युवक आणि युवतींना व्यक्तिमत्व विकास, ध्यान साधना आणि बौद्ध मूल्यांवर आधारित जीवनदृष्टी देण्यासाठी “युथ रिट्रीट” या विशेष धम्मशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात बुद्ध, धम्म आणि शिक्षण या विषयांवर मार्गदर्शन केले जाईल.
उर्जन संघरक्षित धम्मानगर ध्यानमंदिर केंद्र, वरकवाडी, नांदेड़
गुरुवार २५ ते सोमवार २९ डिसेंबर २०२५
सकाळपासून सायंकाळपर्यंत विविध सत्रांचे आयोजन
या शिबिराचे नेतृत्व अनुभवी धम्ममित्र व अध्यापक करणार असून, ध्यान, समूहचर्चा आणि प्रेरणादायी कार्यक्रमांद्वारे तरुणांना धम्ममय जीवनाचा अनुभव देण्यात येईल. सर्व युवक‑युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असा मनापासून आग्रह आहे.
प्रिय युवा बंधू आणि भगिनीनो नमो बुद्धाय जयभीम, त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या National Network of Buddhist Youth (NNBY) तर्फे १८ वे National Youth Convention – “Path of Transformation” चे आयोजन करण्यात आले आहे. हे अधिवेशन २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान Hsuen Tsang Retreat Centre, Bordharan, Selu, Wardha, महाराष्ट्र येथे होणार असून, नेतृत्व धम्मचारी कुमारजीव आणि धम्मचारी अनोममित्र करणार आहेत.या अधिवेशनासाठी वय मर्यादा १५ ते ३५ वर्षे असून नियमन शुल्क फक्त रु. १०००/- ठेवण्यात आले आहे. संपर्क क्रमांक : +91 87883 29517 अधिक माहिती व इतर कार्यक्रमांच्या अद्ययावत तपशीलांसाठी कृपया Triratna India ची वेबसाइट https://www.triratnaindia.in/events ला अवश्य भेट द्या
प्रिय बंधू आणि भगिनीनो ,नमो बुद्बौधाय जयभीम आपण सर्वासाठी विवेकंड धम्म शिविराचे आयोजन केले आहे. हे शिविर सद्धम्म प्रदीप ध्यान शिविर केंद्र, देवळे-भाजा तालुका, मावळ, पुणे जिल्ह्यात ९ ते ११ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.भाजा हे अत्यंत सुंदर निसर्गरम्य ठिकाण असून, प्राचीन बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले हे स्थळ ध्यानासाठी आदर्श आहे. हे सर्वांसाठी सुवर्णसंधी आहे. आपण सर्व आमंत्रित आहात नेतृत्व : धम्मचारी चंद्रशील व त्यांच्या टीमचे असेल. रजिस्ट्रेशनसाठी ७०३० ३० ४१२३ या क्रमांकावर संपर्क साधावा.दान राशी रु. १०००/- आहेमैत्री सह
प्रिय बंधू आणि भगिनींनो,नमो बुद्धाय! जय भीम!त्रिरत्न बौद्ध महासंघाने सर्वांकरिता विवेकंड धम्म शिविर आयोजित केले आहे. हे शिविर सद्धम्म प्रदीप ध्यान शिविर केंद्र, देवळे-भाजा तालुका, मावळ, पुणे येथे २३ ते २५ जानेवारी २०२६ रोजी होईल. भाजा हे अत्यंत निसर्गरम्य व सुंदर ठिकाण असून, प्राचीन बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले हे स्थळ ध्यानसाधनेसाठी आदर्श आहे – ही सर्वांसाठी सुवर्णसंधी आहे! आपण सर्व आमंत्रित आहात.नेतृत्व: धम्मचारी चंद्रशील व टीम. दान राशी: रु. १०००/-. रजिस्ट्रेशनसाठी संपर्क: ७०३० ३० ४१२३.मैत्री सह,
प्रिय धम्ममित्र बंधू आणि भगिनींनोजय भीम! नमो बुद्धायआर्य अष्टांगिक मार्गावर या विषया वर महिला आणि पुरुष धम्ममित्रांसाठी विशेष धम्मशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायं. ५ वाजता सुरू होऊन १८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत चालणार असून, आधुनिक जीवनातील ताण, स्पर्धा, भ्रम आणि विखंडनाच्या पार्श्वभूमीवर आर्य अष्टांगिक मार्गाच्या साधनेतून अंतरिक बदल आणि व्यावहारिक धम्मजीवनाची दिशा देण्याचे उद्दिष्ट आहे. या शिबिरामध्ये सम्यक दृष्टि, सम्यक संकल्प, सम्यक वाणी आणि सम्यक कर्म या पहिल्या चार अंगा विषयी सखोल अध्ययन, चिंतन आणि ध्यानसाधना केली जाईल.हे शिबिर मध्यम मार्ग शिविर केंद्र, कोंढापुरी, सिंहगड्या पायथ्याशी, खेड-शिवापूर जवल, जिल्हा पुणे येथे होणार असून नेतृत्व धम्मचारी प्रज्ञादित्य करणार आहेत. शिबिरासाठी प्रति व्यक्ती दानराशी रु. २५००/- ठेवण्यात आली आहे आणि संपर्कासाठी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर नोंदणी करता येईल; धम्माची सखोल साधना व नैतिक, सजग जीवनाचा मार्ग शोधू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक दुर्लभ संधी आहे. संपर्क : ८८०५३२४४०६
Verify Your Mobile Number