News

Centers

कार्तिक पौर्णिमा उत्सव

28-11-2023

By Dh. Sraddhasree, Warud Center - Warud

त्रीरत्न बौद्ध महासंघ वरुड च्या वतीने दिनांक २६ला मित्रडे व पुर्ननिश्चय  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पाली पुजेचे नेतृत्व धम्म मित्र कल्पना गाडगे व वैशाली अधव यांनी केले.आनापानसती ह्या ध्यानाचे नेतृत्व धम्मचारी बोधिनंदन यांनी केले तसेच धम्मचारी तेजोमुनी यांचा परिचय करुन दिला.धुताले भाऊ यांनी गीत सादर केले.

धम्मचारी तेजोमुनी यांनी शरणगमण या विषयावर प्रवचन दिले.शरणगमणाच्या पातळ्या सविस्तर सांगितल्या.

दुपारच्या सत्रात धम्मचर्चा, मनोगत करण्यात आले.

मित्रडे चे संचालन धम्ममित्र निर्मला लांडगे यांनी तर आभार धम्ममित्र अरुण ब्राम्हणे यांनी केले.

१०मी.जस्ट सीटिंग घेण्यात आले.जस्ट सीटिंगचे नेतृत्व धम्मचारिणी अचलसीरी यांनी केले. सप्तांग पूजेचे नेतृत्व धम्मचारिणी श्रद्धाश्री यांनी केले.

पहिल्या अंगानंतर मंत्र पठणात प्रत्येकानी पुष्प, मेणबत्ती, अगरबत्ती प्रज्वलीत करून पुनर्निचय केला.धम्मचारी कुशलबोधी यांनी मंत्र पठण केले. धम्मपालन गाथेने सांगता करण्यात आली.

हिवाळी धम्म शिबीर वरुड -मोर्शी

18-11-2023

By Dh. Sraddhasree, Warud Center - Warud

त्रिरत्न बौद्ध महासंघ वरूड -मोर्शी केंद्रा द्वारा दिनांक ११नोव्हेंबर ते १६नोव्हेंबर दरम्यान हिवाळी निवासी शिबिराचे आयोजन मढघे मंगल कार्यालय मोर्शी येथे करण्यात आले होते.

शिबिराचा विषय होता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व देशपरिवर्तन. या शिबिराचे नेतृत्व धम्मचारी नागभद्र अमरावती यांनी केले.

धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानव सेवा आहे. या बोधिसत्व बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराला २५० शिबिरार्थी  उपस्थित होते.                   

दिनांक ११ ला सायंकाळी आदरश्याच्या पूजेनी शिबिराची सुरुवात करण्यात आली .त्रिसरण पंचशील विधायकशील व बुद्ध पूजा धम्मचारी तेजोमुनी यांनी घेतली. सर्व धम्मचारी व धम्मचारीणीचा परिचय शिबीरार्थ्यांना करून देण्यात आला. शिबिराची प्रस्तावना धम्मचारी नागभद्र यांनी  केली. शिबिर यशस्वीतेसाठी काही सूचना व शिबीराचे वेळापत्रक सांगून शेवटी समर्पण विधी व धम्मपालन गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

रोज सकाळी ६:३०वाजता व दुपारी ४:३०वाजता आनापानसती मैत्री विकास  याबद्दल माहिती व ध्यान साधनेचा सराव धम्मचारी नागभद्र हे करून घेत होते.चलितध्यान सुद्धा घेण्यात येत होते.

रोज सकाळी पाली पुजेचे नेतृत्व धम्मचारिणी मैत्रीतारा करीत होत्या.

सकाळी रोज १०:००ते १:००वाजता धम्मश्रवण व धम्मचर्चा होत होत्या.

स्वतःच्या व देशाच्या परिवर्तनासाठी विदया, चेतवा व संघटित होणे किती आवश्यक आहे असे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करीन तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही याचे महत्व पटवून दिले.जातीविरहित समाज निर्माण करणे हे बाबासाहेबांचे स्वप्न होते कारण जाती ह्या देशासाठी घातक असून त्या नष्ट केल्याशिवाय स्वातंत्र्य समता बंधुत्व येऊ शकत नाही.रोजच्या जीवनामध्ये नीतिमत्ता किती आवश्यक आहे. चारित्र्य नसेल तर देशाचा उद्धार होऊ शकणार नाही. धार्मिक व्हायला हवे. पंचशीलाच्या व दशशिलाच्या आचरणाशिवाय माणूस सुखी होऊ शकणार नाही.

माणसाला धम्माची - सदधम्माची आवश्यकता का? कारण केवळ बौद्ध धम्मानेच स्वतःचा व जगाचा उद्धार होऊ शकतो. बौद्ध धम्म हाच केवळ बहुजनाच्या विकासाचा,कल्याणाचा धम्म आहे असे त्यांनी आपल्या धम्म श्रवणात सांगितले.

उत्कृष्ट संघटक, कवी,गझलकार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गाढे अभ्यासक व बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन केलेले धम्मकार्य त्यासाठी लागणारी शक्ती अशा अनेक सद्गुणांनी युक्त असलेले धम्मचारी नागभद्र यांचा परिचय रोजच धम्मचारी प्रसन्नदर्शी हे करून देत होते.रोज सायंकाळी ८:००वाजता धम्मश्रवण चा विषय होता बोधिसत्व प्रतिज्ञा. आपण प्रतिज्ञा करूया जीवसृष्टी आहे असीम ती भवसागर पार नेण्याची  :-धम्मचारी नागभद्रआपण प्रतिज्ञा करूया आपणात दोष असंख्य ते नष्टकरण्याची :-धम्मचारिणी मैत्रीतारा.आपण प्रतिज्ञा करूया आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची: -धम्मचारी तेजोमुनी.आपण प्रतिज्ञा करूया भगवान बुद्धाचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याचा:-धम्मचारी प्रसन्नदर्शी यांनी धम्मश्रवण केले. सर्वांचा परिचय धम्मचारी कुशलबोधी यांनी करून दिला.रोज रात्री ९:०० वाजता त्रिसरण पंचशील विधायकशील २२ प्रतिज्ञा अर्पणविधी व धम्मपालन गाथा घेण्यात आली.धम्मचारिणी अचलसीरी यांनी रोज ग्रंथाचे पठण केले तसेच धम्मचारी बोधिनंदन हे संवाद कौशल्याचा सराव करून घेत होते.धम्मचरिणी श्रद्धाश्री यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन केले.समारोपीय कार्यक्रमाचे संचालन धम्ममित्र वैशाली खोब्रागडे धम्ममित्र ललिता गाडगे यांनी आभार केले. यावेळी शिबिरा करिता व बांधकामा करिता मुक्तहस्ते दान दिले त्यांचा सत्कार करण्यात आला. धम्मचारी नागभद्र यांचे समारोपिय  प्रवचन झाले शिबिराचे आकर्षण राहले पूजास्थान, ते सजवण्याची जबाबदारी धम्ममित्र संजय चक्रपाणी व त्यांची टिम यांनी खूप सुंदर रित्या पार पाडली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी वरुड -मोर्शी येथील सर्व धम्मचारी प्रसन्नदर्शी, तेजोमुनी, बोधी नंदन, कुशलबोधी,धम्मचारिणी श्रद्धाश्री, अचलसिरी, मैत्रीतारा तसेच सर्व धम्ममित्र बंधू भगिनींनी अथक परिश्रम घेतले. सर्वांच्या सहकार्यामुळे हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले. सर्व शिबिरार्थ्यांनी शिबिराचा उत्तमरीत्या आनंद घेतला व संकल्प केला बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीसाठी आम्ही सहकार्य करू.

मोर्शी मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी शिबिराला भेट दिली बाबासाहेबांचे कार्य पुढे नेण्यासाठी अशा शिबिरांची आवश्यकता आहे असे त्यांनी व्यक्त केले.

हिवाळी शिबीर, वरुड-मोर्शी.

12-11-2023

By Dh. Sraddhasree, Warud Center - Warud

वरुड मोर्शी केंद्रातर्फे दिनांक 11 नोव्हेंबर ते  16 नोव्हेंबर पर्यंत घेण्यात येत असलेल्या हिवाळी शिबिराची सुरुवात झालेली आहे. या शिबिराला  225ते 250 शिबिरार्थी सहभागी झालेले आहे.

शिबिराचा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार व देश परिवर्तन. शिबिराचे नेतृत्वकार धम्मचारी नागभद्र  अमरावती.                        दिनांक 11 ला सायंकाळी आदर्शाची पूजेनी झाली.त्रिसरण पंचशील विधायकशील व बुद्ध पूजा धम्मचारी तेजोमुनी यांनी घेतली. सर्व धम्म चारी व धम्मचारीणीचा परिचय शिवीरार्थ्यांना करून देण्यात आला. शिबिराची प्रस्तावना धम्मचारी नागभद्र यांनी  केली शिबिर यशस्वीतेसाठी काही सूचना व शिवीराचे वेळापत्रक सांगून शेवटी धम्मपालन गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

धम्मचक्र अनुप्रवतनीय दिवस, वरुड

25-10-2023

By Dh Sraddhasree, Warud Center - Warud

त्रीरत्न बौद्ध महासंघ वरुड केंद्रातर्फे करुणा बौद्ध विहार वरुड येथे अशोक विजयादशमी व धम्मचक्र अनुप्रवर्तनीय दिवस साजरा करण्यात आला.

सकाळी ८:३० वाजता प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेलेआयुष्यमान संजय शंभरकर यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले. पाहुण्यांच्या हस्ते आदर्शाची पूजा करण्यात आली. धम्ममित्र अर्चना गजभिये, मृणाल बांबोडे, ज्योती गाडगे यांनी पाली पूजेचे नेतृत्व केले. जस्ट सीटिंग चे नेतृत्व धम्मचारीणी अचलसीरी यांनी केले. ऋतिक खंडारे व शोभाताई खणखणे यांनी सुंदर गीत गाऊन मंत्रमुग्ध केले.

धम्मचारी बोधिनंदन यांनी बाबासाहेबांनी १९३५ साली धर्मांतराची घोषणा करून १४ ऑक्टोबर १९५६साली धर्मांतर करून बौद्ध धम्माची दीक्षा दिली. प्रत्येक बौद्धांनी आचरणशील व्यक्ती बनाव असा संदेश त्यांनी या प्रवचनातून दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्म मित्र अरुण ब्राह्मणे सर यांनी केले. आभार प्रदर्शन  धम्म मित्र कपिल  कांबळे यांनी केले. कार्यक्रमाला जवळपास 30 पहिला आणि पुरुष  उपस्थित होते.

धम्मचारिणीची कार्यशाळा, वरुड

26-09-2023

By Dh. Sraddhasree, Warud Center-Triratna

आज दिनांक २४/९/२०२३ला करुणा बुद्ध विहार वरुड येथे अमरावती विभागीय महिला ऑर्डर डे.                               

नेतृत्व :-धम्मचारिणी प्रज्ञासखी यांनी  सत्काय दृष्टी, विचिकइच्छा, शिलव्रत परामर्श ही तीन बंधने तोडून मनुष्य श्रोतापन्न  अवस्थेकडे कशी वाटचाल करू शकते यावर रोजच्या जीवनातील उदाहरण देऊन स्पष्ट केले.

सत्काय दृष्टी पक्का दृष्ठिकोन स्वतः च्या स्व ला फार चिकटून असतो, माझ माझ करतो. भौतिक गोष्टीत आसक्त असतो स्वतःच्या गावाबद्दल, नावाबद्दल, विहार, केंद्र, प्रांत अश्या अनेक बाबीला चिकटून राहतो. एखादया गोष्टीलाच पक्क समजतो.सूर्य पूर्वेकडून उगवतो व पश्चिमेकडे मावळतो परंतु सूर्य स्थिर आहे पुर्थ्वी फिरत आहे.

विचिकइच्छा :-निर्णय न घेण्याची क्षमता, विचलितता. कुशंका माणसाला पुढे जाऊ देत नाही. गध्याच उदाहरण देऊन स्पष्ट केले. एक गाढवं असते त्याच्या दोन्ही बाजुला गाजर ठेवतात. एक मनुष्य म्हणतो ह्या बाजूचे गाजर खाईल तर दुसरा म्हणतो या बाजूचे. गाढवं मात्र गोंधळलेला आहे व तो एकाच जागी उभा राहतो. असच आपल्या बाबत पण होत.

शिलवर्त परामर्श मध्ये कर्मकांड, रूढी परंपरा याच गोष्टी सत्य समजून तसेच वागत राहतो. त्यामागचा हेतू स्पष्ट असेल तर हे तिन्ही बंधने सैल करण्यासाठी मदत होईल व श्रोतापन्न अवस्थेकडे वाटचाल होऊ शकेल.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मचारिणी मैत्रीतारा यांनी केले. पाली पुजेचे नेतृत्व श्रद्धाश्री, दीपरत्ना यांनी केले. संघमेत्ता सुजया, परिचय सुरुची तर आभार अचलसीरी यांनी केले.

या कार्यक्रमाला विदर्भातील अमरावती, वर्धा, पुलगाव, हिंगणघाट,नागपूर अश्या विविध ठिकाणावरील ४०धम्मचारिणी उपस्थित होत्या.

९८वी जयंती, वरुड

30-08-2023

By Dh. Sraddhasree, Warud Center - Warud

त्रिरत्न बौद्ध महासंघ वरूड, करुणा बुद्ध विहार येथे त्रीरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक  पूज्य उर्गेन संघरक्षित यांची ९८वी जयंती साजरी करण्यात आली. दुपारी १२ते ४ मित्र महिलां करता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. धम्मचारिणी सुप्रभा (नागपूर ) यांनी प्रशिक्षणा च्या पाच पद्धती या विषया वर मार्गदर्शन केले. सोबत आलेल्या धम्मचारिणी सुगतधारिणी यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभले. सहभो जन गटचर्चा, प्रश्न उत्तरे अशा प्रकारचे पहिले सत्र राहिल.

सायंकाळच्या सत्रामध्ये आदर्शाच्या पूजेने सुरुवात झाली. धम्ममित्र रविना अधव, वैशाली अधव, निर्मला लांडगे नी पूजेचे नेतृत्व केले.

धम्मचारिणी सुप्रभा यांनी भन्तेच्या शिकवणीकीतील  पाच बाबी  शरण गमन, बोधिसत्वाचा आदर्श, कल्याणमित्रता, सांघिक सम्यक आजीविका व गंभीरपणे आचरण करणे या वर संघ कसा मजबूत आहे यावर प्रकाश टाकला.सूत्रसंचालन धम्मचारिणी अचलसीरी यांनी, परिचय  धम्मचारिणी मैत्रीतारा व पुण्यानुमोदन धम्मचारिणी श्रद्धाश्री यांनी केले. केंद्राचे धम्मचारी बोधिनंदन, कुशलबोधी व तेजोमुनी तसेच परिसरातील४३महिला व १८पुरुष उपस्थित होते.

संस्कृती ज्योती हरिदास गाडगे यांच्या जन्मदिना निमित्त मोर्शी केंद्राच्या निर्मितीसाठी ₹५०००दान देण्यात आले.

उर्गेन संघरक्षितांची जयंती, वरुड

30-08-2023

By Dh. Sraddhasree, Warud. Center-Triratna

त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक पूज्य उर्गेन संघरक्षित यांची ९८ वी जयंती त्रिरत्न बौद्ध महासंघ वरुड च्या वतीने करुणा बुद्ध विहार वरुड येथे साजरी करण्यात आली. याप्रसंगी धम्मचारींणी सुप्रभा(नागपूर )यांनी सकाळच्या सत्रामध्ये १२ ते ४ धम्म मित्र महिलांकरता प्रशिक्षणाच्या पाच पद्धती( एकाग्रता, विधायक भावना, धाम्मीक मृत्यू, धाम्मिक पूर्णजन्म , ग्रहणशीलता ) या विषयावर सुंदर असे प्रवचन दिले. सहभोजन, गटचर्चा, प्रश्नोत्तरे घेण्यात आले त्यांच्यासोबत आलेल्या धम्मचारीणी सुगत धारिणी यांची सुद्धा महिलांना मदत झाली. सायंकाळच्या सत्रामध्ये आदर्शाची पूजा व पाली पूजा घेण्यात आली. पाली पूजेचे नेतृत्व धम्म मित्र रविना अधव, निर्मला लांडगे व वैशाली अधव यांनी केले. धम्ममित्र नरेंद्र रामटेके यांनी तुम्हचे अमुचे बंधुत्वाचे नाते, भन्ते संघरक्षित..... हे गीत सादर केले. धम्मचारीणी सुप्रभा यांचा परिचय धम्मचारींनी मैत्रीतारा यांनी करून दिला. धम्मचारिणी सुप्रभा यांनी भन्तेच्या शिकवणीकीतील  शरणगमण, बोधिसत्वाचा आदर्श, कल्याणमित्रता, सांघिक सम्यक आजीविका व गंभीरपणे आचरण केल्यास श्रोतापन्न अवस्था या पाच बाबीवर संघाची निव भक्कमपणे आधारित आहे यावर सुंदर असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मचारिणी अचलसीरी यांनी केले. पुण्यानुमोदन धम्मचारींणी श्रद्धाश्री यांनी केले.या कार्यक्रमाला परिसरातील ४३महिला व १८पुरुष उपस्थित होते.धम्ममित्र ज्योती गाडगे यांनी त्यांच्या मुलीच्या संस्कृती गाडगे हिच्या वाढदिवसानिमित्त मोर्शी केंद्राच्या निर्मितीसाठी र ५००० दान दिले. 

महिला मित्र दिवस, वरुड

27-08-2023

By Dh. Sraddhasree ???? Center - Warud

दिनांक २६/८/२०२३ वरुड येथील करुणा बुद्ध विहार येथे महिला मित्र दिवस दुपारी १२:०० ते ४:१५ वाजेपर्यंत धम्मचारिणी सुप्रभा व धम्मचारिणी सुगतधारिणी यांच्या नेतृत्वात पार पडला. सुप्रभा यांनी प्रशिक्षणाच्या पाच पद्धती यावर प्रवचन दिले. सहभोजन, गटचर्चा, प्रश्नोत्तर या सर्वांचा लाभ मित्र महिलांसाठो खुप उपयुक्त ठरला, सर्वांनी खूप लाभ घेतला. यावेळी धम्मचारिणी अचलसीरी, मैत्रीतारा, श्रद्धाश्री उपस्थितत होत्या, मित्र महिला सुद्धा मोठया संघेणे उपस्थित होत्या. निर्मला लांडगे यांनी त्रिसरण पंचशील व जस्ट सीटिंग घेतले. आभार ज्योती गाडगे यांनी केले.

एक दिवशीय शिबीर, वरुड

24-08-2023

By Dh. Sraddhasree, Warud. Center - Warud

दिवंगत वामनराव सोनुले यांच्या स्मृतिपित्यर्थ थडीपवनी या गावी एक दिवसीय शिबिराचे नियोजन करण्यात आले होते.

शिबिराची सुरुवात त्रीसरण,पंचशील व बुद्ध पूजेनी आदर्शाच्या पूजेनी करण्यात आली. पूजेचे नेतृत्व धम्ममित्र पद्माताई अधव, वैशाली अधव, निर्मला लांडगे यांनी केले. आनापानसती या ध्यानाचे नेतृत्व धम्मचारिणी श्रद्धाश्री यांनी केले. धम्मचारी तेजोमुनी चा परिचय धम्मचारिणी मैत्रीतारा यांनी करून दिला.धम्मचारी तेजोमुनी यांनी मृत्यू या विषयावर सुंदर प्रवचन दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  धम्मचारींनी अचलसिरीनी केले. दुपारच्या सत्रामध्ये प्रश्न उत्तराचा तास घेण्यात आला. त्रिरत्न वंदना पूजेचे नेतृत्व व मंत्र पठण धम्मचारी कुशल बोधी यांनी केले. या कार्यक्रमाला धम्मचारिणी दीपरत्ना उपस्थित होत्या. पद्माताई अधव व सिद्धार्थ सोनुले यांनी त्यांच्या बाबा बद्दल मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन पद्माताई अधव  यांनी केले. कार्यक्रमाला आजूबाजूच्या गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

धम्म वर्ग वरुड.

21-08-2023

By Dh. Sraddhasree, Warud Center - Warud

वरुड केंद्रातर्फे,सावंगी येथे धम्म चर्चासत्र घेण्यात आले त्यामध्ये मार्गदर्शन करताना धम्मचारी तेजोमुनी धम्म मित्र राहुल धम्ममित्र गोंडाने व परिसरातील धम्म बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साप्ताहिक वर्ग, वरुड

21-08-2023

By Dh. Sraddhasree, Warud Center - Warud

वरुड केंद्रातर्फे साप्ताहिक धम्म वर्ग सावंगी चालविल्या जातो. साप्ताहिक धम्म वर्गामध्ये धम्म या विषयावर प्रवचन देतांना  धम्मचारी तेजोमणी.. राहुल बागडे,तुकारामजी गोंडाने दीपाताई धोंगडे मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

Death of Dhammachari Virapriya

18-08-2023

By Karmavajra Center - Order

प्रिय संघ भाई और बहनों

हमे बताते हुए खेद हो रहा है, धम्मचारी विरप्रिय (अमरावती) इनका आज सुबह करीबन ७.०० बजे निधन हो गया है | काफी दिनों से वे बीमार चल रहे थे | उनका अंतिम संस्कार दोपहर ३.०० बजे उनके घर से किया जायेगा |

धम्मचारी  विरप्रिय इनकी दीक्षा २५ मई २०१४ को हुयी थी, अमोघसिद्धी उनके आचार्य तथा चंद्रशील उनके उपाध्याय रहे | एक शिक्षक रूप में कई साल कम कर शिक्षणअधिकारी कर निवृत होने के बाद उन्होंने पूर्ण रूप से संघ कार्य के लिए  योगदान दिया |

कृपया उनके लिए मैत्री करे तथा अपने ध्यान में उन्हें याद कीजिये |

मैत्रीजाल 

वरुड, मित्र दिवस

17-08-2023

By Dh. Sraddhasree, Warud Center - Warud

दिनांक १६/८/२०२३ ला करुणा बुद्ध विहार वरुड येथे मित्र डे आयोजित करण्यात आला होता.यावेळी धर्मदर्शी यांनी ध्यान व भवचक्र या विषयावर सोप्या भाषेत समजून सांगितले. सर्व मित्रांनी सहभोजनचा आनंद घेतला.

केंद्रातील धम्मचारी बोधिनंदन, कुशलबोधी, धम्मचरिणी श्रद्धाश्री, दीपरत्ना, अचलसीरी व मैत्रीतारा यावेळी हजर होत्या 

मित्रांसाठी कार्यशाळा, वरुड

17-07-2023

By Dh. Sraddhasree, Warud. Center - Warud

दिनांक ९/७/२०२३ला वरुड केंद्रातर्फे, वरुड मोर्शी येथील धम्ममित्र महिला -पुरुष यांच्या साठी कार्यशाळा चे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळेचे नेतृत्व धम्मचारिणी धम्मचारिणी सुरुची  अमरावती यांनी केले. मित्रता या विषयावर खुप सुंदर, उदाहरण देऊन प्रवचन दिले. धम्मचारिणी सुजया अमरावती यांनी मैत्री भावना ध्यानाचे नेतृत्व केले.

धम्ममित्र ज्योती गाडगे यांनी कार्यशाळेचे संचालन केले. पुजेचे नेतृत्व धम्ममित्र ललिता ताई गजभिये , पुष्पा वावरे रंजना पाटील यांनी केले. परिचय पुष्पा ताई वावरे यांनी केले. पुण्यानुमोदन धम्ममित्र रंजना हरले यांनी केले.

१०वी गुणवंत विध्यार्थी सत्कार, वरुड

08-06-2023

By Dh Sraddhasree, Warud Center - Warud

सम्यक  बुद्ध विहार येथे 10वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला प्रमुख पाहुणे म्हणून ऍडव्होकेट प्रियंका ताई धुताले, ऍडव्हो केट अर्चना ताई कांबळे, इंजिनीयर अस्मिताताई लांडगे व मायाताई रामटेके सर्वांनी विद्यार्थ्यांस मार्गदर्शन केले. प्रास्ताविक धम्मचारीणी मैत्री तारा यांनी केले सूत्रसंचालन धम्म मित्र राहुल यांनी केले.पूजेचे नेतृत्व धम्ममित्र पद्माताई अधव, धम्ममित्र कल्पनाताई गाडगे, वैशालीताई अधव यांनी केले. धम्ममित्र रामटेके यांनी गीत सादर केले.पाहुण्यांचा परिचय धम्म मित्र निर्मलाताई लांडगे यांनी दिला. कार्यक्रमाचे नियोजन धम्मचारी तेजोमुनी यांनी केले.आभारधम्ममित्र स्मृती अधव यांनी केले. कार्यक्रमामध्ये  परिसरातील सर्व धम्म बंधू आणि भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमासाठी सकारात्मक विचारातून मदतीचे  हात  समोर आले,त्यापैकी  निर्मलाताई लांडगे ,कल्पनाताई गाडगे,संगिताताई लांडगे यांनी गुणवंत मुलासाठी बुक पेन  या भेटवस्तू आणल्या. राहुल बागडेनी सर्वांसाठी  नास्ता ची व्यवस्था केली .कौशल्या ताई अधव यांनी पेढे दिले. बुद्धरूप ठेवण्याकारिता टेबल गाडगे भाऊंनी दान दिला. सर्वांचे खुप खूप पुण्यानुमोदन.

भीक्कूनी संघाची भेट, वरुड

01-06-2023

By Dh. Sraddhasree, Warud Center - Warud

दिनांक १ जून करुणा बुद्ध विहार येथे हरियाणा येथील भीक्कूनी अय्याजी धम्मदिना यांनी नुकत्याच २३तारखेला झालेल्या १७ श्रामनेर भीक्कूनी सोबत सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते आदर्शाची पूजा पुष्प,मेणबत्ती अगरबत्ती ने करण्यात आली.उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले. धम्मचारीणी अचलसीरी यांच्या हस्ते त्यांचे पुष्पाणि स्वागत करण्यात आले. धम्मसहायक लुबा यावलकर व शशी यावलकर, नीलकंठराव यावलकर पोहे आणि लाडूचा नाष्टा आणला होता. सर्व भिक्षुनींनी चारीका करीत नागसेन विहारात गेल्या तिथे त्यांनी भोजन घेतले व नंतर अय्याजी नीं धम्मदेसना दिली.

गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार, वरुड.

01-06-2023

By Dh Sraddhasree, Warud Center - Warud

त्रिरत्न बौध्द महासंघ वरुड तर्फे साप्ताहिक धम्म वर्ग सम्यक बुद्ध विहार, आंबेडकर चौक येथे दर मंगळवारला घेण्यात येतो. याच वर्गाच्या दरम्यान 12वित ज्या मुला मुलींनी यश संपादन केले अश्याना प्रोत्साहन पर धम्म मित्र उत्तमरावं लांडगे यांनी वही पेन भेट दिली. तसेच धम्म मित्र माजी मुख्याध्यापक अढाऊ सर, विनोद बागडे, या कार्यक्रम ला उपस्थित होते.

समारोपीय कार्यक्रम, वरुड

23-05-2023

By Dh. Sraddhasree, Warud Center - Warud

त्रिरत्न बौध्द महासंघ वरुड तर्फे आयोजित बुद्ध महोत्सव ची सांगता दिनांक ९मे ला वर्षभर जे दानदाते दान देऊन संघाच्या कार्यास मदत करून प्रोत्साहित करतात अश्यांचा स्मृती चिन्ह व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी धम्मचारी विशुद्ध अमरावती यांनी संघाच्या एकतेसाठी वाचेच्या शिलाला किती महत्व आहे यावर प्रकाश टाकला व एक एक व्यक्ती जुळवणे व तो टिकून ठेवणे फार आवश्यक आहे यावर भर दिला. धम्मपीठावर धम्मचारी तेजोमुनी, इंजिनीयर सारंग गजभिये साहेब, चौधरी सर, डॉक्टर निखिल पवार, नगरसेवक मुन्नाभाऊ तिवारी उपस्थित होते.विशेष म्हणजे धम्ममित्र चंद्रशेखर अढाऊ सर यांचा मुलगा सक्षम अढाऊ याने आपला पहिला पगार करुणा बुद्ध विहार ला दान दिला त्याच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मचारिणी श्रद्धाश्री यांनी तर आभार मैत्रीतारा यांनी केले.  धम्मचारी विशुद्ध यांचा परिचय धम्ममित्र गजभिये यांनी करून दिला. पाली पूजेचे नेतृत्व धम्ममित्र राहुल बागडे व अरुण ब्राह्मणे यांनी केले.धम्ममित्र संजय चक्रपाणी व त्यांच्या टीम ने आकर्षक पुजास्थान सजविले. नगरसेवक मुन्ना तिवारी यांच्या प्रयत्ताने यावेळी बुद्ध जयंती निमित्त विहाराला टाइल्स लावून मिळाल्या त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.धम्म सहायक व आदर्श शिक्षिका चहांदे मॅडम व इंजि. सारंग गजभिये यांनी भोजन दान दिले.कार्यक्रम च्या यशस्वी ते करीता सर्व धम्ममित्र धम्मचारी यांनी सहकार्य केले.

art exhibition by Gughyachakshu

16-05-2023

By Karmavajra Center - Order

प्रिय भाई और बहनों

नमो बुद्धाय जयभीम

शायद आप जानते होंगे धम्मचारी गुह्यचक्षु यह एक बेहतरीन कलाकार है, जो सद्दम शिविर केंद्र भाजे में रहते है |

आप सभी को बताते हुए ख़ुशी हो रही है, धम्मचारी गुह्यचक्षु इनका कला प्रदर्शन ( art exhibition) मुम्बई में जहाँगीर आर्ट गैलरी में हो रहा है, जिसका आज उद्घाटन हुआ है | १६ से २२ मई तक होने वाले इस प्रदर्शनी के लिए आप सभी आमंत्रित है |

या निचे दिए गए लिंक पर आप उनको शुभेच्छा दे सकते है |

मैत्री से 

बुद्ध भीम गीत वरुड

16-05-2023

By Dh. Sraddhasree, Warud. Center - Warud

त्रिरत्न बौध्द महासंघ वरुड केंद्रातर्फे करुणा बुद्ध विहार येथे ५ मे ते ९मे या दरम्यान पाच दिवशीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दिनांक ८मे ला आश्वाघोष वरुड तर्फे बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रम ला प्रमुख पाहुणे म्हणून धम्मचारिणी अचलसीरी, डॉक्टर गजभिये दंत चिकिस्तक, संजय शेंडे अमरावती लाभले होते. सर्वांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्यात.

धम्ममित्र नंदिनी पाटील, ताकसाडे काकू,दर्शना बागडे,रामटेके विनोद बागडे, गिरीधर मानेराव सर सात्विक चौधरी व सृजन बागडे बालकलाकार,ख्यातनाम गायक अरुणजी सहारे यांनी गीत सादर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कवी, गझलकार विनोदभाऊ बागडे यांनी उत्कृष्ट रित्या पार पाडले.सुरुवातीला सूत्रसंचालन राहुल बागडे यांनी केले.आदरशाची पूजा प्रमुख पाहुण्यांकडून करून पाली पूजेनी झाली. पाली पूजा धम्मचारिणी श्रद्धाश्री व धम्ममित्र पदमाताई अधव तर आभार धम्मचारिणी श्रद्धाश्री यांनी केले कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण नुकतेच नॉर्थ आफ्रिका या देशात घराणेशाही शास्त्रीय संगीतात भारताचे प्रतिनिधीत्व करणारे व ज्यांच्याकडून ही कला सम्पादन केली असे गुरु प्रसिद्ध संतूर वादक पंडीत शिवकुमार शर्मा व बुद्ध रत्न लिखितकर असे आश्वघोष अरुण सहारे यांनी राग रागेश्वरी हा राग सादर केला.यावेळी त्यांनी संगीत हे उच्च कोटीचे ध्यान आहे असे विचार व्यक्त करून प्रेक्षकांना मंत्र मुग्ध केले.