी अचलसिरी यांनी तर पाली पूजेचे नेतृत्व धम्ममित्र ब्राह्मणे सर, ध.बाबुरावजी डबरासे ध.मारोतराव धुताले. गित ध.ज्योतीताई गाडगे. संचालन ध.राहुल बागडे. आभार व पुण्यानुमोदन ध. वैशालीताई अधव. धम्मचारी कुशलबोधी व ध.बोधिनंदन ध. तेजोमुनी धम्म मित्र महिला पुरुष उपस्थित होते

वरुड मित्रदिवस

20-08-2024

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

करुणा बुद्ध विहार वरुड येथे आज दिनांक १९ला मित्र दिवसाचे नेतृत्व धम्मचारी आर्यसिद्धी अमरावती यांनी केले.

विसंवाद,समस्या, कठीण गुंतागुंतीच्या अश्या प्रतिकूल  परिस्थितीत आपण आपले धम्म जीवन कसे जगलो पाहिजे आणि कोणत्या गोष्टीमुळे आपल्यात विसवांद होतो यावर त्यांनी प्रवचन दिले.

कार्यक्रमचे सूत्रसंचालन धम्ममित्र अरुण ब्राह्मणे, पूजेचे नेतृत्व धम्ममित्र निर्मला लांडगे, हिरुबाई अधव, वैशाली अधव, आनापानसती ध्यान श्रद्धाश्री, परिचय कुशलबोधी, आभार राहुल बागडे,गीत शोभा खनखने यांनी केले.२१ महिला व १०पुरुष तसेच बोधिनंदन, प्रसन्नदर्शी, कुशलबोधी अचलसीरी, श्रद्धाश्री, मैत्रीतारा, हजर होत्या.

मित्र दिवस वरुड

28-07-2024

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

दिनांक २८जुलैला मित्रदिवस करुणा बुद्ध विहार वरुड येथे आयोजित करण्यात आला. या मित्र दिवसला १७मित्र महिला व ४पुरुष मित्र उपस्थित होते..धम्मचारी तेजोमुनी यांनी ८मार्गदर्शक तत्व या विषयावर कार्यशाळा घेतली.संचालन धम्ममित्र वैशाली अधव, आनापानसती धम्मचारी कुशलबोधी, पाली पूजा अर्चना गजभिये व शिल्पा बागडे, यांनी केले.गटचर्चा,प्रश्न उत्तर व धम्मपालन गाथा व आभार धम्ममित्र राहुल बागडे यांनी केले.

धम्ममित्र दिवस, मोर्शी.

21-07-2024

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

आज दिनांक १७जुलै २०२४ रोज बुधवार ला त्रिरत्न बौद्ध महासंघ मोर्शी सेंटरवर एक दिवसीय मित्र दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.या मित्र दिवसाचे नेतृत्वकार आदरणीय धम्मचारी विशुद्धी वाचा हे होते. विषय होता आर्य अष्टांगिक मार्गांमधील सम्यक व्यायाम                   

सर्वप्रथम आदर्शाची पूजा करून सुरुवात करण्यात आली.पूजेचे नेतृत्व धम्ममित्र रामटेके साहेब व  ढोके साहेब यांनी केले. धम्मचारी सुगतानंद यांनी ध्यानाचे नेतृत्व केले. तर विमलसुर्य यांनी परिचय करून दिला. त्यानंतर सम्यक व्यायाम या विषयावर धम्मचारी विशुद्ध वाचा यांनी प्रवचन दिले या प्रवचनामध्ये त्यांनी चार विशेष प्रयत्न ज्यामध्ये सम्यक व्यायामात अनुक्रमे टाळणे,उच्छेद करणे ,विकसित करणे,आणि रक्षण करणे .याबद्दलची खूप सोप्या पद्धतीने माहिती देण्यात आली त्यानंतर ध्यानातील अडथळे कामछंद,व्यापाद,चिंता अस्वस्था,आळस,कुशंका याबद्दल त्यांनी माहिती दिली या विषयावर सर्व मित्रांनी वर्गामध्ये सहभाग घेतला सर्वांनी आपापले मत व्यक्त केले आणि शेवटी सप्तांग पूजेचे सातव्या अंगाने या एकदिवशी मित्र दिवसाची सांगता करण्यात आली.आजच्या मित्र दिवसाचे संचालन धम्ममित्र प्रमोदभाऊ खडसे यांनी तर आभार प्रदर्शन रमेश भाऊ गाडगे यांनी केले. धम्मचारी श्रद्धाप्रिय यांची प्रमुख उपस्थिती होती.

शरणगमण प्रक्रिया कार्यशाळा, वरुड

09-06-2024

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

आज दिनांक ८जूनला GFR मित्र महिलांनकरीता 

धम्मचारिणी विजया यांनी शरणगमण प्रक्रिया कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेला १५ GFR मित्र महिला तसेच स्थानिक सेंटरच्या धम्मचारिणीअचलसीरी, श्रद्धाश्री,मैत्रीतारा हजर होत्या..या कार्यशाळेत चाप्टर चे नियोजन कसे करायचे व चाप्टरला कसे महत्व दयायचे यावर मार्गदर्शन करण्यात आले.धम्मचारिणी विजया यांनी चाप्टर ला भेटी दिल्यात.

महिला मित्र डे, वरुड

07-06-2024

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

त्रिरत्न बौद्ध महासंघ वरुड.

आज दिनांक *७जूनला* करुणा बुद्ध विहार येथे मित्र डे आयोजित करण्यात आला होता. या मित्रडेला *२५* मित्र महिला धम्म चारिणी विजया,अचलसीरी, श्रद्धाश्री व हजर होत्या.

मित्र डे चे नेतृत्व धम्मचारीणी *विजया* यांनी केले. शरणगमन या विषयावर त्यांनी महिला मित्रांसाठी ११ते ५ या दरम्यान कार्यशाळा घेतली.हसत खेळत व सोप्या भाषेत व अनेक उदाहरणे देऊन या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.

शिबिराचा दुसरा दिवस, वरुड

22-05-2024

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

त्रिरत्न बौद्ध महासंघ वरुड द्वारा आयोजित बालसंस्कार शिबिराचा आजचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवसाची सुरुवात पूजेने झाली पूजेचे नेतृत्व मित्र राहुल बागडे धुताले साहेब, प्रेम गडगे व धमचारी बोधिनंदन यांनी ध्यान घेतले  संचालन ब्राह्मणे सरांनी केले याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉक्टर रोहन पवार डॉक्टर मानसी पाटील  उपस्थित होते आर्किटेक्चर महेश घोरपडे यांनी चित्रकलेची कृती फळ्यावर रंगवली मुलांनी ती आपल्या वहीत रेखाटली कराटे मास्टर रामपांडे सर यांनी कराटेचे मार्गदर्शन केले शिबिराला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या त्याच डॉक्टर निळकंठ यावलकर मनोज बागडे धर्मेंद्र पाटील खणखने ऍड. योगेश नागले संजय पाटील व आयु. पाटील ताई इत्यादी उपस्थीत होते आढाऊ सर प्राध्यापक सोमकुवर सर यांनी शिबिर यशस्वीतेसाठी प्रयत्न केले मृणाल बांबोडे खणखणे काकू, ताकसांडे काकू, लक्ष्मी बाई मेश्राम ,बागडे बाई लाईब्रियन यांनी अल्पोहाराचे व्यवस्था केली.विनोद बागडे यांनी दुसऱ्या दिवशीची सांगता माणसाने माणसाशी माणसासमान वागणे या गीताने केली आज शिबिरात जवळपास ३५ विद्यार्थी उपस्थित होते.

बालसंस्कार शिबीर वरुड.

21-05-2024

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

त्रिरत्न बौद्ध महासंघ वरूड द्वारा आयोजित बाल संस्कार शिबिर दिनांक 21 मे पासून सुरू.... 

करुणा बुद्ध विहार येथे आज बाल संस्कार शिबिराचे उद्घाटन झाले त्याप्रसंगी वरुड चे ख्यातनाम दंत चिकित्सक डॉ चंद्रशेखर बासुंदे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष धम्मचारी बोधिनंदन प्रमुख पाहुणे म्हणून श्रीपाद रंगारी तसेच एडवोकेट योगेश नागले यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. जवळपास 21 विद्यार्थ्यांनी या शिबिरासाठी नोंदणी केली. शिबिराचे मार्गदर्शक आर्किटेक्चर महेश घोरपडे यांनी चित्रकले विषयी सोप्या पद्धतीने माहिती दिली. कराटे मास्टर राम पांडे सर यांनी कराटे विषयी मार्गदर्शन प्रात्यक्षिक करून सांगितले.  शिबिराच्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाचे संचालन राहुल बागडे यांनी केले प्रस्ताविक विनोद बागडे यांनी केले सर अरुणजी ब्राह्मणे सर सीएम गजभिये मारोतराव धुताले यांनी शिबिरार्थ्याची नोंदणी केली शिबिरासाठी अनेक मित्र सहाय्यक धम्मचारी यांनी मेहनत घेतली. पहिल्या दिवसाचा शेवट मैत्री गीताने झाला

धम्ममित्र डबरासे जन्मदिन, वरुड

28-04-2024

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

धम्म मित्र डबरासेसाहेब यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित करुणा बुद्ध विहरा मधे कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते त्यानिमित्ताने धम्मचारी श्रद्धाप्रिय यांचे प्रवचन ठेवण्यात आले होते.सोबतच भोजन दान आणि 5000रू. नगद करुणा बुध्द विहाराला दान दिले. कार्यक्रमाला धम्मचारी महास्थाम, संघवीर व स्थानिक सर्व धम्मचारी, धम्मचारिणी हजर होते, तसेच वाशीम वरून त्याचे जावई व मुलगी डॉ. सिद्धार्थ देवळे एम.डी मेडिसिन व डॉ.वैशाली देवळे रेडिओलॉजी तसेच सर्व नातेवाईक सुद्धा हजर होते.त्यांना सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी बरेच लोकांनी आपले मनोगत व काकाजीचे सदगुण सांगून पुण्यानुमोदन केले.

महामानव जयंती, वरुड.

14-04-2024

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

बोधिसत्व,परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती त्रिरत्न बौद्ध महासंघ वरुड केंद्राद्वारे संपन्न झाली. धम्मध्वजारोहणअरविंद वानखडे साहेब यांनी केले.मुख्य मार्गदर्शक म्हणून आदरणीयधम्मचारी रत्नसिद्धी यांनी बोधिसत्त्वाच्या चार प्रतिज्ञा या विषयावर  अतिशय मार्मीक असे मार्गदर्शन केले. धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे. स्वतःच्या दोषांवर कार्य करणे भवसागर पार करण्याकरता एक दुसर्‍यास मदत करणे. बाबासाहेबांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगितले. कार्यक्रमाचे संचालन धम्ममित्र राहुल बागडे, परिचय धम्मचारी कुशलबोधी यांनी दिला. वंदनगित धम्ममित्र शोभाताई खणखणे यांनी तर पालीपुजेचे नेतृत्व सृजक महिला चॅप्टरनी केले. आभार, पुण्यानुमोदन धम्मचारी तेजोमुनी यांनी केले. केंद्रातील सर्व धम्मचारी,धम्मचारीणी, मित्र महिला पुरुष, धम्मसहायक मोठया संख्येने उपस्थित होते.. आमदार देवेंद्र भुयार व ठाणेदार साहेब यांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी उपस्थिती दर्शविली.

विध्यार्थ्यांसाठी कार्यशाळा, वरुड.

14-04-2024

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

त्रिरत्न बौध्द महासंघ केंद्र वरुड व प्रज्ञा सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने बोधीसत्त्व परमपूज्य  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त १२एप्रिल  careear gaidance workshop घेण्यात आला या workshop ला सीए विक्रम  बोरकर मार्गदर्शक होते.या कार्यशाळेला विध्यार्थांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.. कार्यक्रमाचे संचालन वाचनालयातील विद्यार्थिनी प्रज्ञाने केले. धम्मचारिणी मैत्रीतारा यांनी त्रीसरण पंचशील व विधायक शील घेऊन कार्यक्रमला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे यशस्वीकरता धम्ममित्र स्मृति अधव, रोशन अधव, प्रिया हनमते, वाचनालयातील सदस्य, अध्यक्ष, धम्मचारी, धम्मचारिणी, मित्र व सहाय्यक यांनी परिश्रम घेतले.

महिला मित्र शिबीर,वरुड

02-04-2024

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

त्रिरत्न बौद्ध महासंघ वरूड मोर्शी येथे दिनांक २९ मार्च ते २एप्रिल यादरम्यान मित्र महिलांसाठी निवासी शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराचा विषय होता पधानसुत्त.शिबिराचे नेतृत्व धम्मचारीणी ज्ञानज्योती नागपूर. पधान म्हणजे प्रधान,मुख्य सुत्त. मार म्हणजे जीवनात येणात्रिरत्नार येथे निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले. याला ४४ मित्र महिला व चार धम्मचारीणी ज्ञानज्योती  मैत्रीतारा,अचलसीरी,श्रद्धाश्री उपस्थित होत्या. वरुड,भुसावळ,चंद्रपूर,नागपूर,अकोला,अमरावती, यवतमाळ,धामणगाव,आसेगाव,परतवाडा,चांदूरबाजार मोर्शी, काटोल अश्या विविध ठिकाणाहून धम्ममित्र महिला उपस्थित झाल्या होत्या.

शिबिराच्या यशस्वी ते करता केंद्रातील सर्व धम्मचारी बोधिनंदन,तेजोमुनी, कुशलबोधी धम्मचारिणी धम्ममित्र,विशेष म्हणजे जेवण,नास्ता, रात्रीचे जेवण चहा, दुध,फळ,व बिछायत या सर्व गोष्टीची उत्तम व्यवस्था या सर्व गोष्टी धम्म मित्र संजय चक्रपाणी यांनी केली. नोंदणीसाठी गजभीये भाऊ व शंभरकर सरांनी मदत केली.सुरेंद्रा सोनुले मेहनत घेतली व मदत केली. शिबिरासाठीया सर्वांनी परिश्रम घेतले.

गरम पाण्यासाठी धम्ममित्र सुरेंद्रा सोनुले यांनी गॅस गिझर दान दिले.नलिनी ताई इंगळे अमरावती यांनी ₹१००००दान दिले.

अनिवासी उन्हाळी शिबीर, वरुड

26-03-2024

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

त्रिरत्न बौद्ध महासंघ वरुड मोर्शी द्वारा तीन दिवसीय अनिवासी शिबिराचे आयोजन दिनांक २३,२४,२५मार्च या दरम्यान करण्यात आले होते.शिबिराला नेतृत्वकार म्हणून लाभलेले धम्मचारी अनोमशुर, नागपूर,यांनी नवीन समाजाची दृष्टी या विषयाला धरून शुद्रा, जब्बार पटेल दिग्दर्शित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि अंगुलीमाल असे तीन चित्रपट प्रोजेक्टर द्वारा दाखवुन योग्य दृष्टी,अयोग्य दृष्टी आणि परिपूर्ण दृष्टी कशी असते हे या चित्रपटाच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिले.

अयोग्य दृष्टी :- म्हणजे

दैवी चमत्कारावर विश्वास ठेवणे.

ईश्वरावर विश्वास ठेवणे. ब्रह्म सायुज्यावर आधारित धर्म.

आत्म्यावर विश्वास,

यज्ञयागावर विश्वास. काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म.

योग्य दृष्टी :- जीवनाची पवित्रता बनवून ठेवणे.

जीवनात पूर्णत्व प्राप्त करणे

निर्वाण प्राप्त करणे.

तृष्णेचा त्याग करणे.

सर्व संस्कार अशाश्वत आहे असे मानणे.

कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे असे मानणे.

सगळे संस्कार अनित्य आहे

नहि वेरेण वेराणी सम्मन्तीध कुदाचनं l अ

वरेण च सम्मन्ति एस धम्मो सनातनो ll.

अर्थ:-वैराने वैर कधीच क्षमत नाही,तर केवळ मैत्री भावनेने ते क्षमत, हाच सनातन धर्म आहे.

हिच परिपूर्ण दृष्टी आहे.

या शिबिराला धम्मचारी अमेयज्ञान नागपूर व केंद्रातील धम्मचारी बोधिनंदन, कुशलबोधी , धम्मचारिणी मैत्रीतारा, अचलसीरी, श्रद्धाश्री उपस्थित होते. तसेच शिबिराला युवक,युवतीसह ७०ते ७५ शिबिरार्थी उपस्थित होते.

बुद्ध लेणी, सालबर्डी

25-02-2024

By Dh. Sraddhasreee, Warud Center - Warud

 त्रिरत्न बौद्ध महासंघ अमरावती जिल्हा तर्फे माघ पौर्णिमा कृतज्ञता दिन समारोह सालबर्डी येथील बुद्ध लेण्यांमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्त एक दिवशीय धम्म सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने अमरावती येथील अनगड नगर, वरुड, मोर्शी व बिहाली या सर्व केंद्रातील धम्ममित्र धम्मचारिणी, धम्मचारी मोठ्या संख्येने परिसरातील लोक उपस्थित होते. सर्वांनीच पहिल्यांदाच या लेणीला भेट दिल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती. खरंतर लेणीचा प्रवास हा फार खडतर आहे परंतु  सर्वांनीच खूप आनंद घेतला. लेणी मध्ये असलेले बुद्ध रूप फारच आकर्षित व मोहक आहे

आजच्या कार्यक्रमाचे संचालन धम्मचारिणी श्रद्धाश्री.

पूजा धम्मचारी कुशलबोधी पूजेत त्रिसरण पंचशील विधायकशील, बुद्ध पूजा त्रिरत्न वंदना महामंगलसूत्त, घेण्यात आले.

जस्ट सीटिंग व श्याक्य मुनी मंत्राचे पठण धम्मचारी विवेक चित्त.

आजच्या विशेष पौर्णिमेचे महत्त्व धम्मचारी श्रद्धाप्रिय यांनी सुंदर रित्या सांगितले.

धम्मपालन गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

मित्र दिवस वरुड मोर्शी

19-02-2024

By Dh. Sraddhasreee, Warud. Center - Warud

दिनांक १९फेब्रुवारी ला वरुड मोर्शी केंद्रा अंतर्गत मित्र डे चे आयोजन करण्यात आले होते. मित्रडे चे नेतृत्व धम्मचारी श्रद्धाप्रिय यांनी केले. आजच्या मित्र डे चा विषय जगात त्रिरत्न बौद्ध महासंघाचे महत्त्व. बाबासाहेबांनी १९५०साली महाबोधी सोसायटीला लिहिलेल्या लेखाचा उल्लेख त्यानुसार उरगेन संघरक्षित यांनी केलेले कार्य व  संघाचा विस्तार या बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला.

संघातील सहा विशेषता या अंतर्गत खालील बाबीवर स्पष्टता  करून देण्यात आली.

१)हा संघ सर्वांसाठी खुला     

   आहे.

२) सर्व जगातील परंपरेचा  

     आदर करतो.

३) शरण गमन प्रथमस्थानी.

४) ऑर्डर एकच आहे.

५) सम्यक आजीविका.

6) कल्याण मित्रता.

या मित्रडेला धम्मचारिणी सुरुची उपस्थित होत्या. त्यांनी धम्मचारी श्रद्धाप्रिय यांचा परिचय करून दिला.  आनापानसती या ध्यान साधनेचा सराव धम्मचारिणी अचलसीरीनी,कुशलबोधिनी सप्तांग पूजा, शाक्यमुनी मंत्राचे पठण श्रद्धाश्री, सूत्रसंचालन धम्म मित्र मृणाल बांबोडे, स्वागत गीत धम्ममित्र शीलागाडगे,त्रिरत्न वंदना धम्ममित्र निर्मला लांडगे, कल्पना गाडगे, शोभा खणखणे यांनी, आभार प्रदर्शन धम्म मित्र वैशाली अधव यांनी केले.

मोर्शी आणि वरुड येथील धम्म मित्रांनी या मित्र डे ला चांगला प्रतिसाद दिला.

आदल्या दिवशी मूर्तीची साफसफाई विहार सफाई मेहंदी कटिंग, बागेतील तनकट या सर्व गोष्टी सर्व धम्म मित्र महिलांनी वेळेचे दान देऊन केल्यात. मित्र डे यशस्वी केल्याबद्दल सर्व धम्ममित्रांचे खूप खूप पुण्यानुमोदन

साप्ताहिक धम्म वर्ग, वरुड

25-12-2023

By Dh. Sraddhashree, Warud Center - Warud

त्रिरत्न बौध्द महासंघ वरुड द्वारा दर सोमवारी सायंकाळी ६:००ते ८:००धम्म वर्ग चालवीण्यात येतो.यातील आज बुद्ध या विषयावर धम्मप्रवचन धम्मचारिणी मैत्रीतारा यांनी दिले.

नागकेतूंची सेंटरला भेट, वरुड

18-12-2023

By Dh. Sraddhasreee, Warud. Center - Warud

त्रिरत्न बौद्ध महासंघ वरुड -मोर्शी केंद्राला धम्मचारी नागकेतु यांची सदिच्छा भेट. मोर्शी येथील सर्व धम्ममित्र व वरुड येथील सर्व समितीतील धम्मचारी धम्मचारीणी व धम्म मित्र यांच्याशी सुसंवाद साधला. सेंटरच्या भरभराटीसाठी व धम्म प्रचार आणि प्रचारासाठी योग्य ते मार्गदर्शन केले.

महामानवास अभिवादन एक दिवशीय शिबीर, वरुड.

18-12-2023

By Dh.Sraddhasree,Warud. Center - Warud

वरूड येथे बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन

परिनिब्बान दिवस, वरुड

06-12-2023

By Dh. Sraddhasree, Warud Center - Warud

आज ६ डिसेंबर ला बाबासाहेबांच्या परिनिब्बान दिनानिमित्त सकाळी ८:३० वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक सोमकुवर  सर यांनी मार्गदर्शन केले. आपल्यामध्ये अनेक उणीवा असून त्या मान्य केल्या पाहिजे तेव्हाच आपण समोर जाऊ शकू, सोबत शीलवान असायला पाहिजे, असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात व्यक्त केले.

धम्मचारी बोधिनंदन यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.

वरुड येथील ठाणेदार चव्हाण साहेबांनी बाबासाहेबांच्या फोटोला हारार्पण केले.

धमचारी कुशलबोधीवरुड येथील ठाणेदार चव्हाण साहेबांनीमाचे संचालन तसेच त्रिसरण,पंचशील, विधायक शील,बुद्धपुजा,त्रीरत्नवंदना,महामंगलसूत्त,करणीयमेत्त सूत्त व ॐ मनी पद्मे हुं या मंत्राचे पठण केले.

यावेळी ऋत्विक खंडारे या बालमित्राने व शोभाताई खणखणे यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर सुंदर मधुर आवाजात गीत सादर केले.

कार्यक्रमाला धम्मचारीतेजोमुनी,कुशलबोधी,बोधिनंदन, धम्मचारिणी,श्रद्धाश्री,अचलसीरी, धम्ममित्र व सहायक उपस्थित होते.

कार्तिक पौर्णिमा उत्सव

28-11-2023

By Dh. Sraddhasree, Warud Center - Warud

त्रीरत्न बौद्ध महासंघ वरुड च्या वतीने दिनांक २६ला मित्रडे व पुर्ननिश्चय  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पाली पुजेचे नेतृत्व धम्म मित्र कल्पना गाडगे व वैशाली अधव यांनी केले.आनापानसती ह्या ध्यानाचे नेतृत्व धम्मचारी बोधिनंदन यांनी केले तसेच धम्मचारी तेजोमुनी यांचा परिचय करुन दिला.धुताले भाऊ यांनी गीत सादर केले.

धम्मचारी तेजोमुनी यांनी शरणगमण या विषयावर प्रवचन दिले.शरणगमणाच्या पातळ्या सविस्तर सांगितल्या.

दुपारच्या सत्रात धम्मचर्चा, मनोगत करण्यात आले.

मित्रडे चे संचालन धम्ममित्र निर्मला लांडगे यांनी तर आभार धम्ममित्र अरुण ब्राम्हणे यांनी केले.

१०मी.जस्ट सीटिंग घेण्यात आले.जस्ट सीटिंगचे नेतृत्व धम्मचारिणी अचलसीरी यांनी केले. सप्तांग पूजेचे नेतृत्व धम्मचारिणी श्रद्धाश्री यांनी केले.

पहिल्या अंगानंतर मंत्र पठणात प्रत्येकानी पुष्प, मेणबत्ती, अगरबत्ती प्रज्वलीत करून पुनर्निचय केला.धम्मचारी कुशलबोधी यांनी मंत्र पठण केले. धम्मपालन गाथेने सांगता करण्यात आली.

हिवाळी धम्म शिबीर वरुड -मोर्शी

18-11-2023

By Dh. Sraddhasree, Warud Center - Warud

त्रिरत्न बौद्ध महासंघ वरूड -मोर्शी केंद्रा द्वारा दिनांक ११नोव्हेंबर ते १६नोव्हेंबर दरम्यान हिवाळी निवासी शिबिराचे आयोजन मढघे मंगल कार्यालय मोर्शी येथे करण्यात आले होते.

शिबिराचा विषय होता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व देशपरिवर्तन. या शिबिराचे नेतृत्व धम्मचारी नागभद्र अमरावती यांनी केले.

धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानव सेवा आहे. या बोधिसत्व बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराला २५० शिबिरार्थी  उपस्थित होते.                   

दिनांक ११ ला सायंकाळी आदरश्याच्या पूजेनी शिबिराची सुरुवात करण्यात आली .त्रिसरण पंचशील विधायकशील व बुद्ध पूजा धम्मचारी तेजोमुनी यांनी घेतली. सर्व धम्मचारी व धम्मचारीणीचा परिचय शिबीरार्थ्यांना करून देण्यात आला. शिबिराची प्रस्तावना धम्मचारी नागभद्र यांनी  केली. शिबिर यशस्वीतेसाठी काही सूचना व शिबीराचे वेळापत्रक सांगून शेवटी समर्पण विधी व धम्मपालन गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

रोज सकाळी ६:३०वाजता व दुपारी ४:३०वाजता आनापानसती मैत्री विकास  याबद्दल माहिती व ध्यान साधनेचा सराव धम्मचारी नागभद्र हे करून घेत होते.चलितध्यान सुद्धा घेण्यात येत होते.

रोज सकाळी पाली पुजेचे नेतृत्व धम्मचारिणी मैत्रीतारा करीत होत्या.

सकाळी रोज १०:००ते १:००वाजता धम्मश्रवण व धम्मचर्चा होत होत्या.

स्वतःच्या व देशाच्या परिवर्तनासाठी विदया, चेतवा व संघटित होणे किती आवश्यक आहे असे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करीन तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही याचे महत्व पटवून दिले.जातीविरहित समाज निर्माण करणे हे बाबासाहेबांचे स्वप्न होते कारण जाती ह्या देशासाठी घातक असून त्या नष्ट केल्याशिवाय स्वातंत्र्य समता बंधुत्व येऊ शकत नाही.रोजच्या जीवनामध्ये नीतिमत्ता किती आवश्यक आहे. चारित्र्य नसेल तर देशाचा उद्धार होऊ शकणार नाही. धार्मिक व्हायला हवे. पंचशीलाच्या व दशशिलाच्या आचरणाशिवाय माणूस सुखी होऊ शकणार नाही.

माणसाला धम्माची - सदधम्माची आवश्यकता का? कारण केवळ बौद्ध धम्मानेच स्वतःचा व जगाचा उद्धार होऊ शकतो. बौद्ध धम्म हाच केवळ बहुजनाच्या विकासाचा,कल्याणाचा धम्म आहे असे त्यांनी आपल्या धम्म श्रवणात सांगितले.

उत्कृष्ट संघटक, कवी,गझलकार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गाढे अभ्यासक व बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन केलेले धम्मकार्य त्यासाठी लागणारी शक्ती अशा अनेक सद्गुणांनी युक्त असलेले धम्मचारी नागभद्र यांचा परिचय रोजच धम्मचारी प्रसन्नदर्शी हे करून देत होते.रोज सायंकाळी ८:००वाजता धम्मश्रवण चा विषय होता बोधिसत्व प्रतिज्ञा. आपण प्रतिज्ञा करूया जीवसृष्टी आहे असीम ती भवसागर पार नेण्याची  :-धम्मचारी नागभद्रआपण प्रतिज्ञा करूया आपणात दोष असंख्य ते नष्टकरण्याची :-धम्मचारिणी मैत्रीतारा.आपण प्रतिज्ञा करूया आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची: -धम्मचारी तेजोमुनी.आपण प्रतिज्ञा करूया भगवान बुद्धाचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याचा:-धम्मचारी प्रसन्नदर्शी यांनी धम्मश्रवण केले. सर्वांचा परिचय धम्मचारी कुशलबोधी यांनी करून दिला.रोज रात्री ९:०० वाजता त्रिसरण पंचशील विधायकशील २२ प्रतिज्ञा अर्पणविधी व धम्मपालन गाथा घेण्यात आली.धम्मचारिणी अचलसीरी यांनी रोज ग्रंथाचे पठण केले तसेच धम्मचारी बोधिनंदन हे संवाद कौशल्याचा सराव करून घेत होते.धम्मचरिणी श्रद्धाश्री यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन केले.समारोपीय कार्यक्रमाचे संचालन धम्ममित्र वैशाली खोब्रागडे धम्ममित्र ललिता गाडगे यांनी आभार केले. यावेळी शिबिरा करिता व बांधकामा करिता मुक्तहस्ते दान दिले त्यांचा सत्कार करण्यात आला. धम्मचारी नागभद्र यांचे समारोपिय  प्रवचन झाले शिबिराचे आकर्षण राहले पूजास्थान, ते सजवण्याची जबाबदारी धम्ममित्र संजय चक्रपाणी व त्यांची टिम यांनी खूप सुंदर रित्या पार पाडली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी वरुड -मोर्शी येथील सर्व धम्मचारी प्रसन्नदर्शी, तेजोमुनी, बोधी नंदन, कुशलबोधी,धम्मचारिणी श्रद्धाश्री, अचलसिरी, मैत्रीतारा तसेच सर्व धम्ममित्र बंधू भगिनींनी अथक परिश्रम घेतले. सर्वांच्या सहकार्यामुळे हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले. सर्व शिबिरार्थ्यांनी शिबिराचा उत्तमरीत्या आनंद घेतला व संकल्प केला बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीसाठी आम्ही सहकार्य करू.

मोर्शी मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी शिबिराला भेट दिली बाबासाहेबांचे कार्य पुढे नेण्यासाठी अशा शिबिरांची आवश्यकता आहे असे त्यांनी व्यक्त केले.

हिवाळी शिबीर, वरुड-मोर्शी.

12-11-2023

By Dh. Sraddhasree, Warud Center - Warud

वरुड मोर्शी केंद्रातर्फे दिनांक 11 नोव्हेंबर ते  16 नोव्हेंबर पर्यंत घेण्यात येत असलेल्या हिवाळी शिबिराची सुरुवात झालेली आहे. या शिबिराला  225ते 250 शिबिरार्थी सहभागी झालेले आहे.

शिबिराचा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार व देश परिवर्तन. शिबिराचे नेतृत्वकार धम्मचारी नागभद्र  अमरावती.                        दिनांक 11 ला सायंकाळी आदर्शाची पूजेनी झाली.त्रिसरण पंचशील विधायकशील व बुद्ध पूजा धम्मचारी तेजोमुनी यांनी घेतली. सर्व धम्म चारी व धम्मचारीणीचा परिचय शिवीरार्थ्यांना करून देण्यात आला. शिबिराची प्रस्तावना धम्मचारी नागभद्र यांनी  केली शिबिर यशस्वीतेसाठी काही सूचना व शिवीराचे वेळापत्रक सांगून शेवटी धम्मपालन गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

धम्मचक्र अनुप्रवतनीय दिवस, वरुड

25-10-2023

By Dh Sraddhasree, Warud Center - Warud

त्रीरत्न बौद्ध महासंघ वरुड केंद्रातर्फे करुणा बौद्ध विहार वरुड येथे अशोक विजयादशमी व धम्मचक्र अनुप्रवर्तनीय दिवस साजरा करण्यात आला.

सकाळी ८:३० वाजता प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेलेआयुष्यमान संजय शंभरकर यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले. पाहुण्यांच्या हस्ते आदर्शाची पूजा करण्यात आली. धम्ममित्र अर्चना गजभिये, मृणाल बांबोडे, ज्योती गाडगे यांनी पाली पूजेचे नेतृत्व केले. जस्ट सीटिंग चे नेतृत्व धम्मचारीणी अचलसीरी यांनी केले. ऋतिक खंडारे व शोभाताई खणखणे यांनी सुंदर गीत गाऊन मंत्रमुग्ध केले.

धम्मचारी बोधिनंदन यांनी बाबासाहेबांनी १९३५ साली धर्मांतराची घोषणा करून १४ ऑक्टोबर १९५६साली धर्मांतर करून बौद्ध धम्माची दीक्षा दिली. प्रत्येक बौद्धांनी आचरणशील व्यक्ती बनाव असा संदेश त्यांनी या प्रवचनातून दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्म मित्र अरुण ब्राह्मणे सर यांनी केले. आभार प्रदर्शन  धम्म मित्र कपिल  कांबळे यांनी केले. कार्यक्रमाला जवळपास 30 पहिला आणि पुरुष  उपस्थित होते.

धम्मचारिणीची कार्यशाळा, वरुड

26-09-2023

By Dh. Sraddhasree, Warud Center-Triratna

आज दिनांक २४/९/२०२३ला करुणा बुद्ध विहार वरुड येथे अमरावती विभागीय महिला ऑर्डर डे.                               

नेतृत्व :-धम्मचारिणी प्रज्ञासखी यांनी  सत्काय दृष्टी, विचिकइच्छा, शिलव्रत परामर्श ही तीन बंधने तोडून मनुष्य श्रोतापन्न  अवस्थेकडे कशी वाटचाल करू शकते यावर रोजच्या जीवनातील उदाहरण देऊन स्पष्ट केले.

सत्काय दृष्टी पक्का दृष्ठिकोन स्वतः च्या स्व ला फार चिकटून असतो, माझ माझ करतो. भौतिक गोष्टीत आसक्त असतो स्वतःच्या गावाबद्दल, नावाबद्दल, विहार, केंद्र, प्रांत अश्या अनेक बाबीला चिकटून राहतो. एखादया गोष्टीलाच पक्क समजतो.सूर्य पूर्वेकडून उगवतो व पश्चिमेकडे मावळतो परंतु सूर्य स्थिर आहे पुर्थ्वी फिरत आहे.

विचिकइच्छा :-निर्णय न घेण्याची क्षमता, विचलितता. कुशंका माणसाला पुढे जाऊ देत नाही. गध्याच उदाहरण देऊन स्पष्ट केले. एक गाढवं असते त्याच्या दोन्ही बाजुला गाजर ठेवतात. एक मनुष्य म्हणतो ह्या बाजूचे गाजर खाईल तर दुसरा म्हणतो या बाजूचे. गाढवं मात्र गोंधळलेला आहे व तो एकाच जागी उभा राहतो. असच आपल्या बाबत पण होत.

शिलवर्त परामर्श मध्ये कर्मकांड, रूढी परंपरा याच गोष्टी सत्य समजून तसेच वागत राहतो. त्यामागचा हेतू स्पष्ट असेल तर हे तिन्ही बंधने सैल करण्यासाठी मदत होईल व श्रोतापन्न अवस्थेकडे वाटचाल होऊ शकेल.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मचारिणी मैत्रीतारा यांनी केले. पाली पुजेचे नेतृत्व श्रद्धाश्री, दीपरत्ना यांनी केले. संघमेत्ता सुजया, परिचय सुरुची तर आभार अचलसीरी यांनी केले.

या कार्यक्रमाला विदर्भातील अमरावती, वर्धा, पुलगाव, हिंगणघाट,नागपूर अश्या विविध ठिकाणावरील ४०धम्मचारिणी उपस्थित होत्या.

९८वी जयंती, वरुड

30-08-2023

By Dh. Sraddhasree, Warud Center - Warud

त्रिरत्न बौद्ध महासंघ वरूड, करुणा बुद्ध विहार येथे त्रीरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक  पूज्य उर्गेन संघरक्षित यांची ९८वी जयंती साजरी करण्यात आली. दुपारी १२ते ४ मित्र महिलां करता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. धम्मचारिणी सुप्रभा (नागपूर ) यांनी प्रशिक्षणा च्या पाच पद्धती या विषया वर मार्गदर्शन केले. सोबत आलेल्या धम्मचारिणी सुगतधारिणी यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभले. सहभो जन गटचर्चा, प्रश्न उत्तरे अशा प्रकारचे पहिले सत्र राहिल.

सायंकाळच्या सत्रामध्ये आदर्शाच्या पूजेने सुरुवात झाली. धम्ममित्र रविना अधव, वैशाली अधव, निर्मला लांडगे नी पूजेचे नेतृत्व केले.

धम्मचारिणी सुप्रभा यांनी भन्तेच्या शिकवणीकीतील  पाच बाबी  शरण गमन, बोधिसत्वाचा आदर्श, कल्याणमित्रता, सांघिक सम्यक आजीविका व गंभीरपणे आचरण करणे या वर संघ कसा मजबूत आहे यावर प्रकाश टाकला.सूत्रसंचालन धम्मचारिणी अचलसीरी यांनी, परिचय  धम्मचारिणी मैत्रीतारा व पुण्यानुमोदन धम्मचारिणी श्रद्धाश्री यांनी केले. केंद्राचे धम्मचारी बोधिनंदन, कुशलबोधी व तेजोमुनी तसेच परिसरातील४३महिला व १८पुरुष उपस्थित होते.

संस्कृती ज्योती हरिदास गाडगे यांच्या जन्मदिना निमित्त मोर्शी केंद्राच्या निर्मितीसाठी ₹५०००दान देण्यात आले.

उर्गेन संघरक्षितांची जयंती, वरुड

30-08-2023

By Dh. Sraddhasree, Warud. Center-Triratna

त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक पूज्य उर्गेन संघरक्षित यांची ९८ वी जयंती त्रिरत्न बौद्ध महासंघ वरुड च्या वतीने करुणा बुद्ध विहार वरुड येथे साजरी करण्यात आली. याप्रसंगी धम्मचारींणी सुप्रभा(नागपूर )यांनी सकाळच्या सत्रामध्ये १२ ते ४ धम्म मित्र महिलांकरता प्रशिक्षणाच्या पाच पद्धती( एकाग्रता, विधायक भावना, धाम्मीक मृत्यू, धाम्मिक पूर्णजन्म , ग्रहणशीलता ) या विषयावर सुंदर असे प्रवचन दिले. सहभोजन, गटचर्चा, प्रश्नोत्तरे घेण्यात आले त्यांच्यासोबत आलेल्या धम्मचारीणी सुगत धारिणी यांची सुद्धा महिलांना मदत झाली. सायंकाळच्या सत्रामध्ये आदर्शाची पूजा व पाली पूजा घेण्यात आली. पाली पूजेचे नेतृत्व धम्म मित्र रविना अधव, निर्मला लांडगे व वैशाली अधव यांनी केले. धम्ममित्र नरेंद्र रामटेके यांनी तुम्हचे अमुचे बंधुत्वाचे नाते, भन्ते संघरक्षित..... हे गीत सादर केले. धम्मचारीणी सुप्रभा यांचा परिचय धम्मचारींनी मैत्रीतारा यांनी करून दिला. धम्मचारिणी सुप्रभा यांनी भन्तेच्या शिकवणीकीतील  शरणगमण, बोधिसत्वाचा आदर्श, कल्याणमित्रता, सांघिक सम्यक आजीविका व गंभीरपणे आचरण केल्यास श्रोतापन्न अवस्था या पाच बाबीवर संघाची निव भक्कमपणे आधारित आहे यावर सुंदर असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मचारिणी अचलसीरी यांनी केले. पुण्यानुमोदन धम्मचारींणी श्रद्धाश्री यांनी केले.या कार्यक्रमाला परिसरातील ४३महिला व १८पुरुष उपस्थित होते.धम्ममित्र ज्योती गाडगे यांनी त्यांच्या मुलीच्या संस्कृती गाडगे हिच्या वाढदिवसानिमित्त मोर्शी केंद्राच्या निर्मितीसाठी र ५००० दान दिले. 

महिला मित्र दिवस, वरुड

27-08-2023

By Dh. Sraddhasree ???? Center - Warud

दिनांक २६/८/२०२३ वरुड येथील करुणा बुद्ध विहार येथे महिला मित्र दिवस दुपारी १२:०० ते ४:१५ वाजेपर्यंत धम्मचारिणी सुप्रभा व धम्मचारिणी सुगतधारिणी यांच्या नेतृत्वात पार पडला. सुप्रभा यांनी प्रशिक्षणाच्या पाच पद्धती यावर प्रवचन दिले. सहभोजन, गटचर्चा, प्रश्नोत्तर या सर्वांचा लाभ मित्र महिलांसाठो खुप उपयुक्त ठरला, सर्वांनी खूप लाभ घेतला. यावेळी धम्मचारिणी अचलसीरी, मैत्रीतारा, श्रद्धाश्री उपस्थितत होत्या, मित्र महिला सुद्धा मोठया संघेणे उपस्थित होत्या. निर्मला लांडगे यांनी त्रिसरण पंचशील व जस्ट सीटिंग घेतले. आभार ज्योती गाडगे यांनी केले.

एक दिवशीय शिबीर, वरुड

24-08-2023

By Dh. Sraddhasree, Warud. Center - Warud

दिवंगत वामनराव सोनुले यांच्या स्मृतिपित्यर्थ थडीपवनी या गावी एक दिवसीय शिबिराचे नियोजन करण्यात आले होते.

शिबिराची सुरुवात त्रीसरण,पंचशील व बुद्ध पूजेनी आदर्शाच्या पूजेनी करण्यात आली. पूजेचे नेतृत्व धम्ममित्र पद्माताई अधव, वैशाली अधव, निर्मला लांडगे यांनी केले. आनापानसती या ध्यानाचे नेतृत्व धम्मचारिणी श्रद्धाश्री यांनी केले. धम्मचारी तेजोमुनी चा परिचय धम्मचारिणी मैत्रीतारा यांनी करून दिला.धम्मचारी तेजोमुनी यांनी मृत्यू या विषयावर सुंदर प्रवचन दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  धम्मचारींनी अचलसिरीनी केले. दुपारच्या सत्रामध्ये प्रश्न उत्तराचा तास घेण्यात आला. त्रिरत्न वंदना पूजेचे नेतृत्व व मंत्र पठण धम्मचारी कुशल बोधी यांनी केले. या कार्यक्रमाला धम्मचारिणी दीपरत्ना उपस्थित होत्या. पद्माताई अधव व सिद्धार्थ सोनुले यांनी त्यांच्या बाबा बद्दल मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन पद्माताई अधव  यांनी केले. कार्यक्रमाला आजूबाजूच्या गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

धम्म वर्ग वरुड.

21-08-2023

By Dh. Sraddhasree, Warud Center - Warud

वरुड केंद्रातर्फे,सावंगी येथे धम्म चर्चासत्र घेण्यात आले त्यामध्ये मार्गदर्शन करताना धम्मचारी तेजोमुनी धम्म मित्र राहुल धम्ममित्र गोंडाने व परिसरातील धम्म बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साप्ताहिक वर्ग, वरुड

21-08-2023

By Dh. Sraddhasree, Warud Center - Warud

वरुड केंद्रातर्फे साप्ताहिक धम्म वर्ग सावंगी चालविल्या जातो. साप्ताहिक धम्म वर्गामध्ये धम्म या विषयावर प्रवचन देतांना  धम्मचारी तेजोमणी.. राहुल बागडे,तुकारामजी गोंडाने दीपाताई धोंगडे मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

Death of Dhammachari Virapriya

18-08-2023

By Karmavajra Center - Order

प्रिय संघ भाई और बहनों

हमे बताते हुए खेद हो रहा है, धम्मचारी विरप्रिय (अमरावती) इनका आज सुबह करीबन ७.०० बजे निधन हो गया है | काफी दिनों से वे बीमार चल रहे थे | उनका अंतिम संस्कार दोपहर ३.०० बजे उनके घर से किया जायेगा |

धम्मचारी  विरप्रिय इनकी दीक्षा २५ मई २०१४ को हुयी थी, अमोघसिद्धी उनके आचार्य तथा चंद्रशील उनके उपाध्याय रहे | एक शिक्षक रूप में कई साल कम कर शिक्षणअधिकारी कर निवृत होने के बाद उन्होंने पूर्ण रूप से संघ कार्य के लिए  योगदान दिया |

कृपया उनके लिए मैत्री करे तथा अपने ध्यान में उन्हें याद कीजिये |

मैत्रीजाल 

वरुड, मित्र दिवस

17-08-2023

By Dh. Sraddhasree, Warud Center - Warud

दिनांक १६/८/२०२३ ला करुणा बुद्ध विहार वरुड येथे मित्र डे आयोजित करण्यात आला होता.यावेळी धर्मदर्शी यांनी ध्यान व भवचक्र या विषयावर सोप्या भाषेत समजून सांगितले. सर्व मित्रांनी सहभोजनचा आनंद घेतला.

केंद्रातील धम्मचारी बोधिनंदन, कुशलबोधी, धम्मचरिणी श्रद्धाश्री, दीपरत्ना, अचलसीरी व मैत्रीतारा यावेळी हजर होत्या 

मित्रांसाठी कार्यशाळा, वरुड

17-07-2023

By Dh. Sraddhasree, Warud. Center - Warud

दिनांक ९/७/२०२३ला वरुड केंद्रातर्फे, वरुड मोर्शी येथील धम्ममित्र महिला -पुरुष यांच्या साठी कार्यशाळा चे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळेचे नेतृत्व धम्मचारिणी धम्मचारिणी सुरुची  अमरावती यांनी केले. मित्रता या विषयावर खुप सुंदर, उदाहरण देऊन प्रवचन दिले. धम्मचारिणी सुजया अमरावती यांनी मैत्री भावना ध्यानाचे नेतृत्व केले.

धम्ममित्र ज्योती गाडगे यांनी कार्यशाळेचे संचालन केले. पुजेचे नेतृत्व धम्ममित्र ललिता ताई गजभिये , पुष्पा वावरे रंजना पाटील यांनी केले. परिचय पुष्पा ताई वावरे यांनी केले. पुण्यानुमोदन धम्ममित्र रंजना हरले यांनी केले.

१०वी गुणवंत विध्यार्थी सत्कार, वरुड

08-06-2023

By Dh Sraddhasree, Warud Center - Warud

सम्यक  बुद्ध विहार येथे 10वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला प्रमुख पाहुणे म्हणून ऍडव्होकेट प्रियंका ताई धुताले, ऍडव्हो केट अर्चना ताई कांबळे, इंजिनीयर अस्मिताताई लांडगे व मायाताई रामटेके सर्वांनी विद्यार्थ्यांस मार्गदर्शन केले. प्रास्ताविक धम्मचारीणी मैत्री तारा यांनी केले सूत्रसंचालन धम्म मित्र राहुल यांनी केले.पूजेचे नेतृत्व धम्ममित्र पद्माताई अधव, धम्ममित्र कल्पनाताई गाडगे, वैशालीताई अधव यांनी केले. धम्ममित्र रामटेके यांनी गीत सादर केले.पाहुण्यांचा परिचय धम्म मित्र निर्मलाताई लांडगे यांनी दिला. कार्यक्रमाचे नियोजन धम्मचारी तेजोमुनी यांनी केले.आभारधम्ममित्र स्मृती अधव यांनी केले. कार्यक्रमामध्ये  परिसरातील सर्व धम्म बंधू आणि भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमासाठी सकारात्मक विचारातून मदतीचे  हात  समोर आले,त्यापैकी  निर्मलाताई लांडगे ,कल्पनाताई गाडगे,संगिताताई लांडगे यांनी गुणवंत मुलासाठी बुक पेन  या भेटवस्तू आणल्या. राहुल बागडेनी सर्वांसाठी  नास्ता ची व्यवस्था केली .कौशल्या ताई अधव यांनी पेढे दिले. बुद्धरूप ठेवण्याकारिता टेबल गाडगे भाऊंनी दान दिला. सर्वांचे खुप खूप पुण्यानुमोदन.

भीक्कूनी संघाची भेट, वरुड

01-06-2023

By Dh. Sraddhasree, Warud Center - Warud

दिनांक १ जून करुणा बुद्ध विहार येथे हरियाणा येथील भीक्कूनी अय्याजी धम्मदिना यांनी नुकत्याच २३तारखेला झालेल्या १७ श्रामनेर भीक्कूनी सोबत सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते आदर्शाची पूजा पुष्प,मेणबत्ती अगरबत्ती ने करण्यात आली.उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले. धम्मचारीणी अचलसीरी यांच्या हस्ते त्यांचे पुष्पाणि स्वागत करण्यात आले. धम्मसहायक लुबा यावलकर व शशी यावलकर, नीलकंठराव यावलकर पोहे आणि लाडूचा नाष्टा आणला होता. सर्व भिक्षुनींनी चारीका करीत नागसेन विहारात गेल्या तिथे त्यांनी भोजन घेतले व नंतर अय्याजी नीं धम्मदेसना दिली.

समारोपीय कार्यक्रम, वरुड

23-05-2023

By Dh. Sraddhasree, Warud Center - Warud

त्रिरत्न बौध्द महासंघ वरुड तर्फे आयोजित बुद्ध महोत्सव ची सांगता दिनांक ९मे ला वर्षभर जे दानदाते दान देऊन संघाच्या कार्यास मदत करून प्रोत्साहित करतात अश्यांचा स्मृती चिन्ह व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी धम्मचारी विशुद्ध अमरावती यांनी संघाच्या एकतेसाठी वाचेच्या शिलाला किती महत्व आहे यावर प्रकाश टाकला व एक एक व्यक्ती जुळवणे व तो टिकून ठेवणे फार आवश्यक आहे यावर भर दिला. धम्मपीठावर धम्मचारी तेजोमुनी, इंजिनीयर सारंग गजभिये साहेब, चौधरी सर, डॉक्टर निखिल पवार, नगरसेवक मुन्नाभाऊ तिवारी उपस्थित होते.विशेष म्हणजे धम्ममित्र चंद्रशेखर अढाऊ सर यांचा मुलगा सक्षम अढाऊ याने आपला पहिला पगार करुणा बुद्ध विहार ला दान दिला त्याच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मचारिणी श्रद्धाश्री यांनी तर आभार मैत्रीतारा यांनी केले.  धम्मचारी विशुद्ध यांचा परिचय धम्ममित्र गजभिये यांनी करून दिला. पाली पूजेचे नेतृत्व धम्ममित्र राहुल बागडे व अरुण ब्राह्मणे यांनी केले.धम्ममित्र संजय चक्रपाणी व त्यांच्या टीम ने आकर्षक पुजास्थान सजविले. नगरसेवक मुन्ना तिवारी यांच्या प्रयत्ताने यावेळी बुद्ध जयंती निमित्त विहाराला टाइल्स लावून मिळाल्या त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.धम्म सहायक व आदर्श शिक्षिका चहांदे मॅडम व इंजि. सारंग गजभिये यांनी भोजन दान दिले.कार्यक्रम च्या यशस्वी ते करीता सर्व धम्ममित्र धम्मचारी यांनी सहकार्य केले.

art exhibition by Gughyachakshu

16-05-2023

By Karmavajra Center - Order

प्रिय भाई और बहनों

नमो बुद्धाय जयभीम

शायद आप जानते होंगे धम्मचारी गुह्यचक्षु यह एक बेहतरीन कलाकार है, जो सद्दम शिविर केंद्र भाजे में रहते है |

आप सभी को बताते हुए ख़ुशी हो रही है, धम्मचारी गुह्यचक्षु इनका कला प्रदर्शन ( art exhibition) मुम्बई में जहाँगीर आर्ट गैलरी में हो रहा है, जिसका आज उद्घाटन हुआ है | १६ से २२ मई तक होने वाले इस प्रदर्शनी के लिए आप सभी आमंत्रित है |

या निचे दिए गए लिंक पर आप उनको शुभेच्छा दे सकते है |

मैत्री से 

बुद्ध भीम गीत वरुड

16-05-2023

By Dh. Sraddhasree, Warud. Center - Warud

त्रिरत्न बौध्द महासंघ वरुड केंद्रातर्फे करुणा बुद्ध विहार येथे ५ मे ते ९मे या दरम्यान पाच दिवशीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दिनांक ८मे ला आश्वाघोष वरुड तर्फे बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रम ला प्रमुख पाहुणे म्हणून धम्मचारिणी अचलसीरी, डॉक्टर गजभिये दंत चिकिस्तक, संजय शेंडे अमरावती लाभले होते. सर्वांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्यात.

धम्ममित्र नंदिनी पाटील, ताकसाडे काकू,दर्शना बागडे,रामटेके विनोद बागडे, गिरीधर मानेराव सर सात्विक चौधरी व सृजन बागडे बालकलाकार,ख्यातनाम गायक अरुणजी सहारे यांनी गीत सादर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कवी, गझलकार विनोदभाऊ बागडे यांनी उत्कृष्ट रित्या पार पाडले.सुरुवातीला सूत्रसंचालन राहुल बागडे यांनी केले.आदरशाची पूजा प्रमुख पाहुण्यांकडून करून पाली पूजेनी झाली. पाली पूजा धम्मचारिणी श्रद्धाश्री व धम्ममित्र पदमाताई अधव तर आभार धम्मचारिणी श्रद्धाश्री यांनी केले कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण नुकतेच नॉर्थ आफ्रिका या देशात घराणेशाही शास्त्रीय संगीतात भारताचे प्रतिनिधीत्व करणारे व ज्यांच्याकडून ही कला सम्पादन केली असे गुरु प्रसिद्ध संतूर वादक पंडीत शिवकुमार शर्मा व बुद्ध रत्न लिखितकर असे आश्वघोष अरुण सहारे यांनी राग रागेश्वरी हा राग सादर केला.यावेळी त्यांनी संगीत हे उच्च कोटीचे ध्यान आहे असे विचार व्यक्त करून प्रेक्षकांना मंत्र मुग्ध केले.

बुद्ध महोत्सव , वरुड

10-05-2023

By Dh. Sraddhasree, Warud Center-Triratna

नमो बुद्धाय जय भीम.

त्रिरत्न बौद्ध महासंघ वरूड तर्फे दिनांक ५/५/२०२३ते दिनांक ९/५/२०२३ बुद्ध महो त्सव चे आयोजन करण्यात आले . बुद्ध जयंती निमित्त सकाळी ७:००वाजता ध्यान घेण्यात आले.धम्म ध्वजारोहन माननीय ठाणेदार साहेब प्रदीप चौगावकर ह्यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात आदर्श च्या पूजेनी करण्यात आली.धम्ममित्र निर्मला लांडगे,वैशाली अधव, रेखा बागडे यांनी पाली पूजेचे नेतृत्व केले. याप्रसंगी त्रिसरण पंचशील,विधायक पंचशील, बुद्ध पूजा, त्रिरत्न वंदना, महामंगल सूत्त व अर्पण विधी घेण्यात आली. विशेष याप्रसंगी माननीय ठाणेदार साहेब पूजेला पूर्ण वेळ उपस्थित होते. जिथे आचार, विचार व उच्चाराची शुद्धी होते अश्या ठिकाणी वेळ दयायला नक्कीच आवडेल, तसेच आज आयुष्यात मला खूप शांत व प्रसन्न वाटले असे विचार त्यांनी व्यक्त केले.

 बुद्धमहोत्सव व बालसंस्कार शिबीराचे उदघाटन  धम्मचारी विवेकरत्न नागपूर यांनच्या हस्ते झाले.बुद्ध जयंती  म्हणजे मानवमुक्ती दिन असून, मुलानं वर संस्कार करण्याकारिता अश्या बालसंस्कार शिबिराची किती गरज आहे याबद्दल प्रकाश त्यांनी टाकला. आजची मुले मोबाईलच्या आधीन गेले असून आपल्यातील सुप्त गुणांना वाव मिळत नाही असे उदगार त्यांनी व्यक्त केले व वरुड केंद्राने खूप चांगला हा उपक्रम राबीला आहे त्याबद्दल केंद्राचे आभार व्यक्त केले.

याप्रसगी दर्शना बागडे यांनी उपस्थितांना नास्ता व भटकर साहेबांनी खीर दान दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मचारिनी श्रद्धाश्री प्रास्ताविक धम्मचारी तेजोमुनी,परिचय धम्मचारी बोधिनंदन, तर आभार धम्मचारिणी अचलसीरी यांनी केले.

सायंकाळी ६:३०वाजता थायलंड वरून दान मिळालेल्या बुद्ध रूपाची भव्य मिरवणूक व शांतता रॅली काढण्यात आली.बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पासून तर मुख्य रोड, केदार चौक, पांढुर्णा चौक, मुलताई रोड, नागसेन विहार व करुणा बुद्ध विहार येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.मैत्री गीताने रॅली ची समाप्ती करण्यात आली.


बुद्ध जयंती, वरुड

10-05-2023

By Dh. Sraddhasree, Warud Center-Triratna

नमो बुद्धाय जय भीम.

त्रिरत्न बौद्ध महासंघ वरूड तर्फे दिनांक ५/५/२०२३ते दिनांक ९/५/२०२३ बुद्ध महो त्सव चे आयोजन करण्यात आले . बुद्ध जयंती निमित्त सकाळी ७:००वाजता ध्यान घेण्यात आले.धम्म ध्वजारोहन माननीय ठाणेदार साहेब प्रदीप चौगावकर ह्यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात आदर्श च्या पूजेनी करण्यात आली.धम्ममित्र निर्मला लांडगे,वैशाली अधव, रेखा बागडे यांनी पाली पूजेचे नेतृत्व केले. याप्रसंगी त्रिसरण पंचशील,विधायक पंचशील, बुद्ध पूजा, त्रिरत्न वंदना, महामंगल सूत्त व अर्पण विधी घेण्यात आली. विशेष याप्रसंगी माननीय ठाणेदार साहेब पूजेला पूर्ण वेळ उपस्थित होते. जिथे आचार, विचार व उच्चाराची शुद्धी होते अश्या ठिकाणी वेळ दयायला नक्कीच आवडेल, तसेच आज आयुष्यात मला खूप शांत व प्रसन्न वाटले असे विचार त्यांनी व्यक्त केले.

 बुद्धमहोत्सव व बालसंस्कार शिबीराचे उदघाटन  धम्मचारी विवेकरत्न नागपूर यांनच्या हस्ते झाले.बुद्ध जयंती  म्हणजे मानवमुक्ती दिन असून, मुलानं वर संस्कार करण्याकारिता अश्या बालसंस्कार शिबिराची किती गरज आहे याबद्दल प्रकाश त्यांनी टाकला. आजची मुले मोबाईलच्या आधीन गेले असून आपल्यातील सुप्त गुणांना वाव मिळत नाही असे उदगार त्यांनी व्यक्त केले व वरुड केंद्राने खूप चांगला हा उपक्रम राबीला आहे त्याबद्दल केंद्राचे आभार व्यक्त केले.

याप्रसगी दर्शना बागडे यांनी उपस्थितांना नास्ता व भटकर साहेबांनी खीर दान दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मचारिनी श्रद्धाश्री प्रास्ताविक धम्मचारी तेजोमुनी,परिचय धम्मचारी बोधिनंदन, तर आभार धम्मचारिणी अचलसीरी यांनी केले.

सायंकाळी ६:३०वाजता थायलंड वरून दान मिळालेल्या बुद्ध रूपाची भव्य मिरवणूक व शांतता रॅली काढण्यात आली.बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पासून तर मुख्य रोड, केदार चौक, पांढुर्णा चौक, मुलताई रोड, नागसेन विहार व करुणा बुद्ध विहार येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.मैत्री गीताने रॅली ची समाप्ती करण्यात आली.


Death of Dhammacharini Mettika

05-05-2023

By Karmavajra Center - Order

प्रिय संघ भाई और बहनों

हमें बताते हुए दुःख हो रहा है, धम्मचारिणी मेत्तिका (दापोडी पुणे) का आज दोपहर निधन हो गया है, वे ७३ साल की थी | कुछ दिनों से उनकी तबीयत ठीक नहीं थी और उन्हें अस्पताल में भर्ती कराया गया था |

धम्मचारिणी मेत्तिका शुरुवात के दिनों में संघ के संपर्क में आयी थी तथा उन्होंने जीवक प्रकल्प में अपनी पूर्णकालीन सेवाएं दी |

उनकी धम्मचारिणी दीक्षा ११ जनवरी २००९ सद्धम्म प्रदीप शिविर केंद्र भाजे में हुयी, धम्मचारिणी करुणामया उनकी आचार्य तथा उपाध्याय थी |

कृपया उनके लिए मेंत्ता कीजिये तथा ध्यान में उनको याद कीजिये |

मैत्री से 

बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त पूर्व संध्येला प्रवचन

17-04-2023

By Aakash Meshram Center-Triratna

नमो बुद्धाय

जय भीम

त्रिरत्न बौद्ध महासंघ महेंद्रनगर नागपुर

दि. 13 अप्रैल 2023

बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त पूर्व संध्येला प्रवचन

धम्ममित्र डॉ. चंदू मैस्के यांनी खुप छान मार्गदर्शन केले.

कार्यक्रम चे क्षणचित्रे 

https://photos.app.goo.gl/GhCrPTrHCmpAKXcp8

प्रवचन

https://youtu.be/K3NQfkaD8ds


धन्यवाद

बाबासाहेब जयंती, वरुड

17-04-2023

By Dh. Sraddhasree, Warud Center - Warud

नामोबुध्दाय, जयभीम.

त्रिरत्न बौध्द महासंघ वरुड केंद्रा अंतर्गत ठीक ठिकाणी  बोधिसत्व बाबासाहेब जयंती उत्सव साजरा करण्यात आला.

करुणा बुद्ध विहार वरुडला राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 11 ला प्रज्ञा सार्वजनिक वाचनालय येथे कार्यक्रम घेण्यात आला.

१२तारखेला बाबासाहेबांना अभिवादन म्हणून काही सकाळी ७ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत बारा तास अभ्यास हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी वाचनातल्या मुलांनी या सहभाग घेतला. दिनांक

13 तारखेला जयंतीनिमित्त   बाबासाहेबांच्या विविध पैलूवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यात राजकीय सामाजिक शैक्षणिक व धार्मिक या विषयावर पुढील मान्यवरांनी  प्राध्यापक गंगाधर दवंडे सर , प्राध्यापक सोमकुवर सर. आयुष्यमती सुनीताताई शेंडे तसेच धम्मचारी तेजोमुनी यांनी उत्कृष्ट विषयाची मांडणी केली.

१४एप्रिलला धम्मचारी धर्मदर्शी नागपूर यांनी बाबासाहेबांना बोधिसत्व का म्हणतात या विषयावर  उत्कृष्ट प्रवचन दिले सर्व कार्यक्रमाचा अनेकांनी  लाभ घेतला यशस्वीरित्या पार पाडण्यात आला. धम्मचारी धर्मदर्शी यांच्यासोबत गौरखेडे साहेब व मेश्राम साहेब उपस्थित होते. याप्रसंगी  प्राध्यापक सोमकुवर सर व झटाले ताई यांनी नाष्टा दिला.

इंजिनियर डबरासे काकाजी,प्राध्यापक सोमकुवर सर यांनी प्रत्येकी ५००० रुपये दान दिले. सर्व दानदात्यांचे या कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्यांचे खूप खूप पुण्यानुमोदन

एक दिवशिय धम्म परीचय शिबीर संपन

31-01-2023

By Oshin Bhagat Center-Triratna

प्रिय बंधु आणि भगिनींनो,

मैत्रीपूर्ण नमो बुद्धाय जयभीम,

त्रिरत्न बौद्ध महासंघ बारामती

रविवार दि. 29 जानेवारी 2023 रोजी

TBM बारामती येथे एक दिवशिय धम्म परीचय शिबीर संपन झाले शिबीरात ६० पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला.

मैत्री पूर्ण

नविन धम्मवर्गाचा उद्घघाटन सोहळा

30-01-2023

By Oshin Bhagat Center-Triratna

त्रिरत्न बौद्ध महासंघ भिमनगर भावसिंगपुरा औरंगाबाद यांच्या विद्यमाने स्वयंदीप बुद्ध विहार,फिरदोष गार्डन, पडेगाव येथे धम्मवर्गाचे उद्घघाटनआज रोजी धम्मचारी म‌दुरत्न यांच्या हस्ते झाले , याप्रसंगी ध.ललीतसीध्दी यांनी धम्माचे महत्त्व विषद केले ,तर  धम्मचारीनी जयादीपा यांनी सुत्र संचालन केले, याप्रसंगी ध.शांतीवीर,ध.संघवंस,व.विसुध्दसीध्दी,ध.ललीतमुनी, धम्मचारी नी शांतीचित्ता, शांतीकिर्ती, व मोठ्या संख्येने धम्ममित्र, महीला, पुरुष,धम्म सहायक उपस्थि