Wardha
त्रिरत्न बौद्ध महासंघ, वर्धा - एक परिचय
त्रिरत्न बौद्ध महासंघ ही एक जागतिक बौद्ध चळवळ आहे, जिची स्थापना परमपूज्य उर्गेन संघरक्षित (Urgyen Sangharakshita) यांनी केली. आधुनिक जगामध्ये भगवान बुद्धांची शिकवण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रभावीपणे रुजवण्याचे कार्य हा संघ करत आहे. वर्धा येथील केंद्र याच जागतिक मैत्रीचा आणि धम्मक्रांतीचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.या केंद्राचा मुख्य उद्देश सर्वसामान्यांना बौद्ध धम्म आणि ध्यानसाधना शिकण्यास मदत करणे आणि एक आदर्श बौद्ध समाज (संघ) निर्माण करणे हा आहे
मन शांत, एकाग्र आणि मैत्रीपूर्ण बनवण्यासाठी येथे आनापानसती. श्वासावर लक्ष केंद्रित करून मनाची एकाग्रता वाढवणे आणि मैत्री भावना स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल द्वेष काढून टाकून प्रेमाची व मैत्रीची भावना विकसित करणे प्रामुख्याने दोन प्रकारच्या ध्यान पद्धती शिकवल्या जातात
२. बौद्ध धम्म अभ्यास:
भगवान बुद्धांचे मूळ विचार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली धम्मक्रांती समजून घेण्यासाठी येथे नियमित वर्ग आणि प्रवचने आयोजित केली जातात. केवळ पूजापाठ न करता, समाजातील तरुणांसाठी व्यक्तिमत्त्व विकास, शिक्षण आणि आरोग्याविषयी मार्गदर्शनही या संघामार्फत केले जाते.

Verify Your Mobile Number